
जामनेर – ( प्रतिनिधी )
जामनेर तहसिल कार्यालयात
तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले .
या प्रसंगी नागरिकांच्या विविध विभागाशी संबंधित समस्या व तक्रारींची संक्षिप्त चौकशी करून आवश्यक कार्यवाही तहसिलदार श्री नाना साहेब आगळे यांच्या कडून करण्यात आली.
यावेळी नायब तहसिलदार , इतर विभागाचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते .

विभागप्रमुखांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या व तातडीने निराकरणासाठी पावले उचलली.
लोकशाही दिनाच्या माध्यमातून शासन-प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक होत आहे.