नाशिकमध्ये लेग्रँड समूहाकडून बंधारा प्रकल्प पूर्ण; ३,६५० हून अधिक नागरिकांना लाभ

नाशिक, २५ ऑगस्ट : पाणीटंचाईवर मात करण्यासोबतच भूजलसाठा बळकट करण्याच्या उद्देशाने लेग्रँड समूह इंडियाने सीएसआर उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील शास्त्रीनगर गावात बंधारा प्रकल्पाचे काम पूर्ण केले आहे. या प्रकल्पाचा लाभ शास्त्रीनगर तसेच गंगाम्हाळुंगी या दोन्ही गावांतील नागरिकांना होणार आहे. दुष्काळप्रवण भागातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा करण्यास मदत होणार आहे. बंधाऱ्यात ९४ लाख लिटरपेक्षा अधिक पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असून, वर्षातून अंदाजे दोन वेळा हा साठा भरण्याची अपेक्षा आहे. तसेच दरवर्षी ८.३२ लाख लिटरपेक्षा अधिक भूजल पुनर्भरणाची क्षमता या प्रकल्पामुळे निर्माण झाली आहे. या प्रकल्पामुळे पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी तसेच सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून, स्थानिक शेतकरी कुटुंबांना हंगामी पाणीटंचाईचा सामना करण्यास दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दोन्ही गावांतील ३,६५० हून अधिक लाभार्थींना या प्रकल्पाचा सकारात्मक फायदा होणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाचे नेतृत्व लेग्रँड समूह इंडियाचे सीओओ दीपक पाटील आणि सीएसआर प्रमुख आबिदा अनीस यांनी केले. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, समुदाय नेते, प्रकल्पाची अंमलबजावणी करणारे भागीदार तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.लेग्रँड समूह इंडियाच्या सीएसआर व शाश्वतता विभागाच्या प्रमुख आबिदा अनीस यांनी सांगितले की, पाणी हे समुदाय, उपजीविका आणि परिसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे संसाधन आहे. हा बंधारा केवळ जलसंधारणाचे काम नसून हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्याची क्षमता वाढविणे आणि ग्रामीण कुटुंबांच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक असल्याचे त्यांनी नमूद केले.गंगाम्हाळुंगी येथील शेतकरी छगन हिरे यांनी या प्रकल्पामुळे गावातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना दूरवर जावे लागत होते; मात्र बंधाऱ्यामुळे शेती आणि पशुधनासाठी पाण्याची अधिक विश्वासार्ह उपलब्धता निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि शाश्वत ग्रामीण विकासाच्या माध्यमातून स्थानिक समुदायांची जलसुरक्षा बळकट करण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. नाशिकमध्ये लेग्रँड समूहाकडून बंधारा प्रकल्प पूर्ण; ३,६५० हून अधिक नागरिकांना लाभनाशिक | २५ ऑगस्ट २०२६ पाणीटंचाईवर मात करण्यासोबतच भूजलसाठा बळकट करण्याच्या उद्देशाने लेग्रँड समूह इंडियाने सीएसआर उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील शास्त्रीनगर गावात बंधारा प्रकल्प पूर्ण केला आहे. या प्रकल्पाचा लाभ शास्त्रीनगर तसेच गंगाम्हाळुंगी या दोन्ही गावांतील नागरिकांना होणार आहे. दुष्काळप्रवण भागातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा करण्यास मदत होणार आहे. या बंधाऱ्यात ९४ लाख लिटरपेक्षा अधिक पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असून, वर्षातून अंदाजे दोन वेळा हा साठा भरण्याची अपेक्षा आहे. तसेच दरवर्षी ८.३२ लाख लिटरपेक्षा अधिक भूजल पुनर्भरणाची क्षमता या प्रकल्पामुळे निर्माण झाली आहे. शेती, पशुधन आणि पिण्याच्या पाण्यासाठी दिलासाबंधाऱ्यामुळे पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी तसेच सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी कुटुंबांना हंगामी पाणीटंचाईचा सामना करताना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. शास्त्रीनगर आणि गंगाम्हाळुंगी या दोन्ही गावांतील ३,६५० हून अधिक नागरिकांना या प्रकल्पाचा थेट सकारात्मक फायदा होणार आहे. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटनप्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाचे नेतृत्व लेग्रँड समूह इंडियाचे सीओओ दीपक पाटील आणि सीएसआर प्रमुख आबिदा अनीस यांनी केले. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, समुदाय नेते, प्रकल्पाची अंमलबजावणी करणारे भागीदार तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. लेग्रँड समूह इंडियाच्या सीएसआर व शाश्वतता विभागाच्या प्रमुख आबिदा अनीस यांनी सांगितले की, पाणी हे समुदाय, उपजीविका आणि परिसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे संसाधन आहे. हा बंधारा केवळ जलसंधारणाचा प्रकल्प नसून हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्याची क्षमता वाढविणे आणि ग्रामीण कुटुंबांच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांनाही मोठी अपेक्षागंगाम्हाळुंगी येथील शेतकरी छगन हिरे यांनी या प्रकल्पामुळे गावातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना दूरवर जावे लागत होते; मात्र बंधाऱ्यामुळे शेती आणि पशुधनासाठी पाण्याची अधिक विश्वासार्ह उपलब्धता निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि शाश्वत ग्रामीण विकासाच्या माध्यमातून स्थानिक समुदायांची जलसुरक्षा बळकट करण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Read More

