जामनेर तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय लोकशाही दिन –तहसिलदार श्री आगळे यांनी नागरिकांच्य ऐकुन घेतल्या समस्या तक्रारी

जामनेर – ( प्रतिनिधी )जामनेर तहसिल कार्यालयाततालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले .या प्रसंगी नागरिकांच्या विविध विभागाशी संबंधित समस्या व तक्रारींची संक्षिप्त चौकशी करून आवश्यक कार्यवाही तहसिलदार श्री नाना साहेब आगळे यांच्या कडून करण्यात आली.यावेळी नायब तहसिलदार , इतर विभागाचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते . विभागप्रमुखांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या व तातडीने निराकरणासाठी पावले उचलली. लोकशाही दिनाच्या माध्यमातून शासन-प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक होत आहे.

Read More

बेटावद खुर्द येथे घरफोडी

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी जामनेरजामनेर : मुलगा दवाखान्याच्या कामासाठी मुंबईला गेल्याने त्याला उपचारासाठी आईने चांदीच्या पाटल्या विकून मिळालेले २० हजार व ५० हजाराचे सोन्याचे दागिने लोखंडी पेटीत ठेवले. मात्र चोरट्यांनी गुरुवारी रात्री घरफोडी करीत ७० हजाराचा मुद्देमाल लांबवल्याची घटना बेटावद खुर्द येथे घडली. राजेंद्र सुपडू पाटील (बेटावद खुर्द, ता. जामनेर) यांचे मोठे भाऊ दवाखान्याच्या कामासाठी मुंबईला गेले होते. २० हजाराची रोकड, २० ग्रॅमची सोन्याची पोत व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा ऐवज त्यांनी लोखंडी पेटीत ठेवला. खोलीला कुलूप लावून शेजारच्या घरात झोपायला गेले असताना ही चोरी झाली.

Read More

कुंभारी बु येथील तरुणांचा पत्नी सासू सासरे साला याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

वाकडी ता जामनेर दि कुंभारी बु येथील तरुणांचा ग्राम लपालि ता मोताळा येथे पत्नी सासु सासरे. शालक याच्या त्रासाला कंटाळून विष पाषाण करून आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचि घटना काल दि ८/ रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान सासुरवाडी येथे घडल्याने धामणगाव बडे .पो स्टेशन ला अमलदार गजानन पाटील यानी २८२/२०२५ कलम १०८,३(५)भारतीय न्याय सहिंता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलकुंभारी बु ता जामनेर येथील तरूण बादल हवसु मंडाळे हा काल दि ८ रोजी लपालि येथे सासुरवाडी ला पत्नी रुपाली हि गरोदरपणात माहेरी असल्याने व तिने पोटातील बाळ पाडले असे माहिती घेण्यासाठी व पत्नीला सोबत घेवून येतो असे भाचा यास सांगून गेला होता मात्र तिन वाजेच्या दरम्यान श्रीराम जोशी यांना फोन वरुन माहिती पडले कि बादल हवसु मंडाळे हा विषारि औषधी घेवून लपालि येथे मरण पावला सदर तरुण लपालि येथील बंडु होसा एकनार याच्या घरी नातेवाईक याना आढळून आला असता ग्रामस्थांनी दिलेल्या माहिती नुसार बादल हवसु मंडाळे व पत्नी रुपाली बादल मंडाळे .संजय जयराम भवर सासरा. लिलाबाई संजय भंवर सासू .अक्षय संजय भंवर शालक रा ग्राम लपालि याच्यात जोरदार वाद झाल्याने व त्याचे त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून मरण पावला असे फिर्यादी इंदूबाई चिंधु मुके रा कुंभारी बु ता जामनेर यांनी धामणगाव बडे पोलीस स्टेशन फिर्याद देण्यात आली आहे अमलदार गजानन पाटील यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उप निरीक्षक राहुल वरारकर याच्याकडे देण्यात आला आहे

Read More

जामनेर – जिवन कसे जगावे हे शिक्षक शिकवितात – प्रा.चंद्रकांत डागा- जामनेर येथे 37शिक्षक व 4 समाजसेवी यांचा केला सत्कार – भारतीय जैन संघटनेचा उपक्रम

