जि.प.प्राथमिक शाळा वाकडी येथे केंद्रीय शिक्षण परिषद उत्साहात साजरी

वाकडी येथे दि.३० सप्टेंबर रोजी वाकडी केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद मराठी केंद्रशाळा वाकडी येथे आयोजित करण्यात आली. त्या शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थान वडगाव सद्दो शाळेचे मुख्याध्यापक श्री कौतिक आवटे यांनी भूषवले. या शिक्षण परिषदेसाठी जामनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री विष्णू काळे साहेब उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन सरानुसार विद्यार्थ्यांचे विश्लेषण करून त्याप्रमाणे कृती कार्यक्रम राबवून आपण निश्चितपणाने अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करून गुणवत्ता निर्माण करू शकतो असा विश्वास काळे साहेबांनी उपस्थित शिक्षकांना दिला. तसंच ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारा शिक्षणकप सद्यस्थितीत प्रथम क्रमांक वर असलेला जामनेर तालुका निश्चितपणाने

उचलेल अशी अपेक्षा व्यक्त केली आणि त्यासाठी आजपर्यंत सर्व शिक्षकांनी केलेल्या कार्याचे कौतुक आदरणीय काळे साहेबांनी आपल्या मनोगतात केले. वाकडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ज्ञानेश्वर पाटील सर यांनी केंद्रातील शाळांच्या निपुण महाराष्ट्र अभियान संदर्भात आढावा घेऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षण परिषदेस उपस्थित असलेले फतेपूर व तोंडापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री संदीप पाटील सर यांनी सुद्धा अध्ययन स्तर निश्चितीच्या संदर्भात उपस्थितांना सविस्तार मार्गदर्शन केले.
वाकडी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रल्हाद शिंदे सर यांनी आपल्या प्रस्ताविकातून शाळेची यशोगाथा सर्वांसमोर मांडली. तर तर श्री विनोद नाईकडा यांनी जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर कवडे सर यांनी केले तर आभार श्री सूर्याजी काकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री ज्ञानेश्वर शामराव पाटील, श्री शेखर महाजन व श्री प्रकाश कुमावत यांनी परिश्रम घेतले.

error: Don't Try To Copy !!