भारतीय स्वातंत्र्य दिवस आणि भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शांतीलाल मुथा यांच्या वाढदिवस हा दुहेरी संयोग

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर

यानिमित्त जामनेर शाखेचे सर्व पदाधिकारी जळगाव जवळील दीपस्तंभ फाउंडेशनच्या “मनोबल प्रकल्पाला” भेट देऊन सदर प्रकल्पाला ₹ 11000 चा धनादेश देऊन मदत केली. देशामध्ये कुठेही नैसर्गिक आपत्ती असल्यास सढळ हाताने मदत करणारे संघटनेचे सर्वेसर्वा शांतीलालजी मुथा सरांना आतापर्यंत खूप सारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.मुथा सरांनी वाघोली येथे भूकंपग्रस्त, अनाथ,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य यांच्यासाठी निवासी वसतिगृह आणि 1 ली ते 12 वी पर्यंत मोफत शिक्षण पूर्ण करू शकतात अशी सुविधा केली आहे.आजपर्यंत 4500 विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

मनोबल हा भारतातील पहिला पूर्ण निवासी प्रशिक्षण प्रकल्प आहे, जो स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकासासाठी मोफत कोचिंग पुरवतो.विशेषत: दिव्यांग व्यक्ती, अनाथ विद्यार्थी, ट्रान्स युवक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी जळगावपासून फक्त 5 किमी अंतरावर असलेल्या कुसुंबा गावात सुमारे 3 एकर (1,00,000 चौरस फूट) परिसरात हा प्रकल्प वसलेला आहे.
आजपावेतो 1,385 पेक्षा अधिक दिव्यांग विद्यार्थी, 224 अनाथ विद्यार्थी, आणि 3,940 आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांना आधार देऊन स्वयंरोजगार,शासकीय नोकऱ्या आणि खाजगी क्षेत्रात रोजगार, अशा प्रकारे प्रभावी करिअर मार्गदर्शन देण्यात येतो. सदर कार्यक्रमात विनयजी पारख सर आणि सौ संगीता मंडलेचा यांनी संघटनेबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात बीजेसचे विनयजी पारख-राज्य उपाध्यक्ष,सुमित मुनोत-खानदेश उपाध्यक्ष, विकास कोठारी-जिल्हा उपाध्यक्ष, संकल्प लोढा-शहर सचिव,दर्शन बागमार-सदस्य,तसेच सौ संगीता मंडलेचा-महिला जिल्हा सचिव,सौ मनीषा कोठारी-सदस्य,
सौ वंदना चोरडिया-सदस्य,सौ जयश्री लोढा-सदस्य,मनोबलचे मातोश्री सुमती महाजन,राजेंद्र पाटील सर,सिद्धेश्वर देशमुख आणि कर्मचारी वर्ग आदी हे उपस्थित होते

error: Don't Try To Copy !!