संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथी समाधी सोहळ्याचे पाळधी येथे आयोजन.

श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पाळधी तालुका जामनेर येथे भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमांमध्ये गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा मार्फत आदर्श कामगार पुरस्कार २०२५ मिळवलेल्या व आपल्या गावचे भूमिपुत्र गरवारे टेक्निकल फायबर इंडस्ट्रीज वाई येथे कार्यरत असणारे श्री दत्तात्रय खंडू जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यक्रमांमध्ये श्री दत्तात्रय जाधव यांचा नेहमीच एक चांगला उत्कृष्ट सहभाग असतो, ज्यामध्ये वृक्षारोपण असेल शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत असेल समाजकार्य असेल या सर्वांची दखल घेऊन श्री संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून माळी समाज पंच अध्यक्ष श्री दगडू आनंदा माळी व उपाध्यक्ष देवेंद्र गोरे तसेच गावातील माजी सरपंच दिगंबर माळी ग्रामपंचायत सदस्य दीपक माळी पंच कमिटी व समाज बांधव यांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता..

error: Don't Try To Copy !!