शहापूर धरणाजवळ भीषण अपघात बसच्या धडकेत एस.टी. कंडक्टर ईश्वर कंडागळे यांचा मृत्यू – गावात शोककळा

जामनेर (२५ ऑगस्ट):जे रोज प्रवाशांच्या जीवाची काळजी घेत बसने सुरक्षित घरी पोहोचवत होते… त्यांचेच जीवन बसच्या चाकाखाली संपले अशा शब्दांत आज गावकऱ्यांनी ईश्वर अरुण कंडागळे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील ईश्वर कंडागळे (वय 33) हे एस.टी. महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत होते. आज सायंकाळी शहापूर धरणाजवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर कंडागळे हे स्वतःच्या दुचाकीवरून जात असताना एस.टी. बस (क्र. MH 20 BL 3360) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर एवढा भीषण होता की ते जागीच कोसळले आणि मृत्यूने त्यांना कवटाळले.विडंबना म्हणजे ज्यांनी आयुष्यभर प्रवाशांची सेवा केली, त्यांचाच जीव अखेर एस.टी. बसच्या धडकेत गेला. या घटनेने सहकारी व ग्रामस्थ स्तब्ध झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.अपघातानंतर नागरिकांनी धाव घेत तात्काळ मदत केली. ईश्वर कंडागळे यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चिंचखेडा गाव शोकसागरात बुडाले आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मिळाली

Read More

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या अबिद हुसेन यास फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी शेंदुर्णीत प्रचंड मुक मोर्चा हजारो पुरुष महिलांचा सहभाग

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधीशेंदुर्णी येथील अबिद हुसेन शेख याने तो ज्या शाळेच्या बसवर चालक होता त्याच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी बलात्कार केला असुन याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी आरोपी व त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने मुक मोर्चा वाडी दरवाजा भागातुन काढण्यात आला.शहरातील मुख्य मार्गाने हा मुक मोर्चा शेंदुर्णी दुरक्षेत्र येथे पोहचला.या मोर्चात युवती, महिला, पुरुष यांचा मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग होता.हजारोच्या संख्येने हिंदु बांधव आरोपी यास फाशी झाली पाहिजे,लव्ह जिहाद बाबत फलक घेऊन मुक मोर्चात यात सहभागी झाले होते. यावेळी प्रखर वक्ते बजरंग दलाचे सह संयोजक प्रा.आशिष दुसाने,पुणे यांनी आपल्या घणाघाती भाषणात लव्ह जिहाद,हिंदु मुलींवर कसं जाळं फेकले जाते, त्यांना हळूहळू कसं अटकवलं जाते,मग मैत्री प्रेमाचं नाटक व नंतर लग्नाच्या साठी ब्लॅक मेल करुन धर्मांतर केले जाते यासाठी मोठं षडयंत्र असुन हिंदुंनी जागृत रहावे.मुलींना दुर्गा वाहीनीत तर मुलांना संघाच्या शाखेत पाठवावे आपण आपल्या धर्मासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.आरोपी व त्यांच्या सर्व साधीदाराला सुद्धा कडक शिक्षा व्हावी यासाठी जागृत राहुन ही प्रवृत्ती कायमस्वरूपी नष्ट व्हावी यासाठी सतर्क जागृत रहावे असे आवाहन केले.यावेळी उत्फुर्तपणे महिलांच्या वतीने सौ.लिना मनोज चव्हाण यांनी जोषपुर्ण भाषण केले व महिला मुलींना मार्गदर्शन केले. सकल हिंदु समाजाच्या वतीने विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सह मंत्री भिका इंदरकर यांनी प्रास्ताविक केले व निवेदनाच्या मागण्या वाचुन दाखवल्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी रचनात्मक हा मुक मोर्चा असल्याचे सांगितले पहुर पोलिस व पिंपळगाव हरेश्वर पोलिस यांचे आभार मानले. मोर्चात सहभागी महिलांनी याबाबतचे निवेदन पोलिस उपअधीक्षक अरुण आव्हाड,पहुरचे सपोनि.प्रमोद कठोरे शेंदुर्णी दुर क्षेत्र चे पोउनि.नंदकुमार शिंंब्रे यांना दिले.सपोनि.प्रमोद कठोरे यांनी सांगितले की आपल्या निवेदनाची दखल घेऊन वरिष्ठांना याबाबत कळवले जाईल असं आश्वासन दिले.यासाठी विश्व हिंदु परिषदेच्या तालुका पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले

Read More

७० वर्षाची परंपरा जोपासत श्रीराम पेठेत बारागाड्या उत्साहात साजर्‍या.

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर /प्रतिनिधी – आपले सण आपले उत्सव आपणचं साजरे करणार या ब्रिद वाक्याखाली पारंपरिक पद्धतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य बारागाड्या उत्सव शहरातील श्रीराम पेठ भागातील दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत ओढल्या गेल्या स्व. देवचंदबाबा शिंदे यांच्या प्रेरणेने सुरु केलेल्या बारागाड्या उत्सवाला आज सुमारे ७० वर्षाची परंपरा लाभली आहे. सविस्तर माहिती अशी श्रीराम पेठ भागात असलेले श्रीराम पेठ वासियांचे ग्रामदैवत तथा आराध्य दैवत असलेले खंडेराव महाराज यांच्या नावाने या भागात बारागाड्या ओढल्या जातात. या उत्सवास आज ७० वर्षाची परंपरा लाभली आहे सामाजिक एकात्मता हिच श्रीराम पेठ वासियांची ओळख असल्याने हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सद्ध्या तरी या बारागाड्या उत्सव काठीचा मान हा शिंदे परीवारा कडे असुन श्रीराम पेठ भागातील रहिवाश्यांकडुन तसेच शिंदे परीवारातील सदस्यांनी हा पारंपरिक व पुरातन वारसा कायम ठेवला आहे. दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत या बारागाड्या ओढल्या जातात तर पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने भाविक या उत्स्वात हजारोंच्या संख्येने सहभागी होत सोहळा साजरा करतात तर “खंडेराव महाराज की जय” तर “येळकोट येळकोट जय मल्हार” या घोषणांनी आसमान दणाणून सोडला जातो. आज जरी श्रीराम पेठ भागातील रहिवासी शहराच्या अन्य भागात विखुरलेले असले तरी आजच्या दिवशी लहान पासुन ते वयोवृद्ध व्यक्ती तसेच महिला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होतात. आज इंटरनेट युगात सुद्धा हि परंपरा टिकवून ठेवल्याचा आनंद आहे असा विश्वास श्रीराम पेठ भागातील रहिवासी मान्य करतात. त्यामुळे हिच सामाजिक एकता शहरात कुतुहलाचे मुख्य कारण ठरले आहे हा भव्य दिव्य सोहळा मोबाईलच्या कॅमेर्‍यात भाविकांनी कैद केला. खोबरे भंडाऱ्याची उधळण करुन मोठ्या धार्मिक वातावरणात नियोजित भक्तां करवी बारागाड्या ओढल्या जातात तर बारागाड्या ओढल्या नंतर उडीद व भाकर भंडाऱ्याची तथा महाप्रसादाचा लाभ भाविक घेत असतात या महाप्रसाद वाटपासाठी खंडेराव महाराज सेवा समिती कार्यान्वित असते.

