वडीलांच्या सेवानिवृत्तीबद्ल मुलाने वाटले शैक्षणिक साहित्य
जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेत दिनांक ३०/९/२०२४ रोजी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) ३३ वर्ष १ महिना २८ दिवसांच्या प्रदीर्घ सेवेनंतर वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा मुलगा स्वप्नील प्रभाकर पाटील आयटी इंजिनिअर पुणे यांनी स्वखर्चाने वडीलांच्या सेवानिवृत्तीबद्ल शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी च्या १७० विद्यार्थ्यांसाठी उजळणीचे पुस्तके तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दांची डिक्शनरी असे एकूण १९८ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून राजगिऱ्याचे लाडू वाटप केले. तसेच शाळेतील स्वयंपाकी सौ. आशा कोळी व मदतनीस श्रीमती लताबाई तायडे यांना भेटवस्तू म्हणून साडी वाटप केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. रूपाली उघडे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून स्वप्नील पाटील, सौ. सायली पाटील हे उपस्थित होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी गितेश आगळे व समर्थ भोई यांनी तसेच पदवीधर शिक्षक नाना धनगर , उपशिक्षक कैलास महाजन यांनी मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते भावनिक झाले ले होते.
स्वप्नील पाटील यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करतांना विद्यार्थ्यांना सांगितले की, वाचन लेखन करण्यासाठी पुस्तकांची आवश्यकता असते.तसेच गणिती प्रक्रिया करण्यासाठी पाढे पांठातर असणे गरजेचे आहे त्यासाठी उजळणी पुस्तकांचा वापर करा.नियमीतपणे अभ्यास करावा. आई – वडीलांची, शिक्षकांची आज्ञा पाळा. तुम्हाला मिळालेले शैक्षणिक साहित्य हे किती किमतीचे आहे याचा विचार न करता ते साहित्य आपल्यासाठी किती उपयुक्त आहे याचा विचार करावा.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. रूपाली उघडे, सदस्य निवृत्ती आगळे, सुधाकर गोसावी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या तर्फे तसेच शाळेतील स्वयंपाकी व मदतनीस यांच्या तर्फे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना धनगर यांनी केले व आभार कैलास महाजन यांनी केले व आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील उपशिक्षक मिलिंद तायडे, प्रशिक्षणार्थी शिक्षिका श्रीमती माधुरी तायडे यांनी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.