श्री शामराव पाटील कुरे व सौभाग्यवती चौत्राबाई शामराव कुरे यांचा 51 वा लग्नाचा सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा

प्रतिनिधी हानुमंत चंदनकर ====================== नांदेडच्या नायगांव तालुक्यातील ताकबीड येथील श्री शामराव पाटील कुरे सौभाग्यवती चौत्राबाई शामराव कुरे यांच्या लग्नाचा 51 वा सुवर्ण महोत्सव आज दिनांक 19 मे रोजी साई तीर्थ मंगल कार्यालय नायगाव येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला त्यांच्या मुलांनी यशवंत कुरे, बसवंत कुरे, भास्कर कुरे,कैलास कुरे या चार भावांच्या संकल्पनेतून आयोजित केलेला हा सोहळा आनंदी उत्साहात संपन्न झाला यांत आई वडीलांचा आनंद साजरा करण्यासाठी विवाह प्रसंगा प्रमाणे आई वडीलांना दाग दागिने, पारंपारिक शाही पोशाख धोतर सदरा फेटा दोन अंगठी, गळ्यातील चैन आईसाठी नववधू प्रमाणे सर्व अलंकार ऐटबाज दोघांची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक लग्नाचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला

याप्रसंगी श्री केशवराव बळवंतरावजी पाटील चव्हाण, सुधाकररावजी पाटील चव्हाण व नायगांव नगरपंचायतीचे नगर उपाध्यक्ष युवा नेते विजय पाटील चव्हाण, तंटामुक्त समितीचे तालुका अध्यक्ष हनमंतराव पाटील चव्हाण, नायगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीनिवासरावजी पाटील चव्हाण, माधवरावजी बेळगे, देविदासजी बोमनाळे व जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजयजी बेळगे साहेब डॉ. शिंपाळे साहेब, डॉ. कुऱ्हाडे साहेब व पत्रकार बाळासाहेब पांडे सर, चंदनकर सर, राम मोरे सर व नगरसेवक संजय पा. चव्हाण, शिवाजी पा. कल्याण नगरसेवक विठ्ठल आप्पा बेळगे, नगरसेवक पांडुरंग पा. चव्हाण, साहेबराव पा शिंदे, माधव शंकरराव बेळगे, दत्तात्रय शिंदे सर, पवन गादेवार, बसंतराव मुंके सुभाषराव मुंके आणि चव्हाण पाटील मित्र मंडळ व ताकबीड येथील सरपंच रंजीत पा. कुरे, सराफा व्यापारी ज्ञानेश्वर सावकार कवटीकवर, हनमंत पा. चव्हाण कैलास पा. कल्याण व इतर सर्व सराफा व्यापारी व किराणा व्यापारी रमेश सावकर चिद्रावार प्रकाश सावकार कवटीवार अनिल गादेवार व सर्व किराणा व्यापारी तसेच सौभाग्यवती चौत्राबई शामराव कुरे यांचे माहेर लालवंडी येथील बाबुरावजी लंगडापुरे ,भगवानरावजी लंगडापुरे व शंकररावजी दगडगावे विश्वनाथजी केरुरे पिराजी भुसेवाड बाबुराव दगडगावे व लालवंडी, ताकबीड व नायगाव येथील सर्व नागरिक कुरे परिवारातील सर्व बाईलेकीचे पाहुणे मंडळी व करामुंगे,शिराळे, जनकवाडे, परिवार, व इतर सर्व आप्तस्वकीय नातेवाईक यांसह परिसरातील नागरिक उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमात आई-वडिलांबद्दल या चार भावंडांनी केलेला हा आई-वडिलांचा सोहळा आज उपयोगी समाजाला प्रेरणादायी ठरू शकते असे मनोगत व्यक्त केले आणि या चार भावंडांचे कौतुक व शुभेच्छा रुपी आशीर्वाद दिले व मोलाचे मार्गदर्शन नगर पंचायत उपाध्यक्ष विजयजी पाटील चव्हाण ,संजयजी बेळगे साहेब व सौ. सरोजिनी शिंपाळे मॅडम यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना व्यंकट पाटील शिंदे व कार्यक्रमाचे आभार कैलास कुरे यांनी केले

error: Don't Try To Copy !!