Mumbai Fire VIDEO : मुंबईच्या चेंबूरमध्ये भीषण आग; धुराचे लोट, लोकांची प्रचंड गर्दी, पाय ठेवायला जागा नाही!

मुंबई : राज्यात आग लागण्याच्या घटना सुरुच आहे. पुण्यातील नवी पेठ येथे सकाळी आगल्याची घटना घडली होती. पुण्यानंतर आता मुंबईतही आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या चेंबूरमध्ये आगीची भीषण घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील चेंबूर सिंधी कॅम्प परिसरात असलेल्या संतोषी माता मंदिरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मंदिरात अचानक आग लागल्यानंतर लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांनी माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

सिंधी कॅम्प परिसरातील संतोषी माता मंदिरात आग लागलेल्या घटनेत आतापर्यंत कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी आग लागल्यानंतर आकाशात धुराचे प्रचंड लोट दिसत आहे. तसेच तिथे लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. आग लागल्यानंतर साधा पाय ठेवायला जागा नाही, इतकी प्रचंड गर्दी घटनास्थळी झाली आहे. मंदिराजवळ जमलेले लोक घटना कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत.

मुंबईच्या चेंबूरमधील कँप परिसरातील संतोषी माता मंदिराला शनिवारी (दि. 19 ऑक्टोबर) आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग आटोक्यात आली असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे.#ChemburFire #Mumbai #ViralVideo #SantoshiMataTemple #ChemburCampFire #Fire pic.twitter.com/iJAuLcSupJ

— SakalMedia (@SakalMediaNews) October 19, 2024

🔥पुण्यातही आगीची घटना!

पुण्याच्या नवी पेठमध्येही आज शनिवारी एका इमारतीच्या टेरेसला आग लागल्याची घटना घडली. टेरेसला आग लागल्याची घटना घडताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं.

पुण्यातील नवी पेठ येथील गांजवे चौकातील एका ग्रंथालयाला ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर तातडीने आग विझविण्याचे काम सुरु केलं. काही वेळानंतर अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

error: Don't Try To Copy !!