
जामनेर(वा.)- जैन समाज हा दुष्काळामुळे राजस्थानातून बाहेर पडला.पूर्वी नुसती पाणपोई बांधली तरी समाधान होते, आता तलाव बांधायची वेळ आली आहे.तलावातील गाळ काढल्यामुळे पाण्याची क्षमता वाढेल.पुर्ण गाव पाणीमय होईल. काढलेला गाळ शेतात टाकल्यामुळे बंजर जमीन सुपीक बनेल. प्यायला पूर्ण गावाला,जनावरांना पाणी मिळेल. शेतात गाळ आल्यामुळे वर्षातून तिनदा पिके घेतील. ग्रामीण अर्थव्यवस्था बदलेल.असे मत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केले. ते पुणे येथील वर्धमान प्रतिष्ठान सभागृहात संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी,कार्यकर्ते, जिल्हा समन्वयक यांच्या आयोजित बैठकीत बोलत होते. नवकार महामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली.राज्य अध्यक्ष केतन शाह यांनी उपस्थितांचे स्वागत केले.राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांखला यांनी प्रास्तविक केले.
मुथा म्हणाले, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलिकरण व रुंदीकरण ही सरकारच्या मृदु व जलसंधारण विभागाची योजना आहे. ही योजना गावागावात,शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त गावाकडून मागणी अर्ज येण्यासाठी संघटना लोकचळवळ निर्माण करेल. तसा करार शासनाशी झाला असुन या साठी सुहाना स्पाईसेस यांचे सहकार्य लाभत आहे.कार्यकर्त्यांचे सर्व शंकांचे निरासन मुथा यांनी केले.
उपस्थितांना संघटनेने तयार केलेल्या ॲपमध्ये गावाची तलावातील गाळ काढण्यासाठी मागणी अर्ज भरुन काढण्याचे प्रात्यक्षिक संघटनेचे मेनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांनी दाखविले.
लवकरच महाराष्ट्रातील संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शासनाच्या या योजनेला सहकार्य करतील.
सुहाना स्पाईसेस चे विशाल चोरडिया म्हणाले, भारतीय जैन संघटने बरोबर आम्हाला या कार्यात सहभागी होता येत आहे, याचा आनंद वाटतो. राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा, राज्य सचिव प्रविण पारख यांनी मनोगत व्यक्त केले.
या बैठकीला खानदेशातून विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा(शिंदखेडा), विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत(जामनेर)
जळगाव जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव दर्शन देशलहरा(चोपडा),राजेश जैन(पाचोरा),मनोज कोचर (शहादा), गौरव छाजेड, जय मुथा (बोदवड), महावीर डागा, शुभम डागा (अक्कलकुवा),देवेंद्र शाह, उज्ज्वल डेरेकर (रावेर)) पंकज जैन (जळगाव), चेतन जैन (भुसावळ), संदिप जैन, शीतल जैन, चेतन जैन (शेंदुर्णी), रोशन गोलेछा(चाळीसगाव) उपस्थितीत होते. आभर केतन शाह यांनी मानले.