जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी:शेतकऱ्याचे अतोनात नुकसान-राष्टवादी कॉग्रेस नेत्यांची पाहणी, भरपाईसाठी शासनाला इशारा….

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी-सुपडू जाधव आज बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी झाल्यावर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर तालुका अध्यक्ष किशोर आप्पा पाटील बेटावद खुर्द परिसरात शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली शासनाने त्वरित पंचनामे करून योग्य भरपाई न दिल्यास लवकरच शेतकऱ्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करू असा शब्द शेतकऱ्यांना दिला

Read More

भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी

भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी जामनेर (प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात भगवान सेना प्रतिनिधींनी यांनी जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन सादर केले.या वेळी भगवान सेना जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष गजानन वासुदेव घ्यार, ज्येष्ठ समाजसेवक वसंत व्यवहारे, दत्तात्रेय नामदेव पाटील, प्रदीप तुकाराम पाटील, अतुल सुभाष पढार व शहराध्यक्ष जितेंद्र श्रीराम काळे उपस्थित होते.भगवान सेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेऊन संबंधितांना शिक्षा होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. या निवेदनावर शासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

Read More

जिल्हा परिषद प्रशाला अजिंठा येथे १९ वर्षांनंतर स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

दि.२७.१०.२५२००५-०६च्या बॅचच्या माजी शिक्षक – विद्यार्थ्यांची शाळेत गाठीभेट,आठवणींना उजाळाअजिंठा येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे तब्बल १९वर्षांनंतर २००५-०६ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला.दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी आयोजित या सोहळ्यासाठी माजी विद्यार्थी सकाळी ९.०० वाजता आपल्या जुन्या शाळेत एकत्र जमले आणि शाळेच्या आठवणींनी सर्वांचे डोळे पाणावले,कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेत नियमित परिपाठ घेण्यात आला. त्यामध्ये प्रतिज्ञा, प्रार्थना, राष्ट्रगीत आणि सुविचार घेण्यात आले. यानंतर शिक्षकांनी सर्वांना संस्कारपूर्ण जीवनाचे मार्गदर्शन केले. “कुटुंबात कसे राहावे, सासू-सासरे व आई-वडिलांचा आदर करावा, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा आणि एकमेकांना नेहमी मदत करून संपर्कात राहावे” असे मौल्यवान विचार शिक्षकांनी मांडले.कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी, अनुभव आणि शिक्षणानंतरच्या प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. माझा हा बेंच… तू इथे बसायचास…अशा जुन्या आठवणींनी शाळेच्या वर्गखोल्यांत भावनिक वातावरण निर्माण झाले. एकमेकांच्या कुटुंबांविषयी, व्यवसायांविषयी माहिती देत सर्वांनी बालपणीच्या दिवसांना उजाळा दिला.या स्नेहमिलन सोहळ्यास अध्यक्षस्थानी कुलकर्णी सर होते. मार्गदर्शन निळकंठ लोसरवार सर, शंकर गाडेकर सर, राजेंद्र सरदार सर, अण्णा जगताप सर, बनकर मॅडम, श्रीरामवार मॅडम, बोरसे मॅडम, रवी गौंड सर, विजय कालभिले, पवार सर, सोनावणे सर, पाटील मॅडम, काळे मॅडम, शारदा मॅडम व सीमा मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. शवर्षा देशमुख,संध्या झलवार यांनी केले.या सोहळ्यात अश्विनी खंडेलवाल, विद्या देशमुख, नलिनी जाधव, ज्योती तायडे, उज्वला लाड, वैशाली पोळ, सोनू राठोड, पूजा वैष्णव, माया नैनाव, दिपाली चव्हाण, सुषमा मानकर, अंकिता चोंडिये, आरती झलवार, अनिता गुप्ता, अनिता आगवाल, भारती झलवार, तसेच विष्णू मुके शास्त्री (पत्रकार), दिपक मुके, विनोद सोनावणे, राहुल सपकाळ, अंकुश लोखंडे, गोपाल पैठणकर, सागर ढाकरे, राजू कासुधने, इम्रान शेख, जफर, अभिषेक, चेतन कुमावत, रितेश माली, विशाल खंडेलवाल, निलेश पवार आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.शिक्षकांना कार्यक्रमाची आठवण म्हणून माजी विद्यार्थ्यांनी समूह छायाचित्र फ्रेम भेटवस्तू म्हणून दिली,कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शाळेतील शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि पुढील काळात असे स्नेहमेलन आयोजित करण्याचा निर्धार केला,प्रत्येक मनुष्य आजीवन विद्यार्थीच असतो. शाळेतील सुवर्णक्षणांनी आज पुन्हा एकदा आम्हा सर्वांना बालपणात नेले,” असे उपस्थित विद्यार्थ्यांनी भावनिकपणे सांगितलेस्नेह मिलन एक ऊर्जा देणारा कार्यक्रम. माणूसपण जपणाऱ्या व संस्कार घडवणाऱ्या अशा प्रेरक व मार्गदर्शक कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक शाळेमधून व्हायला हवे.

