जामनेर न्यायालयात कायदेविषयक शिबीर संपन्न

जामनेर प्रतिनिधीसध्याच्या काळात व्यसनाधीनता खुप मोठी समस्या निर्माण झाली असुन विशेषतः युवक वर्गात खुप व्यसन दिसत आहे.गुडखा,गांजा,चरस,दारु यांचा सऱ्यास वापर आता शहर आणि खेड्यात सुद्धा जास्त वाढत आहे.यामुळे घरात, समाजात वाद, भांडणे निर्माण होतात .पैशाचा अपव्यय होऊन गुन्हेगारी सुद्धा वाढत चालली आहे.यामुळे समाजातील,घरात तेढ निर्माण होऊन सगळ्यांचेच नुकसान होत आहे.तेव्हा युवकांनी व्यवसनांपासुन दुर रहावे असे आवाहन जामनेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा जामनेर तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती यु.एस.वानखडे यांनी केले आहे.जामनेर न्यायालयात जामनेर तालुका विधी सेवा प्राधिकरण व जामनेर तालुका वकिल संघाच्या विद्यमाने विधी सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ॲड.तृप्ती देठे यांनी आपल्या भाषणात युवकांमधील वाढती व्यसनाधीनता त्यांचे परिणाम तसेच याबाबत असलेले कायदे यांची सविस्तर माहिती दिली.यावेळी जामनेर तालुका वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.कमलाकर बारी सचिव ॲड.डिगंबर गोतमारे तसेच सर्व वकिल बांधव, भगिनी,नागरिक न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते.सुत्रसंचलन ॲड.एस.आर.पाटील तर आभार ॲड.देवेंद्र पारळकर यांनी मानले.

Read More

सामरोद जि. प. शाळेत ‘शाळा स्वच्छता अभियान’ उत्साहातगावकरी, ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांचा सक्रिय सहभाग

सामरोद | प्रतिनिधी सामरोद येथील जिल्हा परिषद शाळेत ‘शाळा स्वच्छता अभियान’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या अभियानात ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत श्रमदान केले. या वेळी शाळेच्या परिसरातील क्रीडांगण व बागेची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील कचरा गोळा करून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत शिक्षकांनी आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सरपंच व पोलीस पाटील यांनी ‘स्वच्छ शाळा, समृद्ध गाव’ या संकल्पनेवर मार्गदर्शन केले. शाळा हे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे केंद्र असून शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर राहिल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबतच अभ्यासातील एकाग्रताही वाढते, असे त्यांनी सांगितले. गावकरी, लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन श्रमदान केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छतेचा संदेश दिला. अभियानाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने अभियानात सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले.

Read More

गोपाल भंडारी सह समाजसेवकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा विरोधकांचा डाव फसला; पोलिस ठाण्यातील तक्रार मागे ; ग्रामसभेत माफीनामा

