जामनेर पंचायत समितीचा राज्यात नावलौकिक 2023-24 साठी उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर समितीला राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १७ लाख रुपये आणि विभागीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ११ लाख रुपये असे एकूण २८ लाख रुपयांचे पुरस्कार घोषित झाले
जामनेर प्रतिनिधी
राज्यभरात ‘जामनेर’ पंचायत समिती चा नावलौकिक
जामनेर पंचायत समिती दुहेरी पुरस्कार ने सन्मानित
गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली जामनेर पंचायत समितीचं घवघवीत यश
सविस्तर..
जामनेर (जि. जळगाव) पंचायत राज संस्थांमधील उत्कृष्ट कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानात जामनेर पंचायत समितीने राज्यभरात आपला ठसा उमटवत मोठे यश संपादन केले आहे. वर्ष 2023-24 साठी उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर समितीला राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १७ लाख रुपये आणि विभागीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ११ लाख रुपये असे एकूण २८ लाख रुपयांचे पुरस्कार घोषित झाले आहेत.ग्रामविकास, प्रशासन व्यवस्थापन, नवोपक्रम, पारदर्शकता आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा सखोल आढावा घेत ही निवड केली गेली. जामनेर पंचायत समितीने या सर्वच निकषांवर आपली ठसा उमटवत इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.या यशामागे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांचे कुशल नेतृत्व, समर्पित अधिकारी-कर्मचाऱ्यांची मेहनत आणि गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींचा व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग या सर्वांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून जामनेर तालुक्याचा विकास मार्ग सुकर झाला असून, ग्रामविकासाच्या दिशेने एक नवे पर्व सुरू झाले आहे.
या दणदणीत यशामुळे जामनेर तालुक्याचा राज्यस्तरीय नावलौकिक वाढला असून, पुढील वाटचालीसाठी एक भक्कम पायाभूत आधार मिळाला आहे