जामनेर(वा.)- शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर सामाजिक व कौटुंबिक समज देऊन जिवन कसे जगावे याचे मार्गदर्शन ही शिक्षक करतात असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे खानदेश विभाग अध्यक्ष निवृत्त प्रा.चंद्रकांत डागा यांनी केले.ते येथील महावीर भवनमध्ये संघटनेच्या गुरू दक्षिणा फाउंडेशन कार्यक्रम अंतर्गत शिक्षा सारथी सन्मान सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन ओसवाल संघाचे अध्यक्ष व प्रायोजक ईश्वरलाल कोठारी होते.कार्यक्रमाची सुरुवात नमस्कार महामंत्र व सरस्वती पूजनाने झाली. एकूण 37शिक्षक व 4समाजसेवी यांचा सत्कार केला गेला.प्रा.डागा म्हणाले, शिक्षक दिननिमित्त आमच्या,आमच्या मुलांचा,आचार्यांचा,आई- वडिलांचा सन्मान करण्याचा हा दिवस.त्यांना बोलवून त्यांचा सन्मान करणे, त्यांचे दर्शन घेऊन, आशीर्वाद घेणे व पुढील पिढीला गुरुजनांचा सन्मान केला पाहिजे ही शिकवण यातुन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.प्रा.डागा संघटनेमार्फत स्मार्ट गर्ल्स,नव दंपत्ती सक्षमीकरण, दिल का जिगशॉ,परिणय पथ, एमएसएमई,अल्पसंख्याक कार्यशाळा, ईडब्ल्यूएस,कौटुंबिक लवाद आदि चालत असलेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती देऊन,ते राबविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. जामनेर ता.एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुरेश धाडीवाल म्हणाले, गुरू शिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय जिवन नाही. अध्यापन हे विद्यार्थी केंद्रीत असले पाहिजे. जे पडद्यामागे कार्य करतात अशा व्यक्तींना शोधून समाजापुढे आणले पाहिजे.महिला जिल्हाध्यक्ष सोनल कोठारी,शिक्षक विजय सेतवाल,उमेश बेदमुथा, संजय भुरट यांनी मनोगत व्यक्त केले.**या शिक्षकांचा झाला सन्मानरामचंद्र सैतवाल,सुदर्शन सैतवाल,प्रिती संघई,नितीन सैतवाल मिलिंद वास्कर, अनंत अरतकर,प्रा.राहुल शिंपी,अजय जैन,आरती सुदर्शन सैतवाल,शिल्पा कारंजकर, संदीप वाशिमकर,कविता वाशिमकर,तुषार जैन,निकिता अरतकर,रोहिणी शिंपी, कोमल चतुर,निकिता सुर्यवंशी,मंदाकिनी छाजेड, छगणलाल छाजेड, डॉ.दिपक सिसोदियामनीषा कोठारी,वंदना चोरडिया,आरती लोढा, मयूर भुरट,रूपल भुरट,मयूर संकलेचा,अतुल साबद्रा,सविता बोहरा,डॉ श्वेता राका,उमेशजी बेदमुथा,रीना चंडालिया, सारिका चोपडा,दिपाली चोरडिया,सोनाली सिसोदिया,ईश्वर चोरडिया,संजय भुरट,प्रा.चंद्रकांत डागासमाजसेवी ईश्वरलाल साबद्रा,महेंद्र नवलखा,प्रकाश सैतवाल,पारस ललवाणी आदींचा सत्कार शाल,सन्मानपत्र व माळा देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ.सोनाली सिसोदिया तर आभारप्रदर्शन सचिन चोपडा यांनी केले.ओसवाल संघाचे मंत्री डॉ.कांतीलाल ओसवाल,संघटनेचे विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत,माजी जिल्हा कार्याध्यक्ष शितल लोढा,सचिव संकल्प लोढा,सह सचिव आदित्य मंडलेचा, उपाध्यक्ष दर्शन भुरट,महिला सदस्य भावना बोहरा,प्रोजेक्ट हेड विकास ललवाणी,वैभव छाजेड,सौ मनिषा कोठारी,सौ वंदना चोरडिया आदी सदस्य उपस्थित होते.

Read More

कचरा संकलन करणाऱ्या कामगारांच्या मुलां सोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा अल्पोहार

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजळगाव — ( प्रतिनिधी )कचरा संकलन करणाऱ्या कामगारांच्या मुलांना खास निमंत्रण देऊन आज जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्यासोबत वेळ घालवला व अल्पोपहार केला. या छोट्या मुलांशी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी, त्यांची स्वप्ने व आकांक्षा याबाबत संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रार्थना व्यक्त केली की, एक दिवस हीच मुले सर्व अडथळे पार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून समाजाचे नेतृत्व करतील. हा क्षण खऱ्या अर्थाने आशा, समानता आणि गणेशोत्सवाच्या उत्साहाचा उत्सव ठरला – जो आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक मुलाला मोठी स्वप्ने पाहण्याचा व त्यांची पूर्तता करण्याचा अधिकार आहे.

Read More

जामनेर-जळगाव रोडवरील खड्ड्यांचा ‘फोटोशूट’ – नगरपरिषद व ठेकेदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह!”

जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर | प्रतिनिधीजामनेर-जळगाव रोडवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून, नगरपरिषदेकडून हजारो कोटी रुपयांचा खर्च करून करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वास्तविकता आता उघड होत आहे.(दि. 28 ऑगस्ट 2025) दुपारी समाजसेवक अविनाश बोरसे यांनी जामनेर-जळगाव रोडवरील प्रचंड खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक आगळावेगळा मार्ग निवडला. त्यांनी प्रत्यक्ष खड्ड्यात बसून “फोटोशूट” करून नगरपरिषद प्रशासन व ठेकेदारांच्या निष्काळजी कामावर तिखट टीका केली. अविनाश बोरसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले: “नगरपरिषदेकडून हजारो कोटी रुपये खर्च करूनही जामनेर-जळगाव रोडची अशी दयनीय अवस्था पाहून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदार आणि नगरपरिषद अधिकाऱ्यांनी दर्जेदार काम न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.” स्थानिक नागरिक, वाहनधारक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषी ठेकेदारांवर कारवाई करून भविष्यात दर्जेदार रस्ते बांधकाम व्हावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Read More

मा.खा.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर ३० रोजी जामनेरात

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे २१ वर्षीय सुलेमान खान या तरुणाचा जामनेर येथे कॅफेवर बसलेला असताना , बाहेर काढून १० ते १२ जणांनी अमानुषपणे मारहाण करत खून केला होता.या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र मोठी खळबळ उडाली होती.याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर दिनांक ३० ऑगस्ट,शनिवार रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,जामनेरला येणार आहे. त्यानंतर ते पुढे बेटावद खुर्द येथे जाऊन मयत सुलेमान खान याच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत.यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील,युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार,महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे,जिल्हा महासचिव योगेश तायडे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल इंगळे,जिल्हा उपाध्यक्ष इम्रान तडवी, जिल्हा सचिव रफिक बेग, ॲड.राजू मोगरे पाटील,जिल्हा संघटक बबन कांबळे,यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे यांनी कळविले आहे.

Read More

शहापूर धरणाजवळ भीषण अपघात बसच्या धडकेत एस.टी. कंडक्टर ईश्वर कंडागळे यांचा मृत्यू – गावात शोककळा

जामनेर (२५ ऑगस्ट):जे रोज प्रवाशांच्या जीवाची काळजी घेत बसने सुरक्षित घरी पोहोचवत होते… त्यांचेच जीवन बसच्या चाकाखाली संपले अशा शब्दांत आज गावकऱ्यांनी ईश्वर अरुण कंडागळे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील ईश्वर कंडागळे (वय 33) हे एस.टी. महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत होते. आज सायंकाळी शहापूर धरणाजवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर कंडागळे हे स्वतःच्या दुचाकीवरून जात असताना एस.टी. बस (क्र. MH 20 BL 3360) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर एवढा भीषण होता की ते जागीच कोसळले आणि मृत्यूने त्यांना कवटाळले.विडंबना म्हणजे ज्यांनी आयुष्यभर प्रवाशांची सेवा केली, त्यांचाच जीव अखेर एस.टी. बसच्या धडकेत गेला. या घटनेने सहकारी व ग्रामस्थ स्तब्ध झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.अपघातानंतर नागरिकांनी धाव घेत तात्काळ मदत केली. ईश्वर कंडागळे यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चिंचखेडा गाव शोकसागरात बुडाले आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मिळाली

Read More

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या अबिद हुसेन यास फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी शेंदुर्णीत प्रचंड मुक मोर्चा हजारो पुरुष महिलांचा सहभाग