शहादा प्रतिनिधी : ग्रामपंचायत शहाणा येथील कथित गैरव्यवहार/भ्रष्टाचाराबाबत चौकशी होऊ नये, संबंधित व्यक्तींवर प्रशासकीय कारवाई होऊ नये, ग्रामसभा होऊ नये, ग्रामपंचायतीच्या कारभाराची माहिती ग्रामस्थांना मिळू नये तसेच श्री. सुनील सुळे यांच्याविरुद्ध दाखल तक्रारीवर कारवाई होऊ नये, या उद्देशाने शहादा मतदार संघाचे माजी अपक्ष उमेदवार गोपाल सुरेश भंडारी, जितेंद्र पारासिंग भंडारी, दीपक तडवी, पवनसिंग पवार, जगदीश डुडवे, सोमनाथ सुळे, जामसिंग सुळे सह समाजसेवकांविरूद्ध पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील पोलिस ठाणे शहादा येथे दिनांक २६/८/२०२६ रोजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक,दिव्यांग कर्मचारी सुनील सुळे सह काही समाजकंटकांनी दिलेली तक्रार अखेर मागे घेण्यात आली आहे. याऊलट मौजे शहाणा, ता. शहादा येथील ग्रामस्थ, महिला, शेतकरी व विद्यार्थी आपणास नमूद करतो की, दिनांक २६/०८/२०२६ रोजी काही व्यक्तींनी आमच्याविरुद्ध तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन, सामाजिक अशांतता निर्माण करणे, सोशल मीडिया व व्हॉट्सॲपद्वारे बदनामी व दमदाटी करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, शेतकऱ्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवणे, गावाची बदनामी करणे व शांतता भंग करणे इत्यादी गंभीर आरोपांची तक्रार पोलीस स्टेशन शहादा येथे केली आहे. सदर तक्रारीतील आरोप हे खोटे, तथ्यहीन व दिशाभूल करणारे असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.ग्रामपंचायत शहाणा येथील कथित भ्रष्टाचाराबाबत होणारी चौकशी व दिनांक २७/०८/२०२६ रोजी आयोजित ग्रामसभा रोखण्यासाठी तसेच श्री. सुनील सुळे, कृषी सहाय्यक, मंदाणे गट, ता. शहादा यांच्या विरोधातील कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कारवाई होऊ नये म्हणून समाजसेवक व ग्रामस्थांविरुद्ध खोटे व तथ्यहीन आरोप करून बदनामी, दमदाटी व सामाजिक असंतोष निर्माण करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध चौकशी करून गुन्हे दाखल करून कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार गोपाल भंडारी सह शहाणा गावातील अनेक ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे शहादा येथे दिनांक २७/८/२०२६ रोजी दाखल केली आहे. त्यामुळे विरोधकांचा डाव चांगलाच फसला आहे.ग्रामसभेत याबाबत संबंधितांनी जाहीर माफी मागितली आहे.तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, गोपाल सुरेश भंडारी हे गाव व समाजहितासाठी काम करणारे व्यक्ती असून ते ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. गोपाल भंडारी किंवा त्यांचे साथीदार तडीपार नाहीत ते चांगले समाजसेवक आहेत.जितेंद्र पारासिंग भंडारी, दीपक तडवी, पवनसिंग पवार, जगदीश डुडवे, सोमनाथ सुळे, जामसिंग डेमा सुळे तसेच समस्त ग्रामस्थ, महिला, शेतकरी व विद्यार्थी हे गावाच्या विकासासाठी कार्यरत असून ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात.ते कोणालाही धमकी देणे, शासकीय कामात अडथळा आणणे किंवा गावात अशांतता निर्माण करणे, खंडणी मागणे असा कोणताही प्रकार करत नाहीत.सुनील सुळे, कृषी सहाय्यक, यांच्या सांगण्यावरून खोटा तक्रार अर्ज देण्यात आला असून तक्रार अर्जावर आमच्या खोट्या सह्या करण्यात आल्या आहेत. तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा व फाईल बंद करण्यात यावा .

Read More

जामनेरमध्ये भीषण रिक्षा अपघात; चार ते पाच महिला आणि तीन पुरुष जखमी

जामनेर | प्रतिनिधीजामनेर शहरातील भुसावळ रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी एका प्रवासी रिक्षाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात चार ते पाच महिला आणि तीन पुरुष जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसून, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

Read More

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री थरार! धावत्या कारचे टायर फोडून कुटुंबाला लुटले; तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल लंपास

सिन्नर | प्रतिनिधीमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या कुटुंबाला दरोडेखोरांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना सिन्नर तालुक्यात समोर आली आहे. महामार्गावर धारदार वस्तू टाकून कारचे टायर फोडण्यात आले. कार थांबताच दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना धमकावत त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू लुटल्याची माहिती आहे. या घटनेत सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे वृत्त आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर परिसरातील समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांनी महामार्गावर धारदार वस्तू पसरवून ठेवल्याचा संशय आहे. त्यावरून काही वाहनांचे टायर फुटले. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला गाडी थांबवावी लागली.याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरकडून प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाच्या कारचेही टायर फुटले. अचानक टायर पंचर झाल्याने चालकाने कार थांबवली. मात्र, कार थांबताच परिसरात आधीपासून दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी संधी साधली.शस्त्रांचा धाक दाखवत लूटदरोडेखोरांनी कुटुंबातील सदस्यांना शस्त्रांचा धाक दाखवून धमकावले. त्यानंतर त्यांच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू जबरदस्तीने काढून घेतल्या. या संपूर्ण प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली.या दरोड्यात सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले आहे. घटना घडल्यानंतर दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.पोलिसांकडून तपास सुरूघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, महामार्गावरील कॅमेरे आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांकडून तपास केला जात आहे.समृद्धी महामार्गावर यापूर्वीही चोरी, दरोडा आणि इतर गुन्हेगारी घटनांची नोंद झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर पोलिसांची गस्त वाढवावी आणि संवेदनशील ठिकाणी अधिक सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Read More

धुळे | आक्षेपार्ह स्टेटसवरून दोन गटांत वाद; दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी

धुळे : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील स्टेटसच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आले. वाद वाढल्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती कारवाई सुरू आहे. सोशल मीडियावरील अफवा किंवा आक्षेपार्ह पोस्टमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.या प्रकरणात नेमके किती जण जखमी झाले आणि किती जणांवर कारवाई झाली, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Read More

साखर विक्रीच्या नियमांत मोठा बदल; मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

साठेबाजीला बसणार चाप, सप्टेंबरपासून साखर कारखान्यांसाठी पंधरवड्याचा विक्री कोटा नवी दिल्ली | प्रतिनिधी देशातील साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि साखरेच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने साखर विक्रीच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२६ पासून साखर कारखान्यांसाठी असलेली मासिक कोटा पद्धत रद्द करून पंधरवड्याची (Fortnightly) विक्री कोटा पद्धत लागू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बाजारात साखरेचा पुरवठा नियमित राहण्यास मदत होणार असून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या प्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे. महिन्याऐवजी आता पंधरवड्याचा कोटा सध्या साखर कारखान्यांना महिन्याच्या आधारावर साखर विक्रीचा कोटा दिला जातो. मात्र, काही ठिकाणी महिन्याच्या सुरुवातीला विक्री झालेली साखर प्रत्यक्षात महिन्याच्या शेवटी उचलली जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. त्यामुळे बाजारात काही काळ साखरेची उपलब्धता कमी भासून कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता होती. ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकारने आता पंधरवड्याच्या आधारावर साखर विक्रीचा कोटा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या पद्धतीत कारखान्यांना त्यांच्या वाटपातील किमान ४० टक्के साखर पहिल्या आठवड्यात विकावी लागणार असून उर्वरित साखर त्यानंतरच्या आठवड्यात विकावी लागेल. विकलेली साखर ७ दिवसांत पाठवावी लागणार केवळ साखर विक्री करून ती कारखान्यातच पडून राहू नये, यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम केला आहे. विक्री झालेली साखर सात दिवसांच्या आत कारखान्यातून डिस्पॅच करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे साखर कारखान्यांपासून व्यापारी, वितरक आणि पुढे किरकोळ बाजारापर्यंत साखरेचा प्रवाह वेगाने होण्यास मदत होईल. साठेबाजीवर सरकारची करडी नजर साखरेच्या वाढलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर साठ्याची देशव्यापी तपासणीही सुरू केली आहे. काही साखर कारखान्यांकडे त्यांच्या मासिक अहवालात दाखवलेल्या साठ्यापेक्षा प्रत्यक्षात अधिक साखर असल्याचे तपासणीत आढळल्याचे सरकारने म्हटले आहे. याशिवाय, काही कारखाने त्यांना मंजूर केलेल्या कोट्यापेक्षा कमी साखर विकत असल्याचेही निदर्शनास आले. अशा प्रकारांमुळे बाजारातील पुरवठा कृत्रिमरीत्या कमी होऊ शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे. ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता दरम्यान, सरकारच्या उपाययोजनांनंतर साखरेच्या एक्स-मिल किमतीत अलीकडच्या दिवसांत सुमारे २० टक्क्यांची घट झाल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. किरकोळ बाजारातील दरही खाली येण्यास सुरुवात झाली असून त्याचा फायदा पुढील काळात ग्राहकांना मिळण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या मते, देशात साखरेची कमतरता नसून साठेबाजी आणि सट्टेबाजीमुळे दरवाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पंधरवड्याचा कोटा, सात दिवसांत डिस्पॅच आणि साठ्याची तपासणी या उपायांमुळे बाजारातील साखरेचा पुरवठा अधिक पारदर्शक आणि नियमित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Read More

एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफी २०२६ मध्ये आर्यन बाविस्करची सुवर्ण कामगिरी; आदर्श शिक्षक एस. डी. भावसार यांच्याकडून विशेष गौरव