Read More

भारतीय स्वातंत्र्य दिवस आणि भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शांतीलाल मुथा यांच्या वाढदिवस हा दुहेरी संयोग

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर यानिमित्त जामनेर शाखेचे सर्व पदाधिकारी जळगाव जवळील दीपस्तंभ फाउंडेशनच्या “मनोबल प्रकल्पाला” भेट देऊन सदर प्रकल्पाला ₹ 11000 चा धनादेश देऊन मदत केली. देशामध्ये कुठेही नैसर्गिक आपत्ती असल्यास सढळ हाताने मदत करणारे संघटनेचे सर्वेसर्वा शांतीलालजी मुथा सरांना आतापर्यंत खूप सारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.मुथा सरांनी वाघोली येथे भूकंपग्रस्त, अनाथ,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य यांच्यासाठी निवासी वसतिगृह आणि 1 ली ते 12 वी पर्यंत मोफत शिक्षण पूर्ण करू शकतात अशी सुविधा केली आहे.आजपर्यंत 4500 विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. मनोबल हा भारतातील पहिला पूर्ण निवासी प्रशिक्षण प्रकल्प आहे, जो स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकासासाठी मोफत कोचिंग पुरवतो.विशेषत: दिव्यांग व्यक्ती, अनाथ विद्यार्थी, ट्रान्स युवक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी जळगावपासून फक्त 5 किमी अंतरावर असलेल्या कुसुंबा गावात सुमारे 3 एकर (1,00,000 चौरस फूट) परिसरात हा प्रकल्प वसलेला आहे.आजपावेतो 1,385 पेक्षा अधिक दिव्यांग विद्यार्थी, 224 अनाथ विद्यार्थी, आणि 3,940 आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांना आधार देऊन स्वयंरोजगार,शासकीय नोकऱ्या आणि खाजगी क्षेत्रात रोजगार, अशा प्रकारे प्रभावी करिअर मार्गदर्शन देण्यात येतो. सदर कार्यक्रमात विनयजी पारख सर आणि सौ संगीता मंडलेचा यांनी संघटनेबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात बीजेसचे विनयजी पारख-राज्य उपाध्यक्ष,सुमित मुनोत-खानदेश उपाध्यक्ष, विकास कोठारी-जिल्हा उपाध्यक्ष, संकल्प लोढा-शहर सचिव,दर्शन बागमार-सदस्य,तसेच सौ संगीता मंडलेचा-महिला जिल्हा सचिव,सौ मनीषा कोठारी-सदस्य,सौ वंदना चोरडिया-सदस्य,सौ जयश्री लोढा-सदस्य,मनोबलचे मातोश्री सुमती महाजन,राजेंद्र पाटील सर,सिद्धेश्वर देशमुख आणि कर्मचारी वर्ग आदी हे उपस्थित होते

Read More

महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत “हरित शिवरस्ता” उपक्रम — सोनारी – मालदाभाडी रस्त्यावर दुतर्फा वृक्षारोपण!

जामनेर तालुका महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत सोनारी – मालदाभाडी शिवरस्त्यावर दुतर्फा वृक्ष लागवड मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमामागील उद्देश शिवरस्त्याच्या अधिकृत हद्दीत कोणतेही अतिक्रमण होऊ नये आणि पर्यावरणपूरक व हरित ग्रामविकासास चालना देणे हा होता. यासाठी मोजणी विभागाने निश्चित केलेल्या सीमारेषेनुसार रस्ता हद्द निश्चित करून, त्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करण्यात आले. या प्रेरणादायी उपक्रमात मंडळ अधिकारी मालदाभाडी, ग्राम महसूल अधिकारी मालदाभाडी, सोनारी व वाघारी, सोनारी व मालदाभाडी येथील सरपंच, पोलीस पाटील, तसेच ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले. कार्यक्रमात शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली. “झाडे लावा, झाडे जगवा”, “शिवरस्त्याला हरित कवच” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या उपक्रमाच्या माध्यमातून महसूल विभागाने एक नवा पायंडा पाडत, शासनाच्या महसूल रस्त्यांच्या जतनासोबतच हरित विकासाचा नवा मार्ग निर्माण केला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत वृक्षांची देखभाल व संरक्षणाची जबाबदारीही स्वीकारण्यात आली आहे. ⸻ “हरित शिवरस्ता – सुरक्षित व सुंदर ग्रामविकासाचा पाया!”

