जामनेर सोंनबर्डी येथे स्विमिंग पुल मध्ये 15 वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु, यामुळे स्विमिंग पुल बांधकाम आणि त्यासाठी ची नियमावली बघता. स्विमिंग पूल व्यवस्थापन आणि परवानगी देणारे प्रशासन झोपा झोडत होते का??
स्विमिंग पूल हा क्रीडा प्रकारात येतो. परंतु, कोणत्या क्रीडा प्रकारासाठी सदर पुल बांधण्यात आला. त्यामुळे याला परवानगी देत असताना अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती का??
त्यानंतर पुलाची रचना बघता येथे नियमानुसार तज्ञ मार्गदर्शक आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध का नव्हत्या???
सदर पुल मध्ये उतरतांना परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु, कोणीही कसे या खोल पुलात उतरून पोहू शकते??
असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून नगरपालिका प्रशासन आणि क्रीडा विभाग वेळोवेळी तपासणी करीत होते का??
हा ही प्रश्न मोठा जिकरीचा झाला आहे.
यामुळे एका निष्पाप जीवाला हकनाक बळी जावे लागले असल्याचे मत जनमानसात आहे.
यावर आता प्रशासन कोणती कार्यवाही करते याकडे नागरिकांच्या नजरा लागून आहे. की, राजकीय वरद हस्तात प्रकरण निकाली निघेल हे बघणे औचीत्याचे ठरेल.

