जामनेर तालुक्यात स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीची मोहीम सुरू

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर, (प्रतिनिधी)सुपडू जाधव

:

तालुक्यातील रेशन धान्यास पात्र कुटुंबाची ई-केवायसी सुरू झाली आहे. प्रत्येक लाभार्थ्याने स्वस्त दुकानदाराकडे आवश्यक कागदपत्रे सादर करून ई-केवायसी करणे आवश्यक असून ३१ मार्च पर्यंत या करिता मुदत दिली आहे. वेळेत लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी असे अवाहन जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे यांनी केले आहे.
अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सर्व शिधा पत्रिका धारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत आहे. मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी न केल्यास धान्य मिळणार नसल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे माहिती यांनी दिली.

error: Don't Try To Copy !!