जळगाव | प्रतिनिधीएशियन ओपन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी २०२६ मध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावणाऱ्या आर्यन सुजीत बाविस्कर याच्या यशाचा जळगावमध्ये विशेष गौरव करण्यात आला.देहरादून येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आर्यनने ज्युनियर ई बॉईज ५०० मीटर आणि ३३३ मीटर या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावले. उपलब्ध वृत्तांनुसार, ३३३ मीटरची शर्यत आर्यनने ३५.४७ सेकंदांत पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला.या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी एकूणच दमदार कामगिरी केली. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसापर्यंत भारताच्या खात्यात ७ सुवर्ण, ५ रौप्य आणि ७ कांस्य अशी एकूण १९ पदके जमा झाली होती.आर्यनच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे मार्गदर्शक व आदर्श शिक्षक एस. डी. भावसार यांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामीण व स्थानिक पातळीवरून पुढे येत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्याच्या यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.आर्यनच्या यशामागे त्याचे पालक, प्रशिक्षक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्याच्या या कामगिरीमुळे जळगाव जिल्ह्यातील युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार आहे.

Read More

संतापलेल्या लहान भावाने चाकूने भोसकून थोरल्या भावाला संपवलं

जामनेर |प्रतिनिधी लहान भाऊ समीरने रोखण्याचा प्रयत्न केला असता दारूड्या मोहनने त्यालाही शिवीगाळ करत चाकूने मारण्याची धमकी दिली, ज्यामुळे वातावरण तापले.दारूसाठी झालेल्या वादातून भावानेच केलेल्या सख्ख्या भावाच्या हत्येची थरारक घटना समोर आली आहे. दारूच्या व्यसनामुळे घरात सतत गोंधळ घालणाऱ्या 21 वर्षीय मोहन चिंताराम बांते या तरुणावर त्याच्याच लहान भावाने चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांत आरोपी लहान भाऊ समीर चिंताराम बांते (वय 19 वर्षे) याला अटक केली आहे. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिनीमातानगर भागात ही घटना घडली.आईकडे पैशांची मागणी अन् घरातील सामानाची नासधूस मिळालेल्या माहितीनुसार, मृत मोहनला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो काहीही कामधंदा करत नव्हता. दारूसाठी तो रोज आई-वडिलांकडे पैशांसाठी तगादा लावत असे. बुधवारी रात्री 9 च्या सुमारास मोहन दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने आईकडे पुन्हा पैशांची मागणी सुरू केली. पैसे देण्यास नकार मिळताच त्याने आई-वडिलांना अश्लील शिवीगाळ करत घरातील वस्तूंची तोडफोड सुरू केली. तसेच, वस्तू घराबाहेर फेकण्यासही सुरुवात केली. लहान भाऊ समीरने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता मोहनने त्यालाही शिवीगाळ करत चाकूने मारण्याची धमकी दिली, ज्यामुळे वातावरण तापले.संतप्त समीरकडून चाकूने वार; पोलिसात गुन्हा दाखल थोरल्या भावाच्या रोजच्या त्रासाला आणि धमकीला कंटाळलेल्या समीरने संतापाच्या भरात चाकू घेऊन येत मोहनवर हल्ला चढवला. या हल्ल्यात मोहनच्या मान, पाठ, पोट आणि हातावर गंभीर जखमा झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहनला नातेवाईकांनी शेजाऱ्यांच्या मदतीने तातडीने मेयो दाखल केले. डॉक्टरांनी रुग्णालयात उपचारादरम्यान 3 ते 4 तासांतच त्याला मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली हत्येचा गुन्हा दाखल करून समीरला अटक केली असून हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे.

Read More

सरपंचाचा गावठी कट्ट्यातून भर चौकात हवेत गोळीबार; यावल पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

जामनेर | प्रतिनिधीयावल तालुक्यातील डांभुर्णी गावातील चौकात हवेत गोळीबार केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कोळन्हावी गावचे सरपंच विकास उर्फ गोटू सोळुंके यांनी गावठी कट्ट्यातून हवेत गोळी झाडल्याचा आरोप असून, या प्रकरणी यावल पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डांभुर्णी येथील चौकात ही घटना घडली. सार्वजनिक ठिकाणी अचानक गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी संशयित सरपंच विकास उर्फ गोटू सोळुंके यांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे का, तसेच गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याचा तपास पोलीस करत आहेत.दरम्यान, भर चौकात हवेत गोळीबार झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमागे नेमके कारण काय होते, गोळीबाराच्या वेळी अन्य कोणी उपस्थित होते का आणि शस्त्र त्यांच्याकडे कसे आले, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.याप्रकरणी यावल पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली असून, पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील तपास सुरू आहे. तपासातून गोळीबाराचे नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण तपशील समोर येणार आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!