Read More

मका खरेदीत अडवणूक: तक्रार करा!जामनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचे आवाहन….

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर,समितीत मका खरेदी करताना व्यापान्यांकडून ओलसर असल्याचे कारण पुढे करून तो कमी दराने खरेदी करणे किंवा शेतकऱ्यांची अडवणूक करणे असे प्रकार केले जात असतील तर त्याची बाजार समितीकडे तक्रार करावी. जेणेकरून बाजार समिती प्रशासनाला संबंधित दोषी व्यापाऱ्याच्या विरोधात कारवाई करता येईल, असे आवाहन येथील बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व सचिव प्रसाद पाटील यांनी केले आहे.सभापती श्री. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की या हंगामातील मक्याचा पेरा वाढल्याने उत्पादन वाढण्याची स्थिती आहे. परंतु बहुतांश शेतकरी एकाचवेळी मका विक्रीसाठी आणत असल्याने मका खरेदी केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. विक्रीसाठी आणलेल्या मक्यामधील आर्द्रता तुर्तास जास्त असल्याने हा मका चाळविण्यासाठी बऱ्याच खरेदीदारांकडे जागेची अडचण आहे. त्यामुळे मका खरेदीत अडचणी उद्भवत आहेत, अनेक शेतकरी बांधवांनी त्यांचा मका हमी भावापेक्षा कमी दरात खरेदी होत असल्याच्या व व्यापाऱ्यांकडून त्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी आपला मका ‘एफएक्यू’ दर्जानुसार वाळवून सुकवून व टप्प्याटप्याने विक्रीसाठी आणावा, जेणेकरून आपली गैरसोय होणार नाही अथवा आर्द्रतेच्या अतिरिक्त प्रमाणामुळेआर्थिक नुकसान होणार नाही. बरेच शेतकरी ओला मका विक्रीची घाई करतात. त्यांनी देखील बाजारभावाचा व विक्री योग्य स्थितीचा अंदाज घेऊन घाबरून न जाता, योग्य वेळी माल विक्री करावा, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यात वादळी वारा व पावसाची शक्यता आहे. याचाही विचार करून मका विक्रीची घाई करू नये असे आवाहनही सभापती अशोक पाटील व सचिव प्रसाद पाटील यांनी केले आहे.

Read More

पाचोरा-भडगाव तालुक्याच्या आढावा बैठकीत कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन..!

प्रतिनिधी (गजानन क्षीरसागर)पाचोरा: -आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा येथील निर्मल सीड्सच्या कृषीदालनात चाळीसगावचे कार्यसम्राट आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आढावा बैठक उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती, संघटनात्मक बळकटी, तसेच गट आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीदरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “निवडणुका या फक्त राजकीय नव्हेत, तर विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या असतात. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या विचारधारेसह विकासाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.” त्यांनी संघटनशक्ती आणि तळागाळातील संवादाचे महत्त्व अधोरेखित करत कार्यकर्त्यांना उत्साहाने कामाला लागण्याचे आवाहन केले.या बैठकीत काही नव्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशही आमदार चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. बैठकीत दिलीपभाऊ वाघ, वैशालीताई सुर्यवंशी, अमोलभाऊ शिंदे, प्रताप हरी पाटील, अमोल नाना पाटील, मधुभाऊ काटे, सुभाष पाटील, संजय नाना वाघ, गोविंद शेलार, दीपक माने, शोभाताई तेली, अनिल पाटील, विनोद नेरकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या आढावा बैठकीमुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्मी आणि संघटनात्मक एकात्मता जाणवली.

Read More

शेतकऱ्याच्या पिवळे सोन मक्याला अकराशे रुपये भाव कापसाची ही सहा हजारावर विक्री

प्रतिनिधी- सुपडू जाधवऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेला पाऊस अधूनमधून पडत राहिला. सप्टेंबरमध्येही सरींनी शेतकऱ्यांच्या धांदल्यावर थोडेसे संकट आणले, तर ऑक्टोबरमध्ये पावसाने उघडीप दिली. अतिवृष्टी आणि पूरस्थितीतून वाचलेल्या कापूस, मका, सोयाबीन आणि तूर पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले. मात्र, शासनाच्या सीसीआय आणि नाफेडच्या खरेदी केंद्रांची अनुपलब्धता शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न ठरला आहे.जामनेर तालुक्यात यावर्षी पांढऱ्या सोन्याप्रमाणे ओळखल्या जाणान्या कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली SM होती. तसेच ‘पिवळे सोनं म्हणविल्या जाणाऱ्या मक्याची लागवड गतवर्षीच्यातुलनेत अधिक झाली. पिकांची स्थिती सुरुवातीला उत्कृष्ट होती. ज्यामुळे शेतकऱ्यांनी मोठे उत्पादन मिळेल आणि त्यांना चांगला लाभ होईल, असा विश्वास बाळगला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यातील ढगफुटीसारख्या पावसामुळे शेतकन्यांच्या प्रयत्नांचा परिणाम क्षणात नष्ट झाला. मक्याचे दाणे काळवंडले, अनेक कणसे भरल्या गेल्या नाहीत, ज्या भरल्या होत्या त्यावर अतिपावसामुळे कॉब फुटले, त्यामुळे उत्पन्न खूप घटले. कापूसव सोयाबीन पिकांबाबतही हाच परिणाम दिसून येत आहे. पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी कापूस आणि मका विक्रीसाठी काढले. मात्र, शासनाचे खरेदी केंद्र उपलब्ध नसल्यामुळे खासगी व्यापायांनी विविध कारणे देत माल खरेदी करणे सुरू केले. कापूस ७७१० ते ८११० रुपये प्रतिक्विंटल असतानाही व्यापान्यांनी ६००० ते ६२०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरू केली आहे. मक्या ला हमीभाव २२०० ते २२८० रुपये प्रतिक्विंटल असूनही स्थानिक व्यापारीशेतकऱ्यांकडून ११०० ते १३१० रुपये दराने खरेदी करत आहेत.शेतकऱ्यांच्या मते, ही परिस्थिती त्यांच्यासाठी मोठा आर्थिक फटका ठरत आहे. पिकांच्या चांगल्या उत्पादनाचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आला आपली मेहनत आणि आर्थिक गुंतवणूक कमी भावात विकावी लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे व व्यापा-यांवळे तातडीने मार्ग काढून परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read More

भारतीय जैन संघटना जामनेर व श्री जैन ओसवाल भागीरथीबाई वाचनालय जामनेर, यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व शाकाहार दिवस यानिमित्ताने फन एन फूड फेअर चा कार्यक्रम संपन्न

दि 15 ऑक्टोबर,2025 वार-बुधवार ला आयोजित केला गेला होता।सदर कार्यक्रमात फूड स्टॉल,गेम स्टॉल,विक्री स्टॉल ( गृहउपयोगी सामान विकण्यासाठी)जैन ते जैन व्यापार वृद्धी च्या हेतूने 22 सहभागी स्टाल होते.विशेष सर्व स्टॉल वरील खाद्यपदार्थ जैनपदार्थ होते व यामध्ये संपूर्ण जैन शहरवासीयांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.सदर कार्यक्रमाचे उद्घाटनासाठी सुरेशचंद धारिवाल सचिव श्री जैन ओसवाल भागीरथी वाचनालय,प्रविण बोहरा ओसवाल श्री संघ कार्यकारिणी सदस्य,सुमित मुनोत- बीजेस खानदेश उपाध्यक्ष,विकास कोठारी-जळगाव जि उपाध्यक्ष,कुशल बोहरा-शहर अध्यक्ष,संकल्प लोढा-शहर सचिव,दर्शन बागमार,विकास ललवाणी,हर्षल बोहरा,रितेश कोठारी, महिला विंग जिलाध्यक्ष सौ सोनल कोठारी, महासचिव सौ संगीता मंडलेचा,सौ राखी लोढा,सौ मनीषा कोठारी,सौ वंदना चोरडिया,सौ स्नेहल मुनोत इ. सदस्य उपस्थित होते.प्रोजेक्ट हेड-डॉ दिपक कोठारी,आदित्य मंडलेचासौ मोना चोरडीया,सौ रुपाली बोहरा यांनी कार्य पाहिले।सर्व स्टॉल मधून खाद्य स्टॉल चे विजयी सौ दिपाली चोरडिया ,विक्री स्टॉल चे विजयी कर्णावट,गेम स्टॉल चे विजयी मित लुंकड एवं राहत जैन होते या सर्वांना वाचनालयाकङून उपहार देऊन सन्मानित केले गेले.

Read More

जामनेरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला धक्का — राज्य संघटक राहुल चव्हाण यांचा भाजपात प्रवेश

