पाळधी गावातील परतीच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान,शासकीय पंचनामे करण्याची शेतकरी वर्गाची मागणी.
जामनेर तालुक्यातील पाळधी व सूनसगाव फाटा या परिसरात झालेल्या परतीच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.यावेळी शेतातील केळी,मका,कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवाल दिलं झाला आहे.आधीच या वर्षी जास्तीच्या पाऊसमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून त्यात परतीच्या पाऊस ने जोरदार तडाखा दिल्यामुळे शेतकर्यांचे पार कंबरडे मुडले आहे.या झालेल्या नुकसानीचे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहे.