जामनेरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला धक्का — राज्य संघटक राहुल चव्हाण यांचा भाजपात प्रवेश

जामनेर (प्रतिनिधी) जामनेरच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणारी घटना आज घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्य संघटक आणि निष्ठावान कार्यकर्ते राहुल चव्हाण यांनी आज पक्षाच्या सर्व पदांवरून व सदस्यत्वावरून राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश जामनेर येथे पार पडला असून, कार्यक्रमास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राहुल चव्हाण यांनी अधिकृतरित्या भाजपचा झेंडा हाती घेतला. या प्रसंगी भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल चव्हाण यांच्या प्रवेशामुळे जामनेरच्या स्थानिक राजकारणात नवीन राजकीय समीकरणे आकार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेतील सक्रिय व प्रभावी पदाधिकारी म्हणून ओळखले जाणारे चव्हाण यांचा पक्षत्याग हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपात प्रवेशानंतर राहुल चव्हाण यांनी सांगितले की, “मंत्री गिरीश महाजन यांच्या विकासाच्या राजकारणाने प्रेरित होऊन मी भाजपात प्रवेश केला आहे. जनतेच्या हितासाठी आणि जामनेरच्या सर्वांगीण विकासासाठी मी कार्य करणार आहे.” या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जामनेरमधील राजकीय समीकरणे अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read More

जामनेरात मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळे संपन्न

जामनेर (प्रतिनिधी):जामनेर नगरपरिषदेच्या वतीने आज विविध विकासकामांचे भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळे जल्लोषात पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे मंत्री गिरीशभाऊ महाजन होते. त्यांच्या हस्ते अनेक महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पक्षपदाधिकारी तसेच शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निमित्ताने जामनेर शहरातील नागरिकांना सुविधा पुरवणारी, शहराचा विकास वेगाने करणारी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत.लक्ष्मी कॉलनी (गट क्र. 391/2) — कंपाउंड वॉल व लादीकरण — 64.51 लाख, गिरिजा कॉलनी (गट क्र. 458) — संतोषी माता मंदिर परिसरात क्लब हाऊस बांधकाम — 79.36 लाख, पाचोरा रोड (गट क्र. 206) — क्लब हाऊस व कंपाउंड वॉल — 128.93 लाख,शिव कॉलनी — कंपाउंड वॉल, लादीकरण व बगीचा विकास — 45.34 लाख, मधुबन कॉलनी (गट क्र. 43/2 व 431/2) — खुल्या जागेचा विकास — 47.13 लाख व 69.83 लाख,शहाजान शहावली दर्गा परिसर — सौंदर्यीकरण व विकास कार्य — 100 लाख, विवेकानंद नगर — व्यायामशाळा बांधकाम — 49.82 लाखगट क्र. 292/2 — व्यायामशाळा बांधकाम — 72.72 लाखगट क्र. 5 — कुस्ती आखाडा बांधकाम — 52.74 लाख या सर्व कामांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी नितीन बागुल आणि नगरपरिषद कर्मचारीवृंद यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या कार्यक्रमाद्वारे जामनेर शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

Read More

गरुड विद्यालयात विद्याथ्यांनी स्वता बनवले रंगबेरंगीआकाश कंदिल.

शेंदुर्णी – येथील आ ग.र.ग माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी रंगबेरंगी आकाश कंदिल बनवले..आपल्या घरासाठी नेहमी आपण चांगल्या प्रकारचे सुंदर दिसावे म्हणून बाजारातून आकाश कंदील खरेदी करत असतो परंतु स्वताच्या हाताने आकाश कंदिल बनवून ते घरी लावाणे. यात मुलांना वेगळा आंनद मिळतो.मुलांनी चांगल्या प्रकारचे आकाश कंदील बनवण्याचे विचार करून ते प्रत्यक्ष करून दाखविले यासाठी वर्गांमध्ये शिकवण्याच्या विषयामध्ये कार्यानुभव अंतर्गत हा विषय प्रसंगोपात सोपे प्रकार मध्ये शिकविला जातो यासाठी विद्यालयाचे सहशिक्षक श्री जी टी कुमावत सर यांनी मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आकाश कंदील तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले होते विद्यार्थ्यांनी यासाठी लागणारे साहित्य खरेदी करून कमी खर्चामध्ये सुंदर व आकर्षक असे आकाश कंदील तयार केले यामध्ये प्रामुख्याने कलाशिक्षक श्री डी एच बारी सर व श्री एस आर चव्हाण सर यांनी सुद्धा सहकार्य केले यासाठी इयत्ता आठवीचे वर्ग आकाश कंदील बनवण्यासाठी घेण्यात आले उपक्रम बनवत असताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस चौधरी सर ,पर्यवेक्षक श्री व्ही एम शिरापुरे सर .किमान कौशल विभागाचे प्राध्यापक श्री शैलेंद्र शेळके सर ,श्री राहुल गरुड सर ,श्री सुरवाडे सर .उपक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते तसेच इयत्ता आठवीच्या वर्गाचे सर्व वर्गशिक्षक यांचेही सहकार्य मिळाले हा चांगला आणि स्तुत्य उपक्रम म्हणून घेण्यात आला .हा दरवर्षी कार्यानुभव अंतर्गत उपक्रम घेण्यात येतो .शिका आणि कमवा यासाठी पण हा उपक्रम घेण्यात येतो .वर्षामध्ये स्वबळावर कौशल्य निर्माण करून रोजगारही मिळवला जाऊ शकतो

Read More

निर्मल इंटरनॅशनल स्कूलची श्रेया महालपुरे चमकली! विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड..!

