तहसिल कार्यालय, जामनेर येथे डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ या नवीन प्रणालीमुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची भेट अधिक पारदर्शक, गतिमान होणार


तहसिल कार्यालय, जामनेर येथे डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ

या नवीन प्रणालीमुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची भेट अधिक पारदर्शक, गतिमान होणार

जामनेर (ता. जामनेर) – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तहसिल कार्यालय, जामनेर येथे डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला आहे. या नवीन प्रणालीमुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची भेट अधिक पारदर्शक, गतिमान आणि नियोजित होणार आहे.

या प्रणाली अंतर्गत, कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची भेट घेण्यापूर्वी कार्यालयात लावलेल्या QR कोड स्कॅन करून, आपल्या भेटीचा उद्देश व आवश्यक तपशील भरायचा आहे. यामुळे भेटींची नोंद डिजिटल स्वरूपात होणार असून, कामकाज अधिक सुकर व कार्यक्षम होणार आहे.

या उपक्रमामुळे नागरिकांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागणार नाही, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांशी भेट अधिक नियोजित पद्धतीने होणार आहे. ही प्रणाली शासनाच्या “गतीमान व पारदर्शक सेवा” या ध्येयाशी सुसंगत होणार आहे

जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे आणि उपविभागीय अधिकारी श्री. विनय गोसावी यांचे मार्गदर्शनातून सदर योजनेची अमलबजावणी श्री नानासाहेब आगळे तहसीलदार जामनेर यांनी केली आहे.

— तहसिल कार्यालय, जामनेर

error: Don't Try To Copy !!