जळगावच्या औद्योगिक विकासाला नवी गती; ‘डी प्लस’ धोरणासाठी प्रस्ताव सादर करण्याचे उद्योगमंत्र्यांचे निर्देश

जळगाव : जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करावा, असे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. मंगळवारी मंत्रालयात जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक विकासाचा आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत हे निर्देश देण्यात आले. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, चंद्रकांत सोनवणे, अमोल जावळे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगन, जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच एमआयडीसी आणि जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरण लागू करण्याच्या प्रस्तावाला गती देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. या धोरणामुळे जिल्ह्यातील उद्योगांना विविध सवलती व प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार असून, नवीन उद्योग आणि गुंतवणूक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे. चिंचोली, कुसुंबा एमआयडीसीच्या विस्ताराला गती चिंचोली आणि कुसुंबा एमआयडीसीच्या विस्तारासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देशही उद्योगमंत्र्यांनी दिले. भूसंपादनाचे मूल्यांकन आणि दर निश्चितीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले. भूसंपादन करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही आणि उद्योजकांनाही परवडेल, अशा समन्वयातून प्रस्ताव मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. निष्क्रिय भूखंडांवर कारवाईचे निर्देश एमआयडीसीमध्ये भूखंड घेतल्यानंतर अनेक वर्षे उद्योग सुरू न करणाऱ्या तसेच भूखंड परस्पर भाड्याने देणाऱ्या भूखंडधारकांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अशा भूखंडधारकांना नोटिसा देऊन आवश्यकतेनुसार भूखंड ताब्यात घेऊन ते नवीन आणि गरजू उद्योजकांना उपलब्ध करून देण्याचेही स्पष्ट करण्यात आले. रस्ते, पाणी आणि पथदिव्यांवर भर औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, पथदिवे आणि पाणीपुरवठ्याची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. रस्त्यांचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण दर्जेदार पद्धतीने तसेच निर्धारित वेळेत करण्याचे निर्देशही देण्यात आले. पाचोरा, मुक्ताईनगर, चोपडा आणि भुसावळ येथील एमआयडीसीशी संबंधित प्रलंबित भूसंपादन, सर्वेक्षण आणि रस्ते जोडणीच्या कामांची संयुक्त पाहणी करून एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यातील आदिवासी आणि स्थानिक भागातील क्लस्टर विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे ‘डी प्लस’ धोरणासोबतच औद्योगिक पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. दरम्यान, २३ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १०२ उद्योगांसाठी तब्बल ₹१,४४५.६८ कोटींचे सामंजस्य करार झाले असून, सुमारे ४,७१६ रोजगारनिर्मिती अपेक्षित असल्याचेही समोर आले आहे.

