बेटावद खुर्दला ५ ठिकाणी चोऱ्या – अज्ञाताविरूध्द जामनेर पोलिसात गुन्हा दाखल

जे बी एन महाराष्ट्र न्यूज-जामनेर (प्रतिनिधी सुपडू जाधव): बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे रविवारी रात्री चोरट्यांनी पाच ठिकाणी ■ घरफोडी करून ७० हजारांची रोकड व १३ हजाराचे सोन्याचे दागिने लांबविल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तम राजाराम बर्डे (बेटावद खुर्द, ता. जामनेर) हे पत्नीला उपचारासाठी जामठी … (ता. बोदवड) येथे घेऊन गेले होते. त्यांच्या बंद घरातून चोरट्यांनी ३० हजार रोख व दागिने लांबविले. याच रात्री चोरट्यांनी गावातील इतरही चौघांच्या घरातून रोकड व दागिने लांबवल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, एकाच वेळी पाच ठिकाणी चोऱ्या झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हवालदार रवींद्र बिन्हाडे तपास करीत आहेत.
