अंशतः अनुदानित शिक्षकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीस यांचा शब्द – ‘शिक्षकांना न्याय मिळणार’आ. किशोर दराडे सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने शिक्षक आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक; अधिवेशनात तोडग्याची हमी

नाशिक (प्रतिनिधी) – राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या लढ्याला मोठे यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आ. किशोर दराडे सत्यजित तांबे यांच्या आग्रही पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिक्षक आमदारांची निर्णायक बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ठाम शब्द देत, “शिक्षकांवर अन्याय होणार नाही. शासनाकडून विलंब झाला असला, तरी यंदाच्या अधिवेशनात शिक्षकांना निश्चित दिलासा मिळेल,” अशी ग्वाही दिली.आ. किशोर दराडे यांचा आक्रमक पाठपुरावाशिक्षकांच्या मागण्यांसाठी आ. किशोर दराडे यांनी नाशिकमध्ये शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी थेट राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. आ. सत्यजित तांबे, विक्रम काळे आ. किरण सरनाईक आणि आ. जयंत तासगावकर यांच्यासह त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना गती देण्याची मागणी केली.मुख्यमंत्र्यांचे आश्वासनमुख्यमंत्र्यांनी 14 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झालेल्या 20% वाढीव वेतन अनुदानाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी रखडल्याची बाब मान्य केली. “लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असे सांगत त्यांनी शिक्षकांना दिलासा दिला. आगामी अधिवेशनात आर्थिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करून शिक्षकांच्या मागण्यांवर ठोस तोडगा काढण्याचे प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.शिक्षकांमध्ये नव्या आशेचा संचारमुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे आंदोलनात सहभागी शिक्षकांमध्ये उत्साह आणि नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. नाशिकसह राज्यभरातील शिक्षक संघटना एकजुटीने लढत असून, आ. किशोर दराडे यांच्या राजकीय पाठबळामुळे आंदोलनाला बळ मिळाले आहे. अधिवेशनात शिक्षकांना न्याय मिळण्याची अपेक्षा आता वाढली आहे.‘शिक्षकांचा लढा यशस्वी होणार!’या सकारात्मक घडामोडींमुळे शिक्षकांचा आवाज आता शासनापर्यंत पोहोचला असून, अधिवेशनातील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यासाठी महासंघाचे अध्यक्ष डॉ संजय शिंदे , ‘शिक्षक सेना प्रा. संजय चव्हाण ,शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अनिल परदेशी, सुभाष पवार, कर्तरसिंग ठाकूर, रवी पवार ,प्रकाश तायडे, तसेच जुक्टो संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील गरुड ,शैलेश राणे ,नंदन वळींकार, सुनील सोनार यासह मोहन चकोर आधी पदाधिकारी यांनी आमदार किशोर दराडे, सत्यजित तांबे, विक्रम काळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

Read More
error: Don't Try To Copy !!