जळगाव | बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व इतर बौद्ध संघटनांनी एकत्र येत जळगावात जनजागृती मोहीम उघडली आहे. या लढ्याचा एक भाग म्हणून दि. ८ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे कार्यकर्ते प्रचारासाठी शहरात परिश्रम घेत आहेत. सुमित्र अहिरे, रविंद्र बाविस्कर व विक्रम जावे यांनी त्रिभुवन कॉलनी, के.सी. पार्क, महामाया बुद्धविहार, आंबेडकर नगर, प्रबुद्धनगर पिंप्राळा, शंकरआप्पा नगर या भागात जाऊन जनजागृती केली.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, “बोधगया महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.” आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.