गरुड महाविद्यालयाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत फेरीचे आयोजन…. .

आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथील करिअर कट्टा, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील व विशेषतः मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थी व सामान्य नागरिक यांच्या मदतीसाठी महाविद्यालयाच्या वतीने शेंदुर्णी गावात मदत रॅलीचे आयोजन करण्यात आले .सदर रॅलीमध्ये महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता या रॅलीच्या माध्यमातून शेंदुर्णी गावात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नागरिकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करून एकूण १३०००(तेरा हजार) रुपयाची आर्थिक मदत मिळविली .यामध्ये नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद देऊन

आपल्या स्वेच्छेने मदत दिली .सदर मदत फेरीमध्ये महाविद्यालयातील करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापिका डॉ. योगिता पांडुरंग चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. भूषण पाटील, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. अजिनाथ जीवरग ,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुजाता चंद्रकांत पाटील ,सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रोहिदास धोंडीबा गवारे, कनिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप कुंभार , सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. मुकेश पाटील तसेच महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.संजय भोळे, उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे, उपप्राचार्य डॉ. अमर जावळे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आप्पा महाजन, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ. महेश पाटील व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. महाविद्यालयाच्या रॅलीबद्दल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन मा. दादासाहेब संजयराव गरुड , संस्थेचे व्हा चेअरमन मा. श्री. आबासाहेब भीमराव शामराव शेळके, संस्थेचे सचिव काकासाहेब सागरमलजी जैन, सह सचिव दादासाहेब यू यू पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दीपकजी काशिनाथराव गरुड व सर्व संचालक मंडळ यांनी सदर उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले..

error: Don't Try To Copy !!