मका खरेदीत अडवणूक: तक्रार करा!जामनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचे आवाहन….

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
प्रतिनिधी- सुपडू जाधव
जामनेर,
समितीत मका खरेदी करताना व्यापान्यांकडून ओलसर असल्याचे कारण पुढे करून तो कमी दराने खरेदी करणे किंवा शेतकऱ्यांची अडवणूक करणे असे प्रकार केले जात असतील तर त्याची बाजार समितीकडे तक्रार करावी. जेणेकरून बाजार समिती प्रशासनाला संबंधित दोषी व्यापाऱ्याच्या विरोधात कारवाई करता येईल, असे आवाहन येथील बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व सचिव प्रसाद पाटील यांनी केले आहे.
सभापती श्री. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की या हंगामातील मक्याचा पेरा वाढल्याने उत्पादन वाढण्याची स्थिती आहे. परंतु बहुतांश शेतकरी एकाचवेळी मका विक्रीसाठी आणत असल्याने मका खरेदी केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. विक्रीसाठी आणलेल्या मक्यामधील आर्द्रता तुर्तास जास्त असल्याने हा मका चाळविण्यासाठी बऱ्याच खरेदीदारांकडे जागेची अडचण आहे. त्यामुळे मका


खरेदीत अडचणी उद्भवत आहेत, अनेक शेतकरी बांधवांनी त्यांचा मका हमी भावापेक्षा कमी दरात खरेदी होत असल्याच्या व व्यापाऱ्यांकडून त्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी आपला मका ‘एफएक्यू’ दर्जानुसार वाळवून सुकवून व टप्प्याटप्याने विक्रीसाठी आणावा, जेणेकरून आपली गैरसोय होणार नाही अथवा आर्द्रतेच्या अतिरिक्त प्रमाणामुळे
आर्थिक नुकसान होणार नाही. बरेच शेतकरी ओला मका विक्रीची घाई करतात. त्यांनी देखील बाजारभावाचा व विक्री योग्य स्थितीचा अंदाज घेऊन घाबरून न जाता, योग्य वेळी माल विक्री करावा, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यात वादळी वारा व पावसाची शक्यता आहे. याचाही विचार करून मका विक्रीची घाई करू नये असे आवाहनही सभापती अशोक पाटील व सचिव प्रसाद पाटील यांनी केले आहे.

error: Don't Try To Copy !!