तोंडापूरच्या जैन विद्यालयात टिळक, साठे यांना अभिवादन

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित निबंध स्पर्धेत् लहान गटातून श्रद्धा, तर मोठ्या गटातून दिव्या पाटील प्रथम
———————————- तोंडापूर ता जामनेर
येथील शेंदुर्णी शिक्षण संस्था संचलित श्रीमती र सु जैन माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सतीश देशमुख होते तर व्यासपीठावर मुख्याध्यापक पी डी रोनखेडे के एस माळी एस पी पाटील उपस्थित होते
यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जामनेर तालुका यांच्या माध्यमातून आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करून प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली या परीक्षेचे समन्वयक व परीक्षक म्हणून आर सी लोडते यांनी काम केले
अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल
275 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला
लहान गट
प्रथम : श्रद्धा अनिल रायपूरे
द्वितीय : लोकेश सुपडू जिरी
तृतीय : सृष्टी मनोज चौधरी

मोठा गट
प्रथम : दिव्या दीपक पाटील
द्वितीय : गणेश संजय काटकर
तृतीय : वैशाली धनराज गव्हले, गायत्री गव्हारे
दोन्ही गटातून 16 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले
यावेळी आर एस पाटील के व्ही देशमुख मुख्याध्यापक पी डी रोनखेडे यांनी मनोगतातून मार्गदर्शन केले याप्रसंगी पार्थ पाटील वैभवी मुके कोमल गव्हाणे आदी विद्यार्थ्यांनी देखील मनोगते व्यक्त केले .श्री देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलणं आर सी लोडते यांनी केले तर आभार अमोल साळुंके यांनी मानले
कार्यक्रमावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

error: Don't Try To Copy !!