प्रतिनिधीगजानन क्षीरसागरलोहारा तालुका पाचोरापाचोरा:-क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विद्यमाने तथा जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांच्या मार्फत आयोजित जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धेत निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या कु. श्रेया विनोद महालपुरे हिने १७ वर्षे वयोगटात उल्लेखनीय कामगिरी सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या झळाळत्या यशामुळे आता ती नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.श्रेयाच्या या यशाने संपूर्ण शाळा परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेच्या अध्यक्षा मा. वैशालीताई सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी श्री. आय. बी. सिंग, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील व प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील यांनी श्रेयाचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.या यशामागे क्रीडा शिक्षक श्री. गणेश मोरे, श्री. नंदू पाटील, श्री.प्रवीण मोरे व श्री. सोमनाथ माळी यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असून, त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ श्रेयाने विभागीय पातळीवरील संधीच्या रूपाने प्राप्त केले आहे.श्रेयाच्या या कामगिरीमुळे निर्मल इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात आपली गुणवत्ता आणि प्राविण्य सिद्ध केले आहे .

Read More

जि.प.मराठी शाळा वाकडी येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी संदीप परदेशी यांची निवड

वाकडी.ता.जामनेर.दि.११/१०/२५ जि.प.मराठी शाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, यावेळी अध्यक्षपदी संदीप परदेशी व उपाध्यक्ष अक्रम तडवी यांची निवड करण्यात आली,जि.प.मराठी मुलांची केंद्र शाळेची नूतन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली,ही व्यवस्था समितीची रचना पालकांमधून शासकीय निर्देशानुसार करण्यात आली, सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप परदेशी,तर उपाध्यक्षपदी अक्रम तडवी यांची निवड करण्यात आली,सदर वाकडी केंद्रचे केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर पाटील,मुख्याध्यापक प्रल्हाद शिंदे, यांच्या अध्यक्षतेखाली उत्तम प्रकारे पार पडली, तसेच सभेकरिता पालक वर्ग देखील उपस्थित होते,यामधून व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद मराठी शाळा वाकडी मुलांचे पालक आनंदा जोशी,कोमल सिंग राजपूत,गौतम लोखंडे, अतुल न्हावी,सौ.सोनाली कोळी,सौ.जयश्री बिडके,शकीला तडवी,सौ.ज्योती कोळी,सौ.उज्जला राजपूत, युवराज बिजागरे, रमेश गायकवाड,या मान्यवरांनी समितीवर करण्यात आली,सदर सभेची रुपरेखा सुर्याजी काकडे यांनी मांडली यांनी यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर कवडे,शेखर महाजन,प्रकाश कुमावत आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते

Read More

जि.प. केंद्र शाळा मुलांची पाळधी येथे शालेय व्यवस्थापन समितीची कार्यकारणी जाहीरअध्यक्षपदी कैलास राजपूत, तर उपाध्यक्षपदी गोपाल वाणी यांची निवड.

प्रतिनिधी.पाळधी ता जामनेर येथील जि प मुलांची केंद्र शाळेची नूतन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. ही व्यवस्था समितीची रचना पालकांमधून शासकीय निर्देशानुसार करण्यात आली.सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कैलास राजपूत तर उपाध्यक्षपदी गोपाल वाणी यांची निवड करण्यात आली. सदर सभा शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सोनाली ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्तम प्रकारे पार पडली तसेच सभेकरिता पालक वर्ग व महिला पालक वर्ग देखील उपस्थित होते. यामधून व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद पारधी शाळा मुलांची सर्वानुमते पालका मधून विनोद वाघ,गजानन शिंदे, मुकेश मराठे,उत्तम वाणी, गोपाल वाणी ,कैलास राजपूत ,योगेश भोंबे, प्रवीण सुरवाडे, शांताराम वाघ, शितल शिंदे, या मान्यवरांची समितीवर निवड झाली. सदर सभेची रुपरेषा संभाजी हावडे यांनी मांडली तसेच या सर्व निवडक आम्ही शालेय शिक्षक वृंद नंदा अपार मॅडम, हेमलता पाटील मॅडम, जितेंद्र नाईक अमित मुंडे या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

Read More

शेंदुर्णीच्या खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत ६ सुवर्ण ६ रजत व ३ कांस्य पदकांची कमाईराज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

