जामनेर तालुक्यातील टाकळी (बुद्रुक) गावात शुक्रवारी (दि. २२ ऑगस्ट) संध्याकाळच्या सुमारास भीषण घटना घडली. गावातील निलेश मुरलीधर माळी (वय ४३) या व्यक्तीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला असून, ही घटना गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत निलेश माळी आपल्या काही मित्रांसह
गावाबाहेरील एका विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याने विहिरीत उडी घेतली असता, डोक्याला जोराचा मार लागून तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला पाण्यातून वर येता आले नाही आणि त्याचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.घटनेनंतर मित्र व ग्रामस्थांनी तातडीने प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर त्याला तातडीने जामनेर येथील सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले.