विहीर खोदकाम दरम्यान ब्लास्टिंग परवान्याची प्रशासन करणार का चौकशी, मजुराचा मृत्युला बेजबाबदार लोकांवर होणार का कारवाई.

जामनेर, अंबिलहोळ:
जामनेर तालुक्यातील अंबिलहोळ येथे विहीर खोदकाम सुरू असताना घडलेल्या ब्लास्टिंग दुर्घटनेत एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत व्यक्तीची ओळख राहुल धनराज वाघ (वय 35, रा. मुंदखेडा, जामनेर) अशी करण्यात आली आहे. जखमींना तातडीने जळगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

दुर्घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, ब्लास्टिंगसाठी आवश्यक परवाने होते की नाही, याची अद्याप चौकशी झाली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ब्लास्टिंगसाठी परवाना तपास अद्याप प्रलंबित:
घटना घडून 24 तास उलटूनही ब्लास्टिंगसाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टर अधिकृत होते की अनधिकृत, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. स्थानिक नागरिकांच्या मते, अनधिकृतरीत्या ब्लास्टिंग केली जात असल्याचा संशय आहे.

पोलीस तपास सुरू:
पोलिसांनी सांगितले की, दुर्घटनेच्या सर्व बाबींची चौकशी सुरू आहे. ट्रॅक्टर मालकाविरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तपासानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येईल.

घटनेमुळे स्थानिकांमध्ये नाराजी आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

error: Don't Try To Copy !!