तालुका क्रीडा नियोजन बैठक ठरली फलदायी; प्रा. समीर घोडेस्वार, ऋग्वेद पेडगांवकर व कार्तिकी लामखेडे यांचा सन्मान

जामनेर, ता.१६ जुलै:महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि पंचायत समिती, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी सहविचार सभा दिनांक १६ जुलै रोजी दुपारी ११ वा. पंचायत समिती, जामनेर येथे उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी क्रीडा अधिकारी सचिन निकम, विशाल बोडके, गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे, विस्तार अधिकारी संजय पाटील, स्पर्धा समिती सचिव जी.सी. पाटील, मुख्याध्यापक शेख जलाल, गटसाधन केंद्र समन्वयक पंकज रानोटकर यांसह तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी डॉ. आसिफ खान यांनी चालू शैक्षणिक वर्षातील विविध क्रीडा योजना, क्रीडा शिक्षकांच्या योगदानाचे सन्मान, ‘लाईफटाईम अचीवमेंट’ पुरस्कार, व विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या शाळांचा गौरव अशा महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर माहिती दिली. याशिवाय तालुक्यातील १० प्रमुख खेळांची नियोजनपूर्वक आखणी व शालेय पत्रिकेविषयी चर्चा झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी ‘माझी शाळा – सुंदर पटांगण’ ही अभिनव संकल्पना मांडून, शाळांमध्ये खेळांच्या अद्ययावत सुविधा व उत्स्फूर्त सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी उपस्थित शिक्षकांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले. या प्रसंगी विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक श्रीपाद पेडगावकर यांचे चिरंजीव ऋग्वेद यांनी इ.८ वी स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल तर वाकी बुद्रुक येथील सरपंच व क्रीडा शिक्षक ललित लामखडे यांच्या कन्या कार्तिकी हिने इ.१० वी बोर्ड परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आले. तसेच इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. समीर घोडेस्वार यांना जिल्हास्तरीय सुलभक म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन डॉ. आसिफ खान यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.समीर घोडेस्वार यांनी केले.या बैठकीस तालुक्यातील ७२ क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेच्या यशस्वीतेसाठी डी के चौधरी, नरेंद्र पाटील, व्ही एन पाटील, आनंद मोरे, पी डी पाटील, शाहिद शेख जहीर खान, देवा पाटील आदी.परिश्रम घेतले.

Read More

बिरसा फायटर्स यावल तालुकाध्यक्ष पदी गफुर तडवी यांची निवड

यावल (प्रतिनिधी फिरोज तडवी) बिरसा फायटर्स यावल तालुकाध्यक्ष मा. गफुर अरमान तडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, मा. गफुर तडवी यांनी बिरसा फायटर्सचे समाजासाठी रात्रंदिवस कार्य बघून त्यांनी बिरसा फायटर्स या सामाजिक संघटना मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली, तेव्हा बिरसा फायटर्सचे कमिटीने या विषयावर चर्चा करुन मा. गफुर अरमान तडवी यांची यावल तालुकाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, मा. गफुर अरमान तडवी यांना बिरसा फायटर्स कशाप्रकारे समाजातील विविध कार्य करते हे त्यांना सांगण्यात आलेआदिवासी समाजाच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी, आदिवासी अस्तित्व, अस्मिता, जल, जंगल, जमीन संरक्षणासाठी, आदिवासी संस्कृती, संवर्धनासाठी संविधानिक हक्क व अधिकार, आरक्षण वाचविण्यासाठी, आदिवासींवर होणा-या अन्याय अत्याचार विरोधात निवेदन देणे, पाठपुरावा करणे, प्रसंगी मोर्चा, आंदोलन, उपोषण करणे इत्यादी लोकशाही मागणी लढा देणे, न्यायिक लढाई लढणे, आदिवासी क्रांतीकारकांचे विचार जनमानसात पोहचवण्यासाठी एका वैचारिक व सामाजिक चळवळ लढाई लढण्यासाठी संघटनेची आवश्यकता होती. आदिवासी समाजाची ही गरज लक्षात घेऊन बिरसा फायटर्स या वैचारिक व सामाजिक लढाऊ संघटनेची निर्मिती केली आहे. असे बिरसा फायटर्सचे कार्य पटवून दिले बिरसा फायटर्स संघटनेत आपण सहभागी होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे आपली बिरसा फायटर्स यावल * तालुकाध्यक्ष * या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. आपण संघटनेशी एकनिष्ठ राहून काम कराल व आपल्याकडून संघटनेची बदनामी किंवा अहित होणार नाही अशी अपेक्षा आहे. आपली तालुकाध्यक्ष* या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा!

Read More

इंदिराबाई ललवाणी विद्यालयाचा सुमित चिंचोले यांस विभागीयस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत कांस्य पदक

दि.१९/१०/२०२४जामनेर: महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्ष आतील मुले शालेय विभागीयस्तरीय शासकीय मैदानी (ॲथलेटिक्स) स्पर्धा आज दि.१९ रोजी नाशिक विभागीय क्रीडा संकुल,हिरावडी रोड, नाशिक येथे नुकत्याच संपन्न झाल्या.जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमित संजय चिंचोले (इयत्ता १२ वी विज्ञान ) याने ११० मीटर अडथळा शर्यत तृतीय क्रमांक प्राप्त करत १९.०१ सेकंद वेळ राखत कांस्यपदक नाशिक क्रीडा अधिकारी बी आर जाधव यांच्या हस्ते देण्यात आले सोबत इंदिराबाई ललवाणी माध्य. व उच्च माध्य विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार होते.स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक मनपा, ग्रामीण एकूण १३ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.◼️ अभिनंदन: इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ महाजन, सचिव किशोर भाऊ महाजन, मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपमुख्याध्यापक एस एन चवरे, उपप्राचार्य प्रा.के एन मराठे, पर्यवेक्षक प्रा.के डी निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी जी अत्तरदे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव राजेश जाधव, जामनेर तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान, बी पी बेनाडे, जी डी कचरे यांनी केले.◼️मार्गदर्शन: क्रीडा विभाग प्रमुख जी सी पाटील, प्रा.समीर घोडेस्वार यांचे लाभले.

Read More
error: Don't Try To Copy !!