पाळधी जि.प.केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

पाळधी ता.जामनेर :- येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप संभारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शैलेश पाटील, व तुळशीराम वाघ होते.

आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना महत्वाचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की शिक्षणात कधीही खंड पडू देऊ नका.आई वडिलांचे,आपल्या शाळेचे आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.ते पुढे म्हणाले तुम्ही डॉक्टर ,इंजिनियर,शिक्षक, व्यवसायिक बना,जे काही तुमचे स्वप्न असेल ते पूर्ण करा.मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेवटी एक चांगला माणूस बना अशी प्रेरणादायी सदिच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत शाळेच्या गोड आठवणींना उजाळा दिला.शाळेतील शिक्षक चंदन राजपूत, संभाजी हावडे, सतीश बावस्कर, जितेंद्र नाईक, अमित मुंडे,मगंला धनुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद कोळी, निलेश भोंबे, सदस्य मनोज नेवे,नाना माळी, गजानन राजपूत, विनोद पाटील,अशोक पाटील, विकास धनगर कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

error: Don't Try To Copy !!