Read More

कॅरमच्या पटावर रंगली चुरस! लॉर्ड गणेशा स्कूलमध्ये तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न:

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे; जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय; तसेच जामनेर पंचायत समिती शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूल, जामनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटांतील मुला-मुलींसाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद् घाटन शाळेचे संचालक दीपक पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाले. त्यानंतर प्राचार्य धनंजय सिंग यांनी कॅरम बोर्डवर स्ट्राइकर मारून स्पर्धेचा अधिकृत प्रारंभ केला. या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये तालुका क्रीडा संयोजक डॉ. आसिफ खान, अंजुमन हायस्कूलचे मुख्याध्यापक शेख जलाल, इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार, तसेच राजेंद्र चौधरी (सावित्रीबाई फुले,पहूर), तुषार पाटील (अ.चि.पाटील,रोटवद), रामचंद्र मालुसरे (जैन इंटरनॅशनल), जहीर खान (पोदार जिनियस), फसउद्दीन (जि.प. कन्या शाळा), विनोद नाईक (सहकार विद्या मंदिर,फत्तेपुर) आदींचा समावेश होता. स्पर्धेचे सूत्रसंचालन भाविका शेळके व प्रिन्स धुंदाळे (लॉर्ड गणेशा स्कूल) यांनी सुरेखरीत्या केले. एकूण १०४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला रंगत आणली. निर्णायक म्हणून डॉ.आसिफ खान, प्रा.समीर घोडेस्वार, नरेंद्र पाटील, आनंद मोरे, अमोल भालेराव, शाहिद शेख व आसिफ शेख यांनी परिश्रम घेतले. 🏆स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:🔹 १४ वर्षे मुले:अनुराग प्रशांत चव्हाण (सहकार विद्या मंदिर फत्तेपूर)आयान असिफ शेख (जि.प. उर्दू स्कूल), हर्षल सुनील राऊत (सावित्रीबाई फुले,पहूर), मोहम्मद साईम सलाम (अंजुमन स्कूल), अभिमन्यू अनिल घोंगडे (सावित्रीबाई फुले पहूर), शकील शेख (जिनियस स्कूल) 🔹 १४ वर्षे मुली:मोक्षदा योगेश पाटील, साची राहुल जैन(लॉर्ड गणेशा स्कूल), श्रुती अविनाश पवार( जिनियस स्कूल), हिरण्या संतोष सावकारे (जैन इंटरनॅशनल स्कूल ), खदिजा जुबेर अहमद खान (अंजुमन स्कूल), चैतन्य राहुल जैन (जैन इंटरनॅशनल स्कूल) 🔹 १७ वर्षे मुले:वहीद्दोनी वसीम शेख,मोहंमद हशिर मुश्ताक अहमद शेख,अबुझर नयिम सैय्यद, (अंजुमन उर्दू हायस्कूल),राज विजय पाटील, भावेश संदीप बिडे, विनीत रवींद्र खोडपे( लॉर्ड गणेशा स्कूल) 🔹 १७ वर्षे मुली:तनिषा दीपक लोढा (लॉर्ड गणेशा स्कूल), असियानाज जहिरोउद्दिन शेख, (अंजुमन हायस्कूल), डिंपल विशाल जैन(लॉर्ड गणेशा स्कूल), यशिका सुमित धारिवाल (लॉर्ड गणेशा स्कूल), झोया फातेमा निजामुद्दीन काझी(अंजुमन हायस्कूल), मनस्वी मनोज तिजरे( जैन इंटरनॅशनल स्कूल) 🔹 १९ वर्षे मुले:आर्यन प्रदीप चिंचकर, भावेश जगन्नाथ कापडे, स्वप्निल रणजीत राजपूत, संस्कार रमेश महाजन, अएफाज जावीद बेग(इंदिराबाई ललवाणी विद्यालय, जामनेरपुरा) 🔹 १९ वर्षे मुली:साक्षी मनोज माळी, साक्षी राजेंद्र तेली, प्रतीक्षा किरण वाघ, (इंदिराबाई ललवाणी जामनेरपुरा)असीन हरुण तडवी, वैष्णवी सुभाष गायकवाड, हर्षदा मनोज वाघ जैन (इंटरनॅशनल स्कूल जामनेर) वरील सर्व खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत.

