वसुनंदिनी फाउंडेशनचे पुरस्कारवितरण, वर्धापन दिन उत्साहात

वसुनंदिनी फाउंडेशनचे पुरस्कार
वितरण, वर्धापन दिन उत्साहात

जळगाव : सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वसुनंदिनी फाउंडेशन संचलित एम. के. व्हेंचर जळगाव यांच्या साहित्य सरिता मंचतर्फे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अल्पबचत भवनात 8 डिसेंबर रोजी पार पडला. यात राज्यभरातील नवोदित साहित्यिकांच्या प्रकाशित झालेल्या 13 काव्यसंग्रह, कथासंग्रह यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

तसेच समाजातील उत्कृष्ट कला, क्रीडा, सामाजिकसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या 56 महिला व पुरुषांना वसुनंदिनी फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

चाळीसगावचे प्रसिद्ध लेखक विश्वास विष्णू देशपांडे अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय बहुभाषिक महासंघ अध्यक्ष सुरेश मुळे, नाशिकचे अविनाथ भिडे, लेखराज उपाध्याय, डॉ.प्रकाश शंकरराव जोशी, दिलीप दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार सुचिता कुंघटकर, कल्पना रोहिदास सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला सक्षमीकरणासाठी महिला रोजगार मेळाव्यांचे यशस्वी आयोजन करून संस्थेचे सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले म्हणून उपस्थित मान्यवरांनी संस्थेचे कौतुक केले.

पुरस्कार सोहळ्याचे यशस्वी आयोजन वसुनंदिनी फाउंडेशनचे अध्यक्ष विद्याधर सोनवणे आणि एम. के. वेंचर्स अध्यक्षा माधुरी कुलकण यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मकरंद पाटील, ललिता पाटील, सुनीता पाटील यांनी केले. अशोक पारधी व नीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

error: Don't Try To Copy !!