जामनेर तालुक्यात सरपंच आरक्षणाचा तक्ता जाहीर; ३७ ग्रामपंचायतींचे आरक्षण स्पष्ट

जामनेर | प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सन २०२५ ते २०३० या कालावधीकरिता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. दिनांक ७ व ८ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आरक्षण सोडतीनुसार संबंधित ग्रामपंचायतींचे अंतिम आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.या आरक्षण तक्त्यानुसार विविध ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC), नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तसेच अनुसूचित जमाती अशा प्रवर्गांसाठी सरपंचपद राखीव करण्यात आले आहे.आरक्षणाच्या तक्त्यात पळासखेडे बु., काळखेडे, टाकळी बु., तोरगाव, कादोळी, वाकी बु., बिलवाडी, सामरोद, देवळसगाव, जंगीपुरा, लेलेगाव, पिंपळगाव गो., शेरी, चिंचोली पिंप्री, वाघारी, वाकडी, जळांद्री बु., सोनाळे, भागादरे, सावखेडे, वाकी खु., लोणी, केकतभिंभोरा, बेटावद बु., राजणी, हिरवखेडा न वा यांसह पुढील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.आरक्षण निश्चित झाल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्या गावात कोणत्या प्रवर्गाला सरपंचपदाची संधी मिळणार, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार तसेच ग्रामस्थांचे आता आरक्षणाच्या तक्त्याकडे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे, सरपंचपदाच्या आरक्षणामुळे अनेक गावांमध्ये महिला आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना नेतृत्वाची संधी मिळणार आहे. शासनाच्या नियमानुसार आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आगामी राजकीय समीकरणांनाही यामुळे वेग येण्याची शक्यता आहे

Read More

🚨 ब्रेकिंग | JBN महाराष्ट्र NEWS

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट; नशिराबादमध्ये चेन्नई सायबर क्राईमची धडक! AIच्या मदतीने बनावट व्हिडिओ अन् पोस्ट प्रसारित केल्याचा संशय; होमगार्डची चौकशी सुरू नशिराबाद | प्रतिनिधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर कथित बनावट अकाउंट तयार केल्याच्या प्रकरणाचे धागेदोरे आता जळगाव जिल्ह्यातील नशिराबादपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी चेन्नई वेस्ट झोन सायबर क्राईम पोलिसांचे पथक नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, स्थानिक पोलिसांच्या मदतीने होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 🔴 AIच्या माध्यमातून बनावट कंटेंट तयार केल्याचा संशय मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने अथवा त्यांच्या ओळखीचा आभास निर्माण करणारे सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यात आले होते. या अकाउंटवरून AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेले व्हिडिओ, डिजिटल छायाचित्रे आणि विविध पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचा संशय आहे. हा डिजिटल कंटेंट नेमका कोणी तयार केला? त्यामागे कोण व्यक्ती किंवा यंत्रणा आहे? याचा शोध घेण्यासाठी चेन्नई सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू असल्याची माहिती आहे. 🔎 IP लॉगपासून मोबाईल क्रमांकापर्यंत तपास तपासादरम्यान संबंधित सोशल मीडिया अकाउंटचे IP लॉग, लिंक्ड अकाउंट्स, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, सबस्क्रायबर तपशील आणि वापरण्यात आलेली डिजिटल उपकरणे यांची माहिती तपासली जात असल्याचे समोर आले आहे. बनावट अकाउंट कोणत्या ठिकाणाहून आणि कोणत्या उपकरणावरून ऑपरेट करण्यात आले? त्याद्वारे किती डिजिटल कंटेंट प्रसारित करण्यात आला? याचाही तपास केला जात आहे. 👮 होमगार्डची चौकशी; सहभाग अद्याप स्पष्ट नाही चेन्नईच्या सायबर क्राईम पथकाने नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल होऊन होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख यांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणात त्यांचा नेमका सहभाग आहे की नाही, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यांच्या डिजिटल उपकरणांचा या प्रकरणाशी संबंध आहे का, याचीही तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. ⚠️ नशिराबादमध्ये चर्चेला उधाण चेन्नईतील सायबर क्राईम पथक थेट नशिराबादमध्ये दाखल झाल्याने परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बनावट अकाउंट नेमके कोणी तयार केले? AIच्या माध्यमातून तयार केलेला कंटेंट कोणाच्या सांगण्यावरून प्रसारित करण्यात आला? या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता चेन्नई सायबर क्राईमच्या तपासातून समोर येणार आहेत. टीप : या प्रकरणातील संबंधित व्यक्तीचा सहभाग अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेला नसून, पुढील माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Read More

“मी काहीच केले नाही, तरी ‘तीसमारख्यां’ माझ्याच जाळ्यात अडकले!” — ना. संजय सावकारेंचा चौधरी बंधूंवर जोरदार हल्लाबोल“

“मी काहीही करत नाही, नेहमीच मला हवे तसे घडते; यातूनच आता स्वतःला तिसमारखां समजणारे माझ्याच जाळ्यात अडकले” — मंत्री संजय सावकारेभुसावळ : भुसावळच्या राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच रंग चढला असून, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी चौधरी बंधूंना लक्ष्य करत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. “मी काहीच केले नाही, तरी ‘तीसमारखां’ माझ्याच जाळ्यात अडकले!” अशा शब्दांत सावकारे यांनी चौधरी बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला.एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ना. सावकारे यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत, “मी काहीही न करता नेहमीच मला हवे तसे घडते. यातूनच आता स्वतःला तिसमारखां समजणारे माझ्याच जाळ्यात अडकले,” असे वक्तव्य केले.त्यांच्या या विधानामुळे भुसावळच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. सावकारे यांनी केलेल्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणत्या राजकीय घडामोडींकडे आहे, याबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.चौधरी बंधूंवर टीकेची धारयावेळी सावकारे यांनी चौधरी बंधूंच्या राजकीय भूमिकेवर आणि त्यांच्या हालचालींवर जोरदार टीका केली. “मी काहीही करत नाही, तरी परिस्थिती माझ्या बाजूने निर्माण होते,” या आशयाचे वक्तव्य करत त्यांनी विरोधकांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.सावकारे यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळात भुसावळमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः चौधरी बंधू आणि सावकारे गटातील राजकीय समीकरणांवर या वक्तव्याचा काय परिणाम होतो, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.“तिसमारखां” वक्तव्याची जोरदार चर्चासावकारे यांच्या भाषणातील “तिसमारखां माझ्याच जाळ्यात अडकले” हा उल्लेख सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांना थेट आव्हान देणाऱ्या या वक्तव्यामुळे सोशल मीडिया तसेच स्थानिक राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.दरम्यान, सावकारे यांच्या या आरोपांवर चौधरी बंधूंकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे भुसावळच्या राजकारणात ‘सावकारे विरुद्ध चौधरी’ संघर्षाला पुन्हा धार येण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read More

🚨 जामनेरमध्ये पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; १८९ आरोपी पोलिसांच्या रडारवर!

जामनेर | प्रतिनिधीआगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जामनेर पोलिसांनी ७ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता जामनेर पोलीस ठाणे, पहूर पोलीस ठाणे व फत्तेपूर पोलीस ठाणे हद्दीत मोठे कोम्बिंग ऑपरेशन राबविले.पोलीस अधीक्षक चाळीसगाव, पोलीस अधीक्षक जळगाव तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एकूण १८९ आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यामध्ये जामनेर पोलीस ठाणे हद्दीत ७२, पहूर हद्दीत ६४ तर फत्तेपूर हद्दीत ५३ आरोपींची तपासणी करण्यात आली.कारवाईदरम्यान पोलिसांनी १९ अवैध/संशयास्पद बाबींवर कारवाई करत तब्बल ₹५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ५ जणांविरुद्ध NBW (नॉन-बेलेबल वॉरंट) बजावण्यात आले.https://youtu.be/hhqLuo9B3Hc?si=ZUSetyJt2lNRnM8I📌 कारवाईचा तपशीलजामनेर: ७२ आरोपी तपासले; ६ कारवाया; ₹१.७० लाखांचा मुद्देमाल; १० मोटारसायकली व १ रिक्षा संशयित.पहूर: ६४ आरोपी तपासले; १० कारवाया; ₹२.५० लाखांचा मुद्देमाल; २० मोटारसायकली; ४ NBW.फत्तेपूर: ५३ आरोपी तपासले; ३ कारवाया; ₹१.५० लाखांचा मुद्देमाल; २२ मोटारसायकली; १ NBW.एकूण: १८९ आरोपी; १९ कारवाया; ₹५.७० लाखांचा मुद्देमाल; ५२ मोटारसायकली व १ रिक्षा संशयित; ५ NBW.दरम्यान, कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मिळून आलेल्या आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून, संशयित मोटारसायकलींच्या कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Read More

स्त्रीभ्रूणाला पोटातच मारण्याचा प्रकार उघडकीस?

गर्भलिंग निदान करून गर्भपाताचा गंभीर आरोप; बुलढाण्यात खळबळ बुलढाणा : जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करून त्यानंतर गर्भपात केला जात असल्याच्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. गर्भातील बाळाचे लिंग तपासून, त्यानुसार गर्भपातासाठी प्रक्रिया केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी सोनोग्राफीच्या माध्यमातून गर्भाचे लिंग जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय आहे. त्यानंतर गर्भपातासाठी आवश्यक औषधे अथवा वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले जात असल्याचे आरोपही समोर येत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. भारतामध्ये गर्भलिंग निदान करून त्याच्या आधारे गर्भपात करणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी PCPNDT कायदा लागू आहे. या कायद्यांतर्गत गर्भाचे लिंग सांगणे, विचारणे किंवा त्यासाठी मदत करणे यावर कठोर कारवाईची तरतूद आहे. बुलढाणा जिल्ह्यात यापूर्वीही बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या संशयावरून PCPNDT पथकाकडून कारवाया करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्याच्या आरोपांचीही प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात सोनोग्राफी केंद्रे, संबंधित वैद्यकीय व्यक्ती, गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे तसेच त्यांचा पुरवठा याबाबत तपास होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. जर गर्भलिंग निदान करून त्यानंतर गर्भपात केल्याचे पुरावे तपासात आढळले, तर संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अशा प्रकारांमुळे मुलगा-मुलगी समानतेच्या संकल्पनेला धक्का बसत असून स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी, नोंदींची पडताळणी आणि संशयास्पद प्रकरणांवर तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी संबंधित तपास यंत्रणेकडून होणे बाकी असून, चौकशीनंतरच नेमका प्रकार आणि त्यातील दोषी कोण हे स्पष्ट होणार आहे.

Read More

वर्डी-अडावद रस्त्यावर वनविभागाची धडक कारवाई; सागवान तस्करीचा डाव उधळलादुचाकीवरून अवैध लाकूड वाहतूक करणारा संशयित अंधाराचा फायदा घेत पसार; ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त

चोपडा | प्रतिनिधी :चोपडा तालुक्यातील वर्डी-अडावद मार्गावर सागवान लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने रात्रीच्या वेळी कारवाई करत मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड जप्त केले. या कारवाईदरम्यान दुचाकीवरून लाकूड वाहून नेणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करण्यात आला; मात्र अंधाराचा फायदा घेत त्याने दुचाकी आणि लाकूड रस्त्यावरच सोडून तेथून पळ काढला.मिळालेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वनपथकाला वर्डी-अडावद रस्त्यावर सागवानाच्या अनधिकृत वाहतुकीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार वनपथकाने परिसरात गस्त वाढवून संशयित वाहनावर लक्ष ठेवले. काही वेळाने सागवानाचे अनघड लाकूड घेऊन जाणारी दुचाकी वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली.पथकाने दुचाकीचा पाठलाग सुरू करताच संशयिताने वाहन थांबवून त्यावर असलेले लाकूड रस्त्याच्या कडेला सोडले आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. वनकर्मचाऱ्यांनी परिसराची तपासणी केली असता सागवानाचे मोठे ८० नग आणि लहान २० नग अनघड लाकूड आढळून आले.वनविभागाने घटनास्थळावरून अंदाजे ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल आणि सागवान लाकूड असा एकूण ४२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी चोपडा येथे जमा करण्यात आला आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईही कारवाई उपवनसंरक्षक सौरभ सहार, सहाय्यक वनसंरक्षक एम. बी. पाटील आणि अडावद वनक्षेत्रपाल प्रशांत सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनपाल योगेश सालुंखे, वनरक्षक गजानन कोईगडे, सुशांत पावरा, हर्षल जोशी, वाहनचालक राजेश जोशी, राजू पाटील तसेच अडावद राऊंड स्टाफने सहभाग घेतला.दरम्यान, घटनास्थळावरून पसार झालेल्या संशयिताचा वनविभागाकडून शोध सुरू असून, जप्त केलेल्या लाकडाचा स्रोत आणि वाहतुकीबाबतही तपास केला जात आहे. सागवानाची अवैध तोड आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात वनविभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने परिसरातील अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Read More

रावेर तालुक्यात २२ वर्षीय विवाहितेवर अत्याचार; संशयित आरोपी अटकेत

रावेर | प्रतिनिधीरावेर तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय विवाहितेवर तिच्याच घरात घुसून अत्याचार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून रावेर पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पीडित विवाहित महिला घरात एकटी असल्याची संधी साधून संशयित आरोपी अरुण भागवत यवत्तकर हा तिच्या घराजवळ आला. त्यानंतर त्याने कथितरीत्या बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला. घराचा दरवाजा आतून बंद करून घेतल्यानंतर त्याने पीडितेवर मारहाण करून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.घटनेनंतर पीडितेने धाडस करून पोलिसांकडे धाव घेतली आणि संपूर्ण प्रकाराची माहिती देत तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत रावेर पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध बलात्कारासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सखाराम कांबळे करीत आहेत. घटनेमागील नेमके कारण, आरोपी व पीडितेची ओळख व संबंध तसेच घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून तपासातील अधिक माहिती आणि पुढील कायदेशीर कारवाईबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