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधीशेंदुर्णी येथील अबिद हुसेन शेख याने तो ज्या शाळेच्या बसवर चालक होता त्याच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी बलात्कार केला असुन याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी आरोपी व त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने मुक मोर्चा वाडी दरवाजा भागातुन काढण्यात आला.शहरातील मुख्य मार्गाने हा मुक मोर्चा शेंदुर्णी दुरक्षेत्र येथे पोहचला.या मोर्चात युवती, महिला, पुरुष यांचा मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग होता.हजारोच्या संख्येने हिंदु बांधव आरोपी यास फाशी झाली पाहिजे,लव्ह जिहाद बाबत फलक घेऊन मुक मोर्चात यात सहभागी झाले होते. यावेळी प्रखर वक्ते बजरंग दलाचे सह संयोजक प्रा.आशिष दुसाने,पुणे यांनी आपल्या घणाघाती भाषणात लव्ह जिहाद,हिंदु मुलींवर कसं जाळं फेकले जाते, त्यांना हळूहळू कसं अटकवलं जाते,मग मैत्री प्रेमाचं नाटक व नंतर लग्नाच्या साठी ब्लॅक मेल करुन धर्मांतर केले जाते यासाठी मोठं षडयंत्र असुन हिंदुंनी जागृत रहावे.मुलींना दुर्गा वाहीनीत तर मुलांना संघाच्या शाखेत पाठवावे आपण आपल्या धर्मासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.आरोपी व त्यांच्या सर्व साधीदाराला सुद्धा कडक शिक्षा व्हावी यासाठी जागृत राहुन ही प्रवृत्ती कायमस्वरूपी नष्ट व्हावी यासाठी सतर्क जागृत रहावे असे आवाहन केले.यावेळी उत्फुर्तपणे महिलांच्या वतीने सौ.लिना मनोज चव्हाण यांनी जोषपुर्ण भाषण केले व महिला मुलींना मार्गदर्शन केले. सकल हिंदु समाजाच्या वतीने विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सह मंत्री भिका इंदरकर यांनी प्रास्ताविक केले व निवेदनाच्या मागण्या वाचुन दाखवल्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी रचनात्मक हा मुक मोर्चा असल्याचे सांगितले पहुर पोलिस व पिंपळगाव हरेश्वर पोलिस यांचे आभार मानले. मोर्चात सहभागी महिलांनी याबाबतचे निवेदन पोलिस उपअधीक्षक अरुण आव्हाड,पहुरचे सपोनि.प्रमोद कठोरे शेंदुर्णी दुर क्षेत्र चे पोउनि.नंदकुमार शिंंब्रे यांना दिले.सपोनि.प्रमोद कठोरे यांनी सांगितले की आपल्या निवेदनाची दखल घेऊन वरिष्ठांना याबाबत कळवले जाईल असं आश्वासन दिले.यासाठी विश्व हिंदु परिषदेच्या तालुका पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले

Read More

७० वर्षाची परंपरा जोपासत श्रीराम पेठेत बारागाड्या उत्साहात साजर्‍या.

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर /प्रतिनिधी – आपले सण आपले उत्सव आपणचं साजरे करणार या ब्रिद वाक्याखाली पारंपरिक पद्धतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य बारागाड्या उत्सव शहरातील श्रीराम पेठ भागातील दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत ओढल्या गेल्या स्व. देवचंदबाबा शिंदे यांच्या प्रेरणेने सुरु केलेल्या बारागाड्या उत्सवाला आज सुमारे ७० वर्षाची परंपरा लाभली आहे. सविस्तर माहिती अशी श्रीराम पेठ भागात असलेले श्रीराम पेठ वासियांचे ग्रामदैवत तथा आराध्य दैवत असलेले खंडेराव महाराज यांच्या नावाने या भागात बारागाड्या ओढल्या जातात. या उत्सवास आज ७० वर्षाची परंपरा लाभली आहे सामाजिक एकात्मता हिच श्रीराम पेठ वासियांची ओळख असल्याने हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सद्ध्या तरी या बारागाड्या उत्सव काठीचा मान हा शिंदे परीवारा कडे असुन श्रीराम पेठ भागातील रहिवाश्यांकडुन तसेच शिंदे परीवारातील सदस्यांनी हा पारंपरिक व पुरातन वारसा कायम ठेवला आहे. दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत या बारागाड्या ओढल्या जातात तर पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने भाविक या उत्स्वात हजारोंच्या संख्येने सहभागी होत सोहळा साजरा करतात तर “खंडेराव महाराज की जय” तर “येळकोट येळकोट जय मल्हार” या घोषणांनी आसमान दणाणून सोडला जातो. आज जरी श्रीराम पेठ भागातील रहिवासी शहराच्या अन्य भागात विखुरलेले असले तरी आजच्या दिवशी लहान पासुन ते वयोवृद्ध व्यक्ती तसेच महिला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होतात. आज इंटरनेट युगात सुद्धा हि परंपरा टिकवून ठेवल्याचा आनंद आहे असा विश्वास श्रीराम पेठ भागातील रहिवासी मान्य करतात. त्यामुळे हिच सामाजिक एकता शहरात कुतुहलाचे मुख्य कारण ठरले आहे हा भव्य दिव्य सोहळा मोबाईलच्या कॅमेर्‍यात भाविकांनी कैद केला. खोबरे भंडाऱ्याची उधळण करुन मोठ्या धार्मिक वातावरणात नियोजित भक्तां करवी बारागाड्या ओढल्या जातात तर बारागाड्या ओढल्या नंतर उडीद व भाकर भंडाऱ्याची तथा महाप्रसादाचा लाभ भाविक घेत असतात या महाप्रसाद वाटपासाठी खंडेराव महाराज सेवा समिती कार्यान्वित असते.

Read More
error: Don't Try To Copy !!