राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद;

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा जाहीर

राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद;

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा जाहीर

मुंबई (प्रतिनिधी):
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली असून प्रशासकीय तयारीलाही वेग आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १६ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक प्रक्रिया जाहीर होणार असून त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १६ ते २१ जानेवारीदरम्यान पार पडणार आहे. अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी केली जाणार आहे.

उमेदवारांना २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार असून त्यानंतर दुपारी ३.३० नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

या निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती आयोगाने दिली.

दरम्यान, निवडणुका शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निवडणुकांकडे राज्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसांत प्रचाराला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Don't Try To Copy !!