जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
प्रतिनिधी- सुपडू जाधव
जामनेर —गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रामपूर ता. जामनेर येथील श्री सिद्धगड भवानी माता मंदिर संस्थानच्या नूतन श्री सिध्दगड भवानी माता मंदिराचा भूमिपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.
जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सपत्नीक भूमिपूजन आज केले
.
श्री सिद्धगड भवानी माता मंदिर संस्थानचा अध्यक्ष म्हणून मंदिराचा व मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना संस्थानच्या इतर सहकाऱ्यांची व भाविकांची मिळणारी खंबीर साथ बळ देणारी आहे असे मनोगत नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केले .
याप्रसंगी भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते .