जळगांव – शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम भारतीय जैन संघटनेने केले – आमदार सुरेश भोळे

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर

  • शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम भारतीय जैन संघटनेने केले असे प्रतिपादन आमदार सुरेश भोळे यांनी केले.ते जैन संघटनेने जळगांव येथून सोलापूर,धाराशिव,परभणी जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी 8 ट्रक सुका चारा मूरघास पाठविण्या प्रसंगी बोलत होते. एकूण 50लाख रूपये मुल्याचा चारा अर्हम सेवा ग्रुप घाटकोपर मुंबई यांच्या सहकार्याने व श्री नम्रमूनी महाराज यांच्या आशीर्वादाने, संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या प्रेरणेने व राज्य अध्यक्ष केतन शाह यांच्या मार्गदर्शनाने पाठविला जाणार आहे.
    या प्रसंगी जळगाव चे आमदार सुरेश भोळे,भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला, राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा, राज्य महासचिव व नैसर्गिक आपत्ती प्रकल्प प्रमुख प्रवीण पारख,विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा,विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत,विभाग सदस्य प्रदीप लोढा, जळगाव जिल्हाध्यक्ष निर्मल बोरा, सचिव दर्शन देशलहरा, पंकज जैन, जळगाव महिला अध्यक्ष कल्पना नाहटा,सचिव सुहानी सुराणा, सारिका जैन, चोपडा शहराध्यक्ष गौरव कोचर,डॉ.मोनीष अलिझाड,योगेश भडांगे माजी सरपंच पहुर, दीपक सूर्यवंशी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आदि उपस्थिती होते.
    आमदार भोळे म्हणाले, सनातन धर्मामध्ये दुसऱ्याचे अश्रु पुसण्याचे सांगीतले आहे.ते जैन संघटनेने केलेले आहे.देवाचे नाम स्मरण करतो.देवाचे नाम स्मरण सोपे आहे.
    दुसऱ्याचे अश्रू पुसणे कठीण आहे. ते काम शांतीलाल मुथा, प्रविण पारख आदि त्यांच्या सहकाऱ्यांनी व पुर्ण समाजाने केले आहे. हा आदर्श इतर समाजाने ही घ्यावा. खुप देण्यासारखे नसेल, पण जे आहे ते,पर्यायाने दिले पाहिजे.
    राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साखला म्हणाले,महाराष्ट्राच्या अर्ध्याधिक भागात पर्जन्यवृष्टी मुळे शेती सह, पशुधनाचे नुकसान झालेले आहे.यासाठी भारतीय जैन संघटना व अर्हम् ग्रुप नम्र मुनी यांच्या सहकार्याने सुका चारा जनावरांना उपलब्ध करुन दिला जात आहे.1 हजार टन चारा महाराष्ट्रातील क्षतीग्रस्त भागात पोहविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
error: Don't Try To Copy !!