
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे; जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय; तसेच जामनेर पंचायत समिती शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूल, जामनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
१४, १७ आणि १९ वर्षे वयोगटांतील मुला-मुलींसाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद् घाटन शाळेचे संचालक दीपक पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाले. त्यानंतर प्राचार्य धनंजय सिंग यांनी कॅरम बोर्डवर स्ट्राइकर मारून स्पर्धेचा अधिकृत प्रारंभ केला.
या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये तालुका क्रीडा संयोजक डॉ. आसिफ खान, अंजुमन हायस्कूलचे मुख्याध्यापक शेख जलाल, इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार, तसेच राजेंद्र चौधरी (सावित्रीबाई फुले,पहूर), तुषार पाटील (अ.चि.पाटील,रोटवद), रामचंद्र मालुसरे (जैन इंटरनॅशनल), जहीर खान (पोदार जिनियस), फसउद्दीन (जि.प. कन्या शाळा), विनोद नाईक (सहकार विद्या मंदिर,फत्तेपुर) आदींचा समावेश होता.
स्पर्धेचे सूत्रसंचालन भाविका शेळके व प्रिन्स धुंदाळे (लॉर्ड गणेशा स्कूल) यांनी सुरेखरीत्या केले. एकूण १०४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला रंगत आणली.
निर्णायक म्हणून डॉ.आसिफ खान, प्रा.समीर घोडेस्वार, नरेंद्र पाटील, आनंद मोरे, अमोल भालेराव, शाहिद शेख व आसिफ शेख यांनी परिश्रम घेतले.

🏆स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:
🔹 १४ वर्षे मुले:
अनुराग प्रशांत चव्हाण (सहकार विद्या मंदिर फत्तेपूर)
आयान असिफ शेख (जि.प. उर्दू स्कूल), हर्षल सुनील राऊत (सावित्रीबाई फुले,पहूर), मोहम्मद साईम सलाम (अंजुमन स्कूल), अभिमन्यू अनिल घोंगडे (सावित्रीबाई फुले पहूर), शकील शेख (जिनियस स्कूल)
🔹 १४ वर्षे मुली:
मोक्षदा योगेश पाटील, साची राहुल जैन(लॉर्ड गणेशा स्कूल), श्रुती अविनाश पवार( जिनियस स्कूल), हिरण्या संतोष सावकारे (जैन इंटरनॅशनल स्कूल ), खदिजा जुबेर अहमद खान (अंजुमन स्कूल), चैतन्य राहुल जैन (जैन इंटरनॅशनल स्कूल)
🔹 १७ वर्षे मुले:
वहीद्दोनी वसीम शेख,
मोहंमद हशिर मुश्ताक अहमद शेख,अबुझर नयिम सैय्यद, (अंजुमन उर्दू हायस्कूल),
राज विजय पाटील, भावेश संदीप बिडे, विनीत रवींद्र खोडपे( लॉर्ड गणेशा स्कूल)

🔹 १७ वर्षे मुली:
तनिषा दीपक लोढा (लॉर्ड गणेशा स्कूल), असियानाज जहिरोउद्दिन शेख, (अंजुमन हायस्कूल), डिंपल विशाल जैन(लॉर्ड गणेशा स्कूल), यशिका सुमित धारिवाल (लॉर्ड गणेशा स्कूल), झोया फातेमा निजामुद्दीन काझी
(अंजुमन हायस्कूल), मनस्वी मनोज तिजरे( जैन इंटरनॅशनल स्कूल)
🔹 १९ वर्षे मुले:
आर्यन प्रदीप चिंचकर, भावेश जगन्नाथ कापडे, स्वप्निल रणजीत राजपूत, संस्कार रमेश महाजन, अएफाज जावीद बेग
(इंदिराबाई ललवाणी विद्यालय, जामनेरपुरा)
🔹 १९ वर्षे मुली:
साक्षी मनोज माळी, साक्षी राजेंद्र तेली, प्रतीक्षा किरण वाघ, (इंदिराबाई ललवाणी जामनेरपुरा)
असीन हरुण तडवी, वैष्णवी सुभाष गायकवाड, हर्षदा मनोज वाघ जैन (इंटरनॅशनल स्कूल जामनेर)
वरील सर्व खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत.
