शेंदुर्णीच्या खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत ६ सुवर्ण ६ रजत व ३ कांस्य पदकांची कमाईराज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

शेंदुर्णी ता जामनेर … क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धा नुकत्याच क्रीडा संकुल जळगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या .
शेंदुर्णी येथील श्री छत्रपती स्पोर्ट्स क्लब च्या तायक्वांडो खेळांडूनी झालेल्या शालेय विभागीय तायक्वांडो स्पर्धेत ६ सुवर्ण , ६ रौप्य व ३ कांस्य पदक प्राप्त केले, सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूची १३ आक्टो ते १७ आक्टो दरम्यान संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धे साठी निवड झाली .

आ.ग.र.गरुड विद्यालय

1 ) कामिनी विश्वनाथ नाथ सुवर्ण पदक
2)दक्ष विठ्ठल लोखंडे सुवर्ण पदक
3)आर्यन शांताराम वानखेडे सुवर्ण पदक
४) रागिणी सिद्धेश्वर पाटील सुवर्ण पदक
५) विनायक योगेश जावरे रजत पदक
६)प्रद्युम्न सचिन जगताप रजत पदक
७) साहिल प्रवीण शेलार रजत पदक
८) चिन्मय सुर्वे रजत पदक
९) दृष्टी नितीन भारुडे कांस्य पदक
१०)आरुषी वाघ कांस्य पदक

श्रीकृष्ण माध्य.विद्यालय
१)राधिका राजेंद्र गवळी सुवर्ण पदक
२) नेहा संदीप गुजर रजत पदक
३) तनिष्का बाळू सुळ रजत पदक
४) उमेश दिलावर तडवी कांस्य पदक

निर्मल इंटरनॅशनल स्कूल
१) सर्वम संजय राजपूत सुवर्ण पदक असे यश संपादन केले.
सदर खेळाडूना शेंदुर्णी येथील छत्रपती स्पोर्ट्स क्लब चे प्रशिक्षक लोचना चौधरी व मोहित चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले
या यशा बद्दल खेळाडूंचे जळगाव जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल जोनवाल सचिव राजेंद्र जंजाळे सहसचिव श्रीकृष्ण चौधरी सर संचालक सुनिल मोरे श्री छत्रपती स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील शेंदुर्णी एज्युकेशन सोसा चे अध्यक्ष संजयदादा गरुड,सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र गुजर यांनी अभिनंदन केले आहे.

error: Don't Try To Copy !!