जामनेर (प्रतिनिधी) जामनेरच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणारी घटना आज घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्य संघटक आणि निष्ठावान कार्यकर्ते राहुल चव्हाण यांनी आज पक्षाच्या सर्व पदांवरून व सदस्यत्वावरून राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश जामनेर येथे पार पडला असून, कार्यक्रमास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राहुल चव्हाण यांनी अधिकृतरित्या भाजपचा झेंडा हाती घेतला. या प्रसंगी भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल चव्हाण यांच्या प्रवेशामुळे जामनेरच्या स्थानिक राजकारणात नवीन राजकीय समीकरणे आकार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेतील सक्रिय व प्रभावी पदाधिकारी म्हणून ओळखले जाणारे चव्हाण यांचा पक्षत्याग हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपात प्रवेशानंतर राहुल चव्हाण यांनी सांगितले की, “मंत्री गिरीश महाजन यांच्या विकासाच्या राजकारणाने प्रेरित होऊन मी भाजपात प्रवेश केला आहे. जनतेच्या हितासाठी आणि जामनेरच्या सर्वांगीण विकासासाठी मी कार्य करणार आहे.” या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जामनेरमधील राजकीय समीकरणे अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read More

जामनेरात मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळे संपन्न

जामनेर (प्रतिनिधी):जामनेर नगरपरिषदेच्या वतीने आज विविध विकासकामांचे भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळे जल्लोषात पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे मंत्री गिरीशभाऊ महाजन होते. त्यांच्या हस्ते अनेक महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पक्षपदाधिकारी तसेच शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निमित्ताने जामनेर शहरातील नागरिकांना सुविधा पुरवणारी, शहराचा विकास वेगाने करणारी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत.लक्ष्मी कॉलनी (गट क्र. 391/2) — कंपाउंड वॉल व लादीकरण — 64.51 लाख, गिरिजा कॉलनी (गट क्र. 458) — संतोषी माता मंदिर परिसरात क्लब हाऊस बांधकाम — 79.36 लाख, पाचोरा रोड (गट क्र. 206) — क्लब हाऊस व कंपाउंड वॉल — 128.93 लाख,शिव कॉलनी — कंपाउंड वॉल, लादीकरण व बगीचा विकास — 45.34 लाख, मधुबन कॉलनी (गट क्र. 43/2 व 431/2) — खुल्या जागेचा विकास — 47.13 लाख व 69.83 लाख,शहाजान शहावली दर्गा परिसर — सौंदर्यीकरण व विकास कार्य — 100 लाख, विवेकानंद नगर — व्यायामशाळा बांधकाम — 49.82 लाखगट क्र. 292/2 — व्यायामशाळा बांधकाम — 72.72 लाखगट क्र. 5 — कुस्ती आखाडा बांधकाम — 52.74 लाख या सर्व कामांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी नितीन बागुल आणि नगरपरिषद कर्मचारीवृंद यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या कार्यक्रमाद्वारे जामनेर शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

Read More

गरुड विद्यालयात विद्याथ्यांनी स्वता बनवले रंगबेरंगीआकाश कंदिल.

शेंदुर्णी – येथील आ ग.र.ग माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी रंगबेरंगी आकाश कंदिल बनवले..आपल्या घरासाठी नेहमी आपण चांगल्या प्रकारचे सुंदर दिसावे म्हणून बाजारातून आकाश कंदील खरेदी करत असतो परंतु स्वताच्या हाताने आकाश कंदिल बनवून ते घरी लावाणे. यात मुलांना वेगळा आंनद मिळतो.मुलांनी चांगल्या प्रकारचे आकाश कंदील बनवण्याचे विचार करून ते प्रत्यक्ष करून दाखविले यासाठी वर्गांमध्ये शिकवण्याच्या विषयामध्ये कार्यानुभव अंतर्गत हा विषय प्रसंगोपात सोपे प्रकार मध्ये शिकविला जातो यासाठी विद्यालयाचे सहशिक्षक श्री जी टी कुमावत सर यांनी मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आकाश कंदील तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले होते विद्यार्थ्यांनी यासाठी लागणारे साहित्य खरेदी करून कमी खर्चामध्ये सुंदर व आकर्षक असे आकाश कंदील तयार केले यामध्ये प्रामुख्याने कलाशिक्षक श्री डी एच बारी सर व श्री एस आर चव्हाण सर यांनी सुद्धा सहकार्य केले यासाठी इयत्ता आठवीचे वर्ग आकाश कंदील बनवण्यासाठी घेण्यात आले उपक्रम बनवत असताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस चौधरी सर ,पर्यवेक्षक श्री व्ही एम शिरापुरे सर .किमान कौशल विभागाचे प्राध्यापक श्री शैलेंद्र शेळके सर ,श्री राहुल गरुड सर ,श्री सुरवाडे सर .उपक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते तसेच इयत्ता आठवीच्या वर्गाचे सर्व वर्गशिक्षक यांचेही सहकार्य मिळाले हा चांगला आणि स्तुत्य उपक्रम म्हणून घेण्यात आला .हा दरवर्षी कार्यानुभव अंतर्गत उपक्रम घेण्यात येतो .शिका आणि कमवा यासाठी पण हा उपक्रम घेण्यात येतो .वर्षामध्ये स्वबळावर कौशल्य निर्माण करून रोजगारही मिळवला जाऊ शकतो

Read More
error: Don't Try To Copy !!