पहुर : भारतीय जैन संघटना आणि महावीर पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षक सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. प्रमोद कठोरे (पी.आय, पहुर पोलीस स्टेशन) होते. प्रमुख उपस्थितीत श्री. प्रदीपभाऊ लोढा (चेअरमन, महावीर पब्लिक स्कूल), श्री. पवन रुणवाल (सह सचिव, भारतीय जैन संघटना, जळगाव जिल्हा), श्री. स्वप्निल छाजेड़ (शहराध्यक्ष, भारतीय जैन संघटना), श्री. अरविंद चौरडिया, श्री. सुनील लोढा, श्री. रूपेश लोढा आणि श्री. दीपक लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. ईश्वर मूळचंद चौरडिया, सुनयना मनोज रुणवाल, शंकर रंगनाथ भामरे यांच्यासह एकूण २० आदरणीय शिक्षकांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहराध्यक्ष स्वप्निल भैया छाजेड़, श्री. सुनील लोढा, श्री. रूपेश लोढा, सौ. भाग्यश्री बेदमुथा, सौ. आरती कोटेचा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या सोहळ्याला पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. क्षीरसागर, उपाध्यक्ष जोशी, सचिव भामरे सर, शरद बेलपत्रे तसेच अन्य पत्रकार बांधव आणि भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेच्या वतीने सर्व मान्यवर, शिक्षक आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले

