जामनेर तालुक्यातील पाळधी येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते विश्वजीत मनोहर पाटील यांची खासदार शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने तसेच प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या मान्यतेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी विश्वजीत मनोहर पाटील यांची नियुक्ती केली आहे.
यावेळी निवडीचे पत्र देताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, युवकचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख हे उपस्थित होते.
यावेळी जळगाव ग्रामीण चे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी बोलतांना सांगितले की, खा.शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार पक्षाचे ध्येय धोरणे घराघरात पोहचविण्याचे कार्य करणार असून पक्षाला बळकटी देऊन पक्ष वाढविण्याचे काम करणार आहे.तसेच युवकांचे प्रश्न व सर्वसामान्य युवकांच्या विकासाच्या दृष्टीने काम करणार असल्याचे सांगितले.
त्यांच्या या निवडीचे जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संपर्क प्रमुख डॉ.मनोहर पाटील,ज्येष्ठ नेते दिलीप खोडपे,दिगंबर दादा पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हार्दिक अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
