भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर येथे १३-१४ जानेवारी रोजी मोतीमाता देवीचा यात्रोत्सव

जामनेर प्रतिनिधी (अशोकराव चव्हाण) गारखेडा,ता.जामनेर येथून जवळच असलेल्या मांडवेदिगर येथे बंजारा समाजाची कुलस्वामिनी असलेल्या मोतीमाता देवीचे जागृत देवस्थान असून या देवीचा यात्रोत्सव दरवर्षाप्रमाणे मोतीमाता मंदिर ट्रस्ट,मांडवेदिगर तर्फे यावर्षी देखील शाकंभरी(पौष) पौर्णिमेला दि.१३ आणि १४’जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.या यात्रोत्सवात संपूर्ण खान्देश व राज्यातील बंजारा समाजबांधव आणि अन्य समाजबांधव मोठ्या संख्येने सामील होत असतात.


या यात्रोत्सवाला जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी-अधिकारी संघटनेचे मुंबई विभागीय अध्यक्ष-मा.अशोकराव चव्हाण आणि सर्व पदाधिकारी येथील स्थानिक पोलिस पाटील-रविंद्रजी पवार,तंटामुक्ती अध्यक्ष,ग्रामपंचायत चे सरपंच,उपसरपंच,सर्व सन्माननीय ग्रा.पं.सदस्य,तसेच गावातील युवक मंडळ,सामाजिक कार्यकर्ते व भुसावळ तालुका पोलिस प्रशासन यांचे सहकार्य असते.


यानिमीत्त देवस्थान परिसरामधे सर्व व्यापारी,मिठाई दुकानदार,भांडी,खेळणी दुकानदार,इ.व्यावसायिक यांनी आपली दुकाने लावावीत असे आवाहन मोतीमाता देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष-मा.सरिचंदजी पवार,उपाध्यक्ष-मा.गजाननजी पवार,सचिव-मा.गोविंदजी पवार,खजिनदार-मा.चरणदासजी पवार,सहसचिव-सौ.संत्रीबाई पवार,सदस्य-मा.हरिभाऊ पवार,मा.भगवानजी पवार,मा.गणेशजी पवार,यांच्यासह सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

error: Don't Try To Copy !!