छत्रपती शिवाजी ब्रिगेड जामनेर तालुकाध्यक्ष पदी अमोल ठोंबरे.तर उपाध्यक्षपदी प्रविण गावंडे.

जामनेर (प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुकाध्यक्ष म्हणून अमोल ठोंबरे यांची तर उपाध्यक्ष म्हणून प्रविण गावंडे यांची निवड करण्यात आली.त्यांना छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी जामनेर तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून नवनियुक्त अध्यक्ष,उपाध्यक्ष यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यावेळी तालुका कार्यकारणी बैठकिला संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, डॉ.धनंजय बेंद्रे,जिल्हा उपाध्यक्ष कैलास पाटील , सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील , नितीन पाटील, l नारायण महाजन, प्रमोद पाटील, कैलास बडगुजर , शरद मोरे, दीपक बावस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

मुख्याध्यापकाचा लाचखोरीचा प्रयत्न उधळला; लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकावर दुसऱ्यांदा कारवाई

निपाणे (ता. एरंडोल), जि. जळगाव | प्रतिनिधी संत हरिहर माध्यमिक विद्यालय, निपाणे येथील मुख्याध्यापकाने शाळेतील शिपायाकडून वैद्यकीय बिल मंजुरीसाठी ३६०० रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव युनिटने या प्रकरणी सापळा कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असून त्यांच्या पत्नीच्या ₹२३,८१५/- रुपयांच्या वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करून घेण्यासाठी मुख्याध्यापक संदिप प्रभाकर महाजन (वय ४५, रा. नेपाणे) यांनी ₹५,०००/- लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ₹३,६००/- ठरली होती. या संदर्भात तक्रारदाराने २१ डिसेंबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करत असताना मुख्याध्यापक महाजन यांनी पुन्हा लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, लाच स्वीकारण्यापूर्वीच विभागाने कारवाई करत आरोपीविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ८५/२०२५, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८, कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही संदिप महाजन यांच्यावर वेतन निश्चितीच्या फरकाच्या ₹२,५३,७८०/- रुपयांवरून ५ टक्के लाचेची मागणी करून ₹१०,०००/- रु. स्वीकारल्याचा गुन्हा २७ जून २०२४ रोजी दाखल करण्यात आला होता (गु.र.क्र. १०५/२०२४). ही कारवाई पोलीस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ किशोर महाजन, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ प्रदीप पोळ यांचा समावेश होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली

Read More

शहापूर येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ; २०८ लाभार्थ्यांना ऑनलाईन पासचे वितरण

शहापूर (ता. जामनेर) | प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील शहापूर गावात घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी मा. विनय गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ऑनलाईन पद्धतीने ETP पास जनरेट करून खडकी नदीपात्रातून वाळूचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामार्फत घरकुल बांधणीसाठी आवश्यक वाळू सरकारी पातळीवरून मोफत देण्यात येत असून, गरजू लाभार्थ्यांना या सुविधेचा थेट लाभ मिळाला आहे. एकूण २०८ लाभार्थ्यांना ऑनलाईन पासेस वितरित करण्यात आले. उपस्थित मान्यवर:या कार्यक्रमावेळी तहसीलदार जामनेर, गटविकास अधिकारी जामनेर, ग्राम महसूल अधिकारी शहापूर, ग्रामपंचायत अधिकारी शहापूर, पोलीस पाटील शहापूर, व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तांत्रिक पारदर्शकता आणि सुलभता:ETP प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली गेली असून लाभार्थ्यांनी शासनाच्या या सुविधेचे स्वागत केले आहे. गावकऱ्यांनी या उपक्रमामुळे घरकुल बांधणीला गती मिळेल, अशी भावना व्यक्त केली.

Read More

जामनेर बसस्थानकात प्रवासी महिलेला लुटले; 25 ग्रॅम सोन्याची पोत चोरीला.

जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बु. येथील मिराबाई राघो पाटील (वय 75) या ज्येष्ठ महिला जामनेर येथून पाचोरा जाणाऱ्या एस. टी. बसने प्रवास करत असताना त्यांच्याकडील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (15 मे 2025) रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली. मिराबाई पाटील या आंबे वडगाव येथे एका लग्नाच्या कार्यासाठी निघाल्या होत्या. त्या जामनेर एस. टी. बसस्थानकावरून पाचोरा मार्गे प्रवास करत असताना, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून चोरली. ही घटना लक्षात येताच त्यांनी तपास केला, मात्र तोपर्यंत चोरट्याने पोत लंपास केली होती. या प्रकारामुळे जेष्ठ महिला अत्यंत हादरल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच त्यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जामनेर बसस्थानकात सुरक्षेअभावी गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. जरी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून सुसज्ज बसपोर्ट उभारण्यात आले असले तरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आणि बसस्थानक व्यवस्थापनातील दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी बसस्थानकावर तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून अशा घटना रोखता येतील. जामनेर आगार प्रमुखांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि भविष्यातील सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.[9:09 pm, 15/05/2025] Eshwer Chordiya 222: अवैध देशी व विदेशी दारू विक्रीस आळा घालण्यासाठी फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवारी (दि. १३ मे २०२५) रोजी पहाटे एक मोठी कारवाई करत ओमनी गाडीतून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, फत्तेपूर शहरातील गोद्री रोडवरून ओमनी (क्रमांक MH 28 AN 4092) गाडीतून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पो.ह. प्रवीण चौधरी, पो.कॉ. मुकेश पाटील आणि पो.कॉ. भूषण पाटील यांच्या पथकाने टी पॉईंटजवळ नाकाबंदी लावली. सकाळी ३.२० वाजताच्या सुमारास सदर वाहन थांबवून तपासणी केली असता, कमलाकर अण्णा सपकाळ (वय ३३, रा. शिवणा, ता. सिल्लोड, जि. संभाजीनगर) हा ५४ बॉक्स देशी दारूसह सापडला. या बॉक्समध्ये भिंगरी देशी दारूचे ३९ बॉक्स, टंगो पंच ५ बॉक्स आणि सखु संत्रा देशी दारूचे १० बॉक्स अशा एकूण ५४ बॉक्समध्ये अंदाजे रु. १.८२ लाखांचा दारूचा साठा आढळून आला. सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कलम ६५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२५ आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव व पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करत आहेत. या कारवाईमुळे जामनेर तालुक्यातील अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, फत्तेपूर पोलीसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More

जामनेर तालुका मराठा सेवा संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर…!

जामनेर :- दि. 30/03/2025 रोजी मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथ यात्रा व मराठा जोडो अभियान चे औचित्यसाधत जामनेर तालुका मराठा सेवा संघाची नुतन कार्यकारणी गठित करण्यात आली.जामनेर येथील मराठा समाज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करत जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मा.शिवश्री सुमित पाटील तर प्रमुख अतिथी म्हणुन सेवा संघ राज्यउपाध्यक्ष मा.शिवश्री सुरेंद्र पाटील व संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष मा.शिवश्री सुरेश पाटील व निरीक्षक म्हणुन जिल्हा उपाध्यक्ष मा.शिवश्री बि.आर.पाटील सर व विशाल ला़ॅन चे संचालक डि. एन. चोैधरी विचारमंचावर उपस्थित होते. मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्ष पदी शिवश्री दिपक ढोणी पाटील तर कार्याध्यक्षपदी शिवश्री. प्रमोद पाटील, उपाध्यक्षपदी शिवश्री दिपक वारांगणे पाटील, तालुका सचिव शिवश्री किशोर पाटील , शिवश्री प्रविण पाटील सहसचिवपदी व संघटक पदी शिवश्री दशरथ भाऊ पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या मार्गदर्शक मनोगता नंतर मान्यवरांच्या हस्ते नुतन कार्यकारणीचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व 21 एप्रील रोजी मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथ यात्रे संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील सेवा संघ कार्यकर्ते सामाजीक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी ,शिक्षक मंडळी ,वार्तांकन करणारे वार्ताहार, बहुजन परिवर्तनवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाकार्यध्यक्ष शिवश्री. योगेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. शिवश्री दिपक वारांगणे पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर नवनियुक्त तालुकाध्यक्ष शिवश्री दिपक ढोणी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.

Read More

सिद्धगड भवनी माता मंदिर व परिसराच विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार — नामदार गिरीश महाजन

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधव जामनेर —गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रामपूर ता. जामनेर येथील श्री सिद्धगड भवानी माता मंदिर संस्थानच्या नूतन श्री सिध्दगड भवानी माता मंदिराचा भूमिपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सपत्नीक भूमिपूजन आज केले.श्री सिद्धगड भवानी माता मंदिर संस्थानचा अध्यक्ष म्हणून मंदिराचा व मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना संस्थानच्या इतर सहकाऱ्यांची व भाविकांची मिळणारी खंबीर साथ बळ देणारी आहे असे मनोगत नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केले .याप्रसंगी भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते .

Read More

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गट विकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली आज गट विकास अधिकाऱ्यांची (BDO) आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी, निधीचा उपयोग, तसेच नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यात आला. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे: ✅ शासकीय योजनांची अंमलबजावणी: विविध योजनांची प्रगती व अडथळ्यांवर चर्चा.✅ ग्रामपंचायतस्तरावरील कामांचे परीक्षण: स्थानिक विकासकामांची स्थिती व नियोजन.✅ पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व स्वच्छता: या क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या योजनांचे पुनरावलोकन.✅ निधीचा योग्य वापर व पारदर्शकता: निधी वितरणाची समीक्षा व कार्यक्षमतेवर भर.✅ जनतेच्या तक्रारींचे निवारण: नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी अधिकाऱ्यांना कार्यप्रणाली अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, ठरवलेल्या वेळेत कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. “लोकहिताची कामे जलद व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांनी समन्वय साधून कार्य करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला गेला असून, गट विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे तात्काळ पालन करून प्रशासनाच्या जबाबदाऱ्या अधिक परिणामकारकरीत्या पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

Read More

हिवरखेडे दिगर ते पिंपळगाव बु पानंद रस्त्याने घेतला मोकळा श्वास

जामनेर तालुक्यात पानंद रस्ते खुले करणे मोहिमेस प्रशासनाकडून सुरुवात महाराष्ट्र राज्यातील सर्व शिव पानंद रस्ते खुले करण्याची मोहीम शासनाने हाती घेतली असून त्या योजनेचा शुभारंभ आज जामनेर तालुक्यात करण्यात आला असून मौजे हिवरखेडे दिगर ते पिंपळगाव बु असा शिव पानंद रस्ता आज रोजी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी व तहसीलदार जामनेर श्री नानासाहेब आगळे यांचे मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी तोंडापूर व ग्राम महसूल अधिकारी तोंडापूर यांनी संबंधित गावचे ग्राम विकास अधिकारी,सरपंच,पोलीस पाटील तसेच शेतकरी ग्रामस्थ यांचे मदतीने सदरचा शिव पानंद रस्ता अतिक्रमण आज रोजी JCB द्वारे काढण्यात येऊन सदरचा पानंद रस्ता शेतकरी बांधवांसाठी खुला करण्यात आलेला आहे.सदर रस्त्याचे एकूण अंतर हे अंदाजे २ किमी इतके असून अतिक्रमीत अंतर 0.500 km इतके आहे.सदर शिव रस्त्याचे अतिक्रमण काढल्याने या भागातील किमान १४० शेतकरी यांना याचा फायदा होणार आहे.सदरच्या मोहिमेतून सर्व शिव पानंद रस्त्याच्या हद्दी निश्चित करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतरस्ते तयार करण्यासाठी रोजगार हमी योजना व ग्रामविकास विभागाचे योजनेतून कामकाज करण्यात येणार आहे.सदर खुले करण्यात आलेल्या शेतरस्त्यांची नोंदी गावचे नकाशावर करणे बाबत शासन स्तरावरून नियोजन करण्यात येत आहे.तसेच शेतजमिनीच्या वाटप आदेशाचे अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ चे आदेशात देखील शेत रस्त्याचा उल्लेख करणे बाबत निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले आहेत.सदर शिवरस्ता खुला केल्याने परिसरातील नागरिक व शेतकरी बांधवानी शासनाच्या या योजनेबाबत समाधान व्यक्त केले आहे.सदरची अतिक्रमण खुले करण्याची कार्यवाही मंडळ अधिकारी तोंडापूर विजयकुमार बागडे, ग्राम महसूल अधिकारी श्री घुगे,ग्रामविस्तार अधिकारी,सरपंच व पोलीस पाटील व शेतकरी बांधव यांचे मदतीने लोकसहभागातून खुला करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

Read More

“बोधगया मुक्तीच्या लढ्यासाठी जळगावात आंदोलन

जळगाव | बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व इतर बौद्ध संघटनांनी एकत्र येत जळगावात जनजागृती मोहीम उघडली आहे. या लढ्याचा एक भाग म्हणून दि. ८ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे कार्यकर्ते प्रचारासाठी शहरात परिश्रम घेत आहेत. सुमित्र अहिरे, रविंद्र बाविस्कर व विक्रम जावे यांनी त्रिभुवन कॉलनी, के.सी. पार्क, महामाया बुद्धविहार, आंबेडकर नगर, प्रबुद्धनगर पिंप्राळा, शंकरआप्पा नगर या भागात जाऊन जनजागृती केली. संघटनेच्या म्हणण्यानुसार, “बोधगया महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.” आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

जामनेर तालुक्यात स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीची मोहीम सुरू

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर, (प्रतिनिधी)सुपडू जाधव : तालुक्यातील रेशन धान्यास पात्र कुटुंबाची ई-केवायसी सुरू झाली आहे. प्रत्येक लाभार्थ्याने स्वस्त दुकानदाराकडे आवश्यक कागदपत्रे सादर करून ई-केवायसी करणे आवश्यक असून ३१ मार्च पर्यंत या करिता मुदत दिली आहे. वेळेत लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी असे अवाहन जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे यांनी केले आहे. अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सर्व शिधा पत्रिका धारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत आहे. मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी न केल्यास धान्य मिळणार नसल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे माहिती यांनी दिली.

Read More
error: Don't Try To Copy !!