Read More

यावलच्या विकासासाठी सत्ताधारी नगरसेवक एकवटले; ७ कोटींच्या निधीची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

यावल : यावल शहरातील विकासकामांना गती मिळावी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी सत्ताधारी नगरसेवक व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत ७ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली. या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रतिभा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांचे सहकार्य लाभले. यावल शहरातील विविध विकासकामांसाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष कदीर खान, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक उमेश फेगडे, विद्यमान नगरसेवक हेमराज फेगडे उर्फ बाळूदादा तसेच भाजपाच्या गटनेत्या नंदा महाजन यांचे चिरंजीव उपस्थित होते. यावल शहराच्या विकासासंदर्भातील विविध मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः यावल शहरातील अल्पसंख्याक भागाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अल्पसंख्याक भागासह शहरातील विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. शासनाकडून ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यास यावल शहरातील अनेक प्रलंबित विकासकामांना चालना मिळणार असून, नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Read More

पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही!

आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा जळगांव | प्रतिनिधीपोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही!आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारापुणे | प्रतिनिधीअंगणवाडीतील बालके आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पोषण आहारात कोणत्याही प्रकारची गडबड, निष्काळजीपणा किंवा निकृष्ट दर्जाचा आहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीतील पोषण आहारासंदर्भातील प्रकार समोर आल्यानंतर पुणे जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध धान्य तसेच शिजवला जाणारा पोषण आहार तपासण्यात येणार आहे.आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अधिनस्त मुख्यसेविका आणि पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तपासणीमध्ये पोषण आहार खराब किंवा अयोग्य दर्जाचा आढळल्यास तो संबंधित पुरवठादाराकडून तात्काळ बदलून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. तसेच पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.बालकांच्या पोषण आणि आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आदिती तटकरे यांनी दिल्याने अंगणवाडी प्रशासन आणि संबंधित पुरवठादारांमध्ये आता सतर्कता वाढली आहे. अंगणवाडीतील बालके आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पोषण आहारात कोणत्याही प्रकारची गडबड, निष्काळजीपणा किंवा निकृष्ट दर्जाचा आहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीतील पोषण आहारासंदर्भातील प्रकार समोर आल्यानंतर पुणे जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध धान्य तसेच शिजवला जाणारा पोषण आहार तपासण्यात येणार आहे. आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अधिनस्त मुख्यसेविका आणि पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीमध्ये पोषण आहार खराब किंवा अयोग्य दर्जाचा आढळल्यास तो संबंधित पुरवठादाराकडून तात्काळ बदलून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. तसेच पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बालकांच्या पोषण आणि आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आदिती तटकरे यांनी दिल्याने अंगणवाडी प्रशासन आणि संबंधित पुरवठादारांमध्ये आता सतर्कता वाढली आहे.

Read More

निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल मालदाभाडी चे घवघवीत यश

जामनेर:- 25/08/2026अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य शाखा जामनेर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, मालदाभाडी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये पाचवी ते सातवी च्या पहिल्या गटात कु. मोहिनी जितेंद्र पाटील द्वितीय व याच गटात कु. नेहा दिलीप परखड हीने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच आठवी ते दहावीच्या गटात कु. पूर्वी संतोष नानोटे हीने द्वितीय क्रमांक मिळविला. या स्पर्धकांचा शाळेचे मुख्याध्यापक एस आर शिकोकार यांनी सत्कार केला. तसेच मार्गदर्शक विजय सैतवाल सर यांचे कौतुक केले. शाळेत शुद्धलेखन सराव व मुद्देसूद विषय मांडणीचे मार्गदर्शन मराठी विषय शिक्षक विजय सैतवाल सरांनी आम्हाला केले यामुळेच आम्ही यश संपादन करु शकलो असे स्पर्धकांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस. पाटील यांनी केले तर आभार आर. एल. कोळी यांनी मानले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ए. बी. पाटील, श्रीमती एस. एस. सोनवणे, श्रीमती के. आर. सुरवाडे, मनोज जैन यांसह पंचक्रोशीतील मान्यवर, गावकरी यांनी अभिनंदन केले आहे

Read More

नेरी येथे रस्ता रोको आंदोलन; दहा दिवसांत महामार्ग दुरुस्तीचे आश्वासन

जामनेर तालुका | नेरी :25/08/2026 जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गाची झालेली दुरवस्था आणि रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जामनेर तालुक्यातील नेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनामुळे जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून येत्या दहा दिवसांत रस्त्यावरील दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतले. मात्र, दहा दिवसांच्या मुदतीत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या वतीने देण्यात आला आहे. महामार्गाची तातडीने दुरुस्ती करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Read More

तीस वर्षांची निष्कलंक सेवा तरीही सक्तीच्या सेवानिवृत्तीचा बडगा: तरुण सुपुत्राने उठविला अन्यायाविरुद्ध आवाज

​जामनेर: ३० वर्षांची निष्कलंक सेवा, तरीही सक्तीच्या सेवानिवृत्तीचा बडगा; तरुण सुपुत्र प्रारब्ध गोसावी यांचा वडिलांच्या न्यायासाठी लढा सुरू!​जामनेर (विशेष प्रतिनिधी):सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) अंतर्गत ३० हून अधिक वर्षे अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्कलंक सेवा बजावणाऱ्या एका वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यावर ओढावलेल्या अन्यायाविरुद्ध त्यांच्या तरुण सुपुत्राने आता लढाऊ भूमिका घेतली आहे. जामनेर येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त कर्मचारी श्री. शिवचरण रामपुरी गोसावी यांना कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात घडलेल्या एका किरकोळ तांत्रिक बाबीमुळे थेट ‘सक्तीच्या सेवानिवृत्तीची’ कठोर शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यांचे सुपुत्र प्रारब्ध गोसावी हे या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी धडपडत आहेत. सध्या या आदेशाविरुद्ध मुख्य अभियंता कार्यालय, नाशिक येथे अपील प्रलंबित आहे.​प्राप्त माहितीनुसार, श्री. शिवचरण गोसावी यांनी आपल्या आयुष्याची तीन दशके शासकीय सेवेत समर्पित केली आहेत. परंतु, एका प्रकरणात त्यांना थेट सक्तीची सेवानिवृत्ती दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक व मानसिक संकट ओढावले आहे. वडिलांवरील या अन्यायाविरोधात त्यांचे सुपुत्र प्रारब्ध गोसावी यांनी स्वतः सर्व पाठपुरावा हाती घेतला असून, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, जळगाव यांनी दिनांक ०७/०८/२०२६ रोजीच्या पत्रान्वये (महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९७९ मधील नियम ५ नुसार) ‘किरकोळ शिक्षेचे’ पर्याय उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत एक अत्यंत सकारात्मक शिफारस मुख्य अभियंता, नाशिक यांच्याकडे पाठवली आहे.​नाशिक कार्यालयाकडे अपील दाखलया शिफारसीनंतर, प्रारब्ध गोसावी यांनी स्वतः पाठपुरावा करून या प्रकरणाची कागदपत्रे व अपील दिनांक १३/०८/२०२६ रोजी मुख्य अभियंता कार्यालयात अधिकृतपणे दाखल केले असून (आवक क्र. ७४९५), त्यावर सध्या प्रशासकीय स्तरावर अभ्यास सुरू आहे. परंतु, दिवस लोटूनही अद्याप अंतिम निर्णय न झाल्यामुळे प्रारब्ध गोसावी यांनी प्रशासनाच्या भूमिकेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.​वडिलांच्या ३० वर्षांच्या प्रामाणिक सेवेचा व वृद्धपळाचा विचार करून या अन्यायकारक आदेशाचे तात्काळ पुनरावलोकन करावे आणि नियमानुसार किरकोळ शिक्षा देऊन न्याय द्यावा, अशी आर्त हाक सुपुत्र प्रारब्ध गोसावी व त्यांच्या कुटुंबीयांतर्फे दिली जात आहे. जर यावर लवकरात लवकर योग्य निर्णय झाला नाही, तर हा लढा आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा प्रारब्ध गोसावी यांनी दिला आहे.