Read More

नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे (मि)शाळेत वृक्षारोपण

आज दि २५ जुलै २०२५ रोजी पळासखेडा( मिराचे) तालुका जामनेर येथील नि पं. पाटील विद्यालयात वृक्षारोपण संपन्न झाले.श्रावण मासारंभ चे औचित्य साधून आज विद्यालयात धी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन बापूसाहेब श्री. भीमराव पाटील यांच्या हस्ते व त्याचबरोबर विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक श्री. डी .पी .पाटील सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री पवार बाबा यांचे हस्ते ५० मोठ्या रोपांची लागवड करण्यात आली. मे महिन्याच्या वादळात विद्यालयातील उन्मळून पडलेल्या वृक्षांच्या जागेवर पुन्हा जेसीबीने मोठे खड्डे तयार करून तिथे रोपांची लागवड करण्यात आली.रोपांची लागवड केल्यावर त्या खड्ड्यांमध्ये शेणखत मिश्रित काळी माती टाकण्यात आली.विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी प्रत्येकी एक व त्यापेक्षा जास्त रोपांसाठी आर्थिक योगदान दिले.त्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या संकल्पनेतून एक शिक्षक, शिक्षिका व चार विद्यार्थी त्या रोपांचे जतन व संवर्धन करतील त्या अनुषंगाने प्रत्येक टीमला एक रोप दत्तक घेण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही.आर.पाटील सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.जे.आर. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने व सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Read More

माजी सभापतींच्या पतीची आत्महत्या; चिठ्ठ्या सापडल्याने गूढ वाढले

जामनेर, ता.२२ (प्रतिनिधी) जामनेर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनबर्डी परिसरातील एका निर्जनस्थळी माजी सभापती सुनंदाबाई पाटील यांचे पती प्रल्हाद पाटील (वय ६२, रा. मोयखेडा, ता. जामनेर) यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून, मयत प्रल्हाद पाटील यांच्या खिशात काही चिठ्ठ्या सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याने आत्महत्येमागील गूढ वाढले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोयखेडा येथील रहिवासी असलेले प्रल्हाद पाटील यांनी आज संध्याकाळी सोनबर्डी परिसराच्या मागील बाजूस असलेल्या एका निर्जनस्थळी झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. प्रल्हाद पाटील हे व्यवसायाने शिक्षक होते आणि त्यांनी २०२१ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्याच सुमारास त्यांच्या पत्नी सुनंदाबाई पाटील जामनेर पंचायत समितीच्या सभापती म्हणून कार्यरत होत्या.घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्रल्हाद पाटील यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठ्यांमुळे आत्महत्येमागे काही कारण असावे असा पोलिसांना संशय आहे. जामनेर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.प्रल्हाद पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येने मोयखेडा आणि जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि शालेय गणवेश वाटप करून तोंडापूर विद्यालयात संस्था वर्धापन दिन उत्साहात संपन्न….

तोंडापूर येथील श्रीमती र. सु.जैन माध्यमिक विद्यालयात शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा 81 वा वर्धापन दिन, एस.एस.सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून व वस्तीगृहातील सर्व विद्यार्थी तसेच इतर गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.नामदेव पल्हाळ हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी.रोनखेडे यांनी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा इतिहास व शाळेने वर्षभरात केलेली उज्वल कामगिरी आपल्या प्रास्ताविकातून सादर केली. तद्नंतर वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची मनोगते सादर करण्यात आली. त्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. एस.एस.सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, भेटवस्तू व बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संस्थेबद्दल ऋण व्यक्त केले. क्रीडा स्पर्धेतील खेळाडू व सीड्स बॉल तयार करण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला.याप्रसंगी जामनेर येथील दातृत्व लाभलेले व्यक्तिमत्व महेंद्र सोनवणे व ज्योती सोनवणे या दांपत्याकडून सालाबाधाप्रमाणे वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना व शाळेतील इतर गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना तब्बल 20 हजार रुपये किमतीचे गणवेश मान्यवरांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आले. यावेळेस सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलून आलेला होता.स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष दिगंबर पाटील तसेच कुंभारी येथील माजी सरपंच सुरता जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण नामदेव पल्हाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.सी.लोडते यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. एस.देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते शालेय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Read More