शेंदुर्णी ता जामनेर … क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धा नुकत्याच क्रीडा संकुल जळगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या .शेंदुर्णी येथील श्री छत्रपती स्पोर्ट्स क्लब च्या तायक्वांडो खेळांडूनी झालेल्या शालेय विभागीय तायक्वांडो स्पर्धेत ६ सुवर्ण , ६ रौप्य व ३ कांस्य पदक प्राप्त केले, सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूची १३ आक्टो ते १७ आक्टो दरम्यान संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धे साठी निवड झाली . आ.ग.र.गरुड विद्यालय 1 ) कामिनी विश्वनाथ नाथ सुवर्ण पदक2)दक्ष विठ्ठल लोखंडे सुवर्ण पदक3)आर्यन शांताराम वानखेडे सुवर्ण पदक४) रागिणी सिद्धेश्वर पाटील सुवर्ण पदक५) विनायक योगेश जावरे रजत पदक६)प्रद्युम्न सचिन जगताप रजत पदक७) साहिल प्रवीण शेलार रजत पदक८) चिन्मय सुर्वे रजत पदक९) दृष्टी नितीन भारुडे कांस्य पदक१०)आरुषी वाघ कांस्य पदक श्रीकृष्ण माध्य.विद्यालय१)राधिका राजेंद्र गवळी सुवर्ण पदक२) नेहा संदीप गुजर रजत पदक३) तनिष्का बाळू सुळ रजत पदक४) उमेश दिलावर तडवी कांस्य पदक निर्मल इंटरनॅशनल स्कूल१) सर्वम संजय राजपूत सुवर्ण पदक असे यश संपादन केले.सदर खेळाडूना शेंदुर्णी येथील छत्रपती स्पोर्ट्स क्लब चे प्रशिक्षक लोचना चौधरी व मोहित चौधरी यांचे मार्गदर्शन लाभलेया यशा बद्दल खेळाडूंचे जळगाव जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल जोनवाल सचिव राजेंद्र जंजाळे सहसचिव श्रीकृष्ण चौधरी सर संचालक सुनिल मोरे श्री छत्रपती स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील शेंदुर्णी एज्युकेशन सोसा चे अध्यक्ष संजयदादा गरुड,सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र गुजर यांनी अभिनंदन केले आहे.

Read More

शेंदुर्णी नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर..

शेंदुर्णी – नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या २०२५ च्या निवडणुकी संदर्भात आज १७ प्रभागाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आज माहेश्वरी मंगल कार्यालय शेंदुर्णी येथे १७ प्रभागाचे आरक्षण चिमुकल्यांच्या हातून सोडचिट्टीच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले उपविभागीय अधिकारी जळगाव श्री विनय गोसावी यांच्या उपस्थितीत शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक धांडे साहेब यांनी प्रभागाची सोडत रचना पार पाडली यावेळी गावातील नागरिक तसेच भाजपा ज्येष्ठ नेते गोविंद शेठ अग्रवाल ,संजय दादा गरुड, अमृत खलसे तसेच महायुती महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग रचना पुढीलप्रमाणे आहे प्रभाग १ खुला प्रवर्ग, प्रभाग २ अनुसूचित जाती, प्रभाग ३ खुला,प्रभाग ४ ना.मा.प्र.(महिला),प्रभाग ५ खुला (महिला) प्रभाग ६ खुला (महिला),प्रभाग ७ खुला,प्रभाग८ ना.मा.प्र.(महिला)प्रभाग ९ खुला (महिला),प्रभाग१० ना.मा.प्र (महिला), प्रभाग ११ना. मा.प्र.,प्रभाग १२ खुला (महिला ),प्रभाग १३ ना. मा.प्र.,प्रभाग १४खुला (महिला), प्रभाग १५ अनुसूचित जमाती (महिला),प्रभाग१६ खुला प्रभाग १७ खुला

Read More

गरुड महाविद्यालयाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत फेरीचे आयोजन…. .

आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथील करिअर कट्टा, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील व विशेषतः मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थी व सामान्य नागरिक यांच्या मदतीसाठी महाविद्यालयाच्या वतीने शेंदुर्णी गावात मदत रॅलीचे आयोजन करण्यात आले .सदर रॅलीमध्ये महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता या रॅलीच्या माध्यमातून शेंदुर्णी गावात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नागरिकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करून एकूण १३०००(तेरा हजार) रुपयाची आर्थिक मदत मिळविली .यामध्ये नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपल्या स्वेच्छेने मदत दिली .सदर मदत फेरीमध्ये महाविद्यालयातील करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापिका डॉ. योगिता पांडुरंग चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. भूषण पाटील, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. अजिनाथ जीवरग ,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुजाता चंद्रकांत पाटील ,सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रोहिदास धोंडीबा गवारे, कनिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप कुंभार , सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. मुकेश पाटील तसेच महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.संजय भोळे, उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे, उपप्राचार्य डॉ. अमर जावळे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आप्पा महाजन, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ. महेश पाटील व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. महाविद्यालयाच्या रॅलीबद्दल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन मा. दादासाहेब संजयराव गरुड , संस्थेचे व्हा चेअरमन मा. श्री. आबासाहेब भीमराव शामराव शेळके, संस्थेचे सचिव काकासाहेब सागरमलजी जैन, सह सचिव दादासाहेब यू यू पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दीपकजी काशिनाथराव गरुड व सर्व संचालक मंडळ यांनी सदर उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले..

Read More
error: Don't Try To Copy !!