ग्रामीण विकासात आजच्या युवतींची भूमिका मोलाची

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जनविश्वास सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात संजयदादा गरुड यांचे प्रतिपादन

शेंदुर्णी

येथील आप्पासाहेब रघुनाथराव गरुड महाविद्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त आयोजित सजग युवती-सक्षम युवती उपक्रमाच्या व्याख्यान कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजयदादा गरुड यांनी अध्यक्षपदावरून ग्रामीण भागातील रचनेत आणि विकासात युवतींचा सहभाग आणि भूमिका अत्यंत मोलाची आहे असे मत मांडले.युवती केवळ कुटुंबाचा नव्हे,तर ग्रामीण समाजाचा देखील अविभाज्य घटक असल्याने त्यांनी आत्मविश्वासाने आपल्या क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या जनविश्वास सप्ताहामागील विवेचन युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षा कु.भाग्यश्री विवेकानंद ठाकरे यांनी मांडले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नाना पाटील,जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शिंदे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव थोरात,शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सागरमल जैन,युवा नेते स्नेहदीप गरुड,नगरसेवक धीरज जैन तसेच जंगीपूरा येथील उपसरपंच मनोज पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

चौकट (1)
अत्यंत मौलिक विषयांवर युवतींना मिळाले मार्गदर्शन :

या उपक्रमात युवतींसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.ॲड.केतन सोनार यांनी ‘सोशल मीडिया हाताळताना युवतींनी घ्यावयाची काळजी’ या विषयावर दैनंदिन घडामोडी,फेक न्यूज,ऑनलाइन फसवणूक याविषयी सजग राहण्याच्या दृष्टीने सउदाहरण विदयार्थीनींना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व्याख्यान दिले.ॲड. उमेश मराठे यांनी ‘युवती व कौशल्य विकास कार्यक्रमातून उपलब्ध संधी’ या विषयावर विवेचन करताना कौशल्य विकास म्हणजे केवळ पार्लर किंवा शिवणकाम पुरते मर्यादित नसून, सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रातही युवतींना अनेक संधी असल्याचे असे आपल्या व्याख्यानातून नमूद केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.संजय भोळे, आर.एस. चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन दिनेश थोरात यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य साळुंखे यांनी मानले.

चौकट (2)

वटवृक्षारोपण व दहा युवतींना रोपांची जबाबदारी :

‘एक झाड माझ्या दादांचं…!’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी युवती काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहा विद्यार्थिनींना वटवृक्षाचे रोप भेट देत त्यांच्याकडून जगविण्याचे वचन घेतले. यावेळी संस्थेच्या आवारात अध्यक्ष श्री. संजयदादा गरुड यांच्याहस्ते वटवृक्ष लावण्यात आले तृप्ती बारी,रोहिणी गुजर,नेहा न्हावी, वृषाली पाटील, गायत्री पाटील, कोमल म्हस्के, सानिया गुजर, निकिता पाटील, आरती पाटील आणि योगेश्वरी वाघ या दहा युवतींनी झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

error: Don't Try To Copy !!