प्रविण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

प्रविण दादा गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कार्यवाहीची मागणी!!संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, बामसेफ यांच्यासह परिवर्तन वादी संघटना कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !!! शिवतीर्थावर प्रवीण गायकवाड यांच्या प्रतिमेस घातला दुग्धाभिषेक!!! ! जळगाव (प्रतिनीधी)जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ बामसेफ यांच्यासह परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा.प्रविणदादा गायकवाड यांच्या प्रतिमेस शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ दुग्धाभिषेक करून प्रविणदादा यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याच्या आरोपींना अटक करुन या घटनेची सखोल चौकशी करत कठोर कार्यवाही व्हावी या बाबत खालील आशयाचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले रविवार १३ जुलै २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रविणदादा गायकवाड यांच्यावर काही गुंड प्रवृतींच्या लोकांनी शाईफेक करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत भ्याड हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून हा हल्ला फक्त प्रविणदादा यांच्यावर नसून हा हल्ला या देशातील तमाम शिवराय – फुले – शाहु – आंबेडकर यांच्या समता , बंधुता व न्यायाच्या तत्वांवर चालणाऱ्या विचारवंतांवर असून यापूर्वी देखील या देशात याच मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा मंत्र देणारे मा.नरेंद्र दाभोळकर , कॉ.गोविंद पानसरे , पत्रकार गौरी लंकेश व ज्येष्ठ विचारवंत एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्त्या घडवून आणण्यात आल्या आहेत. प्रसारमाध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला दीपक काटे नावाचा गुंड व त्याच्या आठ ते दहा इतर गुंड साथीदारांनी मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु स्थानिक पोलिसांनी या आरोपींना अटक न करता सोडून दिले आहे. तरी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने या प्रकरणात बारकाईने लक्ष देत या हल्ल्यातील सर्व आरोपी व त्यांच्या मागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अन्यथा याच पद्धतीने विचारवंतांना संपवण्याचे प्रयत्न सुरु राहिल्यास महात्मा गांधीच्या अहिंसेच्या विचारांवर चालणाऱ्या भारत देशाची प्रतिमा जगात मलीन होऊन हा देश अराजकतेच्या मार्गावर जाण्यास वेळ लागणार नाही. यावेळी संभाजी ब्रिगेड सामाजिक चे प्रदेश संघटक श्याम पाटील , जिल्हाध्यक्ष तुषार सांवत , संभाजी ब्रिगेड राजकीय चे जळगाव पुर्व जिल्हा प्रदिप गायके, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष विजय पाटिल शहर कार्याध्यक्ष मयूर चौधरी , लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे , बामसेफचे मुकुंद सपकाळे , मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील , सुरेंद्र पाटील , राम पवार , शोभाराम प्रतिष्ठाचे नरेंद्र पाटील , अनिरुद्ध शिसोदे , शुभम पवार , गणेश पाटील,कल्पेश पाटील, भरत पाटील, अविनाश पाटील ,संदीप मांडोळे, सतीश लाठी, राकेश राजपूत, राकेश जैन, संदीप पाटील,रवींद्र पाटील, धवल पाटील,प्रमोद पाटील,राहुल पाटील,संजय चव्हाण,सुमित्र अहिरे, देवानंद निकम,रवींद्र तायडे,देशमुख साहेब यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Read More
error: Don't Try To Copy !!