जामनेर येथे विश्व कॅन्सर दिनानिमित्त जनजागृती

जामनेर (वा.)-भारतीय जैन संघटना जामनेर शाखा यांच्यातर्फे विश्व कैंसर दिवसा निमित्त कैंसर जनजागृती व मार्गदर्शन संबधी व्याख्यानाचे आयोजन नविन महावीर भवन येथे आयोजित करण्यात आले.

  • मुख्य वक्ता म्हणून जळगाव चे सुप्रसिद्ध कैंसर सर्जन डॉ. प्रशांत चोपड़ा, एमडीएस,एफएचएनएस  उपस्थित होते.आतापर्यंत डॉक्टरांनी 5000 च्या वर यशस्वी कैंसर शस्रक्रिया केलेली आहे व त्यांनी कैंसर या गंभीर आजारा बद्दल महत्व पूर्ण माहिती दिली.
    बीजेस जामनेर शाखाकडून डॉ प्रशांत चोपड़ा यांना शाल,माळा व भगवान महावीर स्वामी यांची फोटो फ्रेम देवून सत्कार सन्मान करण्यात आले.
    कार्यक्रमात भर म्हणून प.पु.देशनानिधी म.सा.,ओसवाल जैन संघचे पदाधिकारी व डॉक्टरर्स यांच्या हस्ते कैंसर जनजागृती पोस्टर्स चे अनावरण करण्यात आले. जामनेर शहराच्या विविध ठिकाणी जसे जैन महावीर भवन,सिविल
    हॉस्पिटल,तहसील कार्यालय,नगरपालिका कार्यालय,पंचायत समिती कार्यालय व बस स्टैंड अशा गर्दीच्या ठिकाणी बीजेस सदस्यांकडून पोस्टर लावण्यात आले.तसेच शहरातील 05 ऑटो रिक्षा द्वारे पोस्टर लावून जनजागृती करण्यात आली.
     कैंसर या आजारावर सुरुवातीच्या वेळीच निदान झाल्यास व त्यावर उपचार केल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
    कार्यक्रमा मध्ये अतिथि म्हणून ओसवाल जैन संघचे सचिव ईश्वरलाल साबद्रा,मंत्री डॉ कांतिलाल जैन,डॉ राजेंद्र ललवाणी,डॉ आनंद जैन उपस्थित होते. 
     प्रस्ताविक मध्येखांदेश उपाध्यक्ष सुमित मुनोत यांनी सांगितले की, बीजेस कडून पूर्ण देशामध्ये कैंसर दिवसा निमित्त व्याख्यानमाला,शिबिर, इत्यादि कार्यक्रम घेतले जात आहे.प्रकल्प प्रमुख म्हणून डॉ दीपक कोठारी,डॉ नरेन्द्र रांका,डॉ सोनाली सिसोदिया यांनी काम पाहिले.
    कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बीजेएस खांदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत,शहर
    अध्यक्ष कुशल बोहरा,सचिव संकल्प लोढ़ा, सह सचिव आदित्य मंडलेचा,महिला जिल्हाध्यक्ष सोनल कोठारी,महिला अध्यक्ष मोना चोरडीया यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जामनेर  शहरचे पुरुष व महिला जन मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी बीजेसच्या या उपक्रमाला खुप प्रशंसा केली आणी भविष्यामध्ये पण असे कार्यक्रम घेण्यात यावे अशी विनंती केली.आभार प्रदर्शन बीजेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ कांतिलाल जैन यांनी केले.
error: Don't Try To Copy !!