Read More

CJP 5 सप्टेंबरला पुन्हा दिल्लीत धडकणार; इंडिया गेट ते दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत मोर्चाची घोषणा

नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2026 केंद्र सरकारने 25 जुलै रोजी दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप करत *कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने पुन्हा दिल्लीमध्ये आंदोलनाची घोषणा केली आहे. CJP कडून **5 सप्टेंबर 2026 रोजी शांततापूर्ण मोर्चा** काढण्यात येणार असून, हा मोर्चा **इंडिया गेटपासून सुरू होऊन नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत** जाणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व **NEET प्रकरणातील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसह कथित पोलिस अत्याचाराच्या पीडितांकडून** करण्यात येणार असल्याचे CJP ने म्हटले आहे. देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. 25 जुलैच्या आंदोलनानंतर सरकारने काही आश्वासने दिली होती; मात्र ती पूर्ण झाली नसल्याचा दावा CJP करत आहे. त्यामुळे सरकारला दिलेली आश्वासने पूर्णकरण्याची मागणी करत 5 सप्टेंबरचा मोर्चा काढण्यात येणार आहे. **दरम्यान, 5 सप्टेंबरच्या आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.**

Read More

उद्या बँकेत जाणार असाल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद; जाणून घ्या कारण

जळगाव | 25 ऑगस्ट 2026 :बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम उद्या करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बुधवार, 26 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. ईद-ए-मिलाद/मिलाद-उन-नबी निमित्त विविध राज्यांमध्ये बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातही बँका बंद महाराष्ट्राच्या 2026 सार्वजनिक सुट्टीच्या अधिकृत यादीत 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बँकांच्या शाखांमध्ये प्रत्यक्ष ग्राहक सेवा उपलब्ध राहणार नाही. मुंबई, नागपूर आणि बेलापूरसह महाराष्ट्रातील संबंधित बँक शाखांवर या सुट्टीचा परिणाम होणार आहे. देशातील अनेक शहरांमध्येही सुट्टी 26 ऑगस्ट रोजी बँक सुट्टी असलेल्या ठिकाणांमध्ये मुंबई, नागपूर, बेलापूर, नवी दिल्ली, लखनऊ, कानपूर, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, भोपाळ, जयपूर, जम्मू, श्रीनगर, कोची, तिरुवनंतपुरम, पटना, रायपूर, रांची आणि इम्फाळ यांसह अनेक शहरांचा समावेश आहे. मात्र बँक सुट्ट्या राज्य आणि शहरानुसार बदलत असल्याने आपल्या शाखेची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे. ऑनलाइन बँकिंग मात्र सुरू राहणार बँकेच्या शाखा बंद असल्या तरी UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि ATM यांसारख्या डिजिटल सेवा सामान्यतः सुरू राहतील. मात्र चेक क्लिअरन्स, कागदपत्र पडताळणी, खाते उघडणे किंवा शाखेत प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असलेली कामे पुढे ढकलावी लागू शकतात. ग्राहकांनी काय करावे? बँकेत प्रत्यक्ष जाऊन करावयाचे काम असल्यास ते आजच पूर्ण करून घ्यावे किंवा पुढील कार्यदिवसासाठी नियोजन करावे. विशेषतः रोख रक्कम जमा करणे, चेकशी संबंधित काम, कागदपत्रे जमा करणे आणि शाखेत करावयाच्या इतर कामांसाठी ग्राहकांनी वेळेपूर्वी नियोजन करणे आवश्यक आहे. JBN News आवाहन:बँकेची शाखा बंद असली तरी डिजिटल व्यवहार उपलब्ध असू शकतात. मात्र महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांपूर्वी आपल्या संबंधित बँकेकडून किंवा शाखेकडून सुट्टीची खात्री करून घ्या.— JBN News

Read More

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी मोठी खुशखबर; कोणत्याही क्षणी खात्यात जमा होणार हप्ता

मुंबई, दि. २५ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात योजनेचा पुढील हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतल्याचे वृत्त असून, सुमारे १.५० कोटी पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती आहे. रक्षाबंधनाआधी मिळणार हप्ता? ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹१,५०० आर्थिक मदत दिली जाते. रक्षाबंधनाच्या आधीच पुढील हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ₹१,५०० जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हप्ता जमा झाल्यानंतर लाभार्थी महिलांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बँकेकडून SMS मिळू शकतो.

Read More
error: Don't Try To Copy !!