जामनेर, प्रतिनिधी
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, भुसावळ आयोजित स्व. बाबासाहेब के. नारखेडे स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, जामनेर ची आर्या विजय सैतवाल इयत्ता पाचवी हिने प्रथम क्रमांक मिळविला. टिफीन बॉक्स आणि माझे आरोग्य हा तिच्या निबंधाचा विषय होता. राज्यभर नावलौकिक असलेली ही शालेय जीवनातली महत्त्वाची स्पर्धा आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मकरंद नारखेडे यांच्या हस्ते तीला स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, १००१/- रुपये रोख, पुस्तके प्रदान करण्यात आले. याप्रसंगी श्रीनिवास नारखेडे व संस्थेचे संचालक उपस्थित होते. आर्या ही मालदाभाडी हायस्कूल चे वृक्षमित्र विजय सैतवाल व जैनालॉजी च्या अभ्यासक सौ.सुनिता विजय सैतवाल यांची सुकन्या आहे. तीला जी. आर. धांडे, समिती प्रमुख आर. आर.शिंदे, एस.एस.शिसोदे, जे. एस. राठोड, सेवानिवृत्त शिक्षक सुभाष मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पारसनाथ ट्रस्ट चे अध्यक्ष प्रकाश सैतवाल, शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. पाटील, पर्ववेक्षक सुरेश सुरवाडे, श्रीमती पी. बी. पालवे, प्रसन्न बैरागी, शेखर बाविस्कर, यांनी कौतुक केले आहे. संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, सचिव जितेंद्र पाटील यांचेसह संचालक मंडळाच्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे
