मोटरसायकल चोरून आणलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
दि.07/01/2025 रोजी 11:00 वा.च्या सुमारास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे,व पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पो.हे. कॉ जयेंद्र पगारे, पो.हे. कॉ दिपक जाधव, पो.हे. कॉ सुशील सत्रे, पो.हे.कॉ अनिल राठोड, पो.कॉ. सचिन महाजन असे खादगाव बिटमध्ये खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना 11:30 वाजेच्या सुमारास जामनेर शहराच्या बाहेर खादगाव रोडवर चार ईसम हे दोन मोटरसायकल वर विना नंबरच्या मोटरसायकल घेऊन जात जात असतांना दिसले.
त्यांना थांबवून त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव 1)सागर अमृत चौधरी वय 34 वर्ष. 2)सागर शिवाजी चौधरी वय 26 वर्ष. 3)संजय युवराज पाटील वय 45 वर्ष. 4)योगेश भाऊराव गावंडे वय 39 वर्ष. सर्व रा. खादगाव ता. जामनेर असे असल्याचे सांगितले त्यावेळी त्यांना सदर मोटरसायकलच्या नंबर व कागदपत्र बाबत विचारपूस केली असता त्यांना सदर मोटरसायकलच्या बाबतीत काही एक सांगता येत नसून ते उडवा उडवीचे उत्तरे देत होते. त्यावरून पोलिसांची खात्री झाली की सदरच्या मोटरसायकल या नमूद ईसमानी लबाडीने मिळवलेल्या आहे किंवा त्यांच्या मालकीच्या नसतांना ताब्यात बाडगलेल्या आहेत सदरच्या मोटरसायकलीचे वर्णन खालील प्रमाणे 1)20000/-रु किंमतीची एक काळ्या रंगाची ड्रिम युगा जिचा इंजिन नंबर JC58EG0012548 व 2) 20000/-रु कि सिटी 100 कंपनीची मोटरसायकल इंजिन नंबर DUYPJM13145 व 3) 40000/-रु किं.च्या दोन मोटरसायकल दोन पंचा समक्ष जागीच जप्त करून ताब्यात घेतल्या आहे त्याचा सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे. वरील वर्णन व किंमतीच्या दोन मोटरसायकल मालकी नसतांना त्यांच्या कब्जात बाळगून मोटर सायकलच्या मालकी बाबत कोणतेही समाधान कारक उत्तर न देता मिळून आले म्हणून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 124 प्रमाणे जामनेर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला असून सदर तपासात असे निष्पन्न झाले की, सदरच्या मोटरसायकल ह्या बिस्टान पोलीस स्टेशन जि. खरगोन मध्य प्रदेश व छैगाव माखन पोलीस स्टेशन जि. खंडवा मध्यप्रदेश येथून चोरी करून आणल्याचे निष्पन्न झाले असून सदर आरोपी हे बिस्टान पोलीस स्टेशन जि. खरगोन मध्यप्रदेश यांच्याकडे तपासाकामी देण्यात आले आहे.