Read More

यावलमध्ये सागवान लाकडावर वनविभागाची धडक कारवाई; सात नग जप्त

यावल : शहरालगतच्या खडकाई नदीपात्र परिसरात प्रोसोपिस बाभळीच्या झुडपांमध्ये लपवून ठेवण्यात आलेले सागवान लाकूड वनविभागाच्या पथकाने कारवाई करून जप्त केले. या कारवाईत सागवानाचे सात नग आढळून आले.वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.२० वाजता गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने खडकाई नदीपात्र परिसरात पाहणी केली. यावेळी बाभळीच्या झुडपांमध्ये लपवून ठेवलेले सागवान लाकूड निदर्शनास आले.पंचांच्या उपस्थितीत केलेल्या पाहणीत सागवानाचे ७ नग, एकूण ०.१९२ घनमीटर घनफळाचे लाकूड आढळून आले. त्याची अंदाजे नुकसान किंमत ३,६३३ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.वनविभागाने पंचनामा करून सदर सागवान कटसाईजचा माल जप्त केला. जप्त केलेला माल शासकीय वाहनाद्वारे मुख्य विक्री केंद्र, यावल येथे ताबा पावतीद्वारे जमा करण्यात आला.या प्रकरणी वनगुन्हा क्र. १९/२०२६, दिनांक ०३/०९/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील आवश्यक पंचनामा व जबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

Read More

यावलला राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात

यावल : यावल शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या महत्त्वाकांक्षी कामाला अखेर सुरुवात झाली आहे. गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावरील सुमारे ६ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.यावल शहरातील भुसावळ टी-पॉईंट परिसरात आयोजित कार्यक्रमात या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय बाल कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.शहरातून जाणाऱ्या या मार्गावर वाहतुकीची वाढती वर्दळ लक्षात घेता चौपदरीकरणाची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. या कामामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच वाहनचालकांना अधिक सुरक्षित आणि सुकर प्रवास करता येणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.या रस्त्याच्या कामासाठी नागरिक आणि स्थानिकांकडूनही सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने यावल परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.भूमिपूजन कार्यक्रमाला यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, उपसभापती दीपक चौधरी, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी हिरालाल चौधरी, कुऱ्हा येथील माजी सभापती हर्षल पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. जी. पाटील (नाना), माजी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती रविंद्र पाटील, भाजप यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी, किनगाव मंडळ अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह यावल नगरपालिकेच्या गटनेत्या नंदाताई महाजन, नगरसेविका कल्पना वाणी, वर्षा येवले, नयनवर तसेच कुऱ्हा येथील संचालिका कांचन फालक आणि विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर यावल शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, परिसराच्या विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Read More

चिमुकल्यांच्या हाती खडू अन् वर्गात ‘गुरुजी’; पाळधी केंद्र शाळेत अनोखा शिक्षक दिनविद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका; शिक्षकांचा महाराष्ट्रीयन संस्कृतीनुसार सन्मान

पाळधी, दि. ५ सप्टेंबर : जामनेर तालुक्यातील पाळधी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत एक दिवसासाठी अध्यापनाची धुरा सांभाळली. चिमुकल्यांच्या हाती खडू आणि वर्गात ‘गुरुजी’ अशी आगळीवेगळी अनुभूती विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मिळाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेतून विविध विषयांचे अध्यापन केले. शिक्षक म्हणून वर्गासमोर उभे राहण्याचा अनुभव घेताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि वक्तृत्वकौशल्य विकसित झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किरण सपकाळे, शिक्षक अमित मुंडे, जितेंद्र नाईक, सतीश बावस्कर, रविंद्र क्षिरसागर, वाघ सर, तसेच सौ. जाधव, सौ. नंदा आपर, सौ. ज्योती पाटील, सौ. सुतार आणि सौ. वाघुळदे यांचा शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने महाराष्ट्रीयन संस्कृतीनुसार रुमाल, टोपी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर चोरडिया यांनी केले, तर आभार प्रदर्शन शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाल वाणी, उपाध्यक्ष संदीप पाटील, प्रवीण माळी, विनोद शिंदे, सौ. शीतल शिंदे तसेच इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.

Read More
error: Don't Try To Copy !!