जे बी एन महाराष्ट्र न्यूज, जामनेर
प्रतिनिधी: सुपडू जाधव
जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र सुपडू पगारे (A.S.I. 2651) यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल “टॉप कॉप ऑफ द मंथ” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने फेब्रुवारी 2025 महिन्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पोलीस दलातील उल्लेखनीय सेवा आणि कर्तव्यनिष्ठ कार्यगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
सत्कार समारंभात पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धनंजय येरुळे यांच्या हस्ते जयेंद्र पगारे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार उपस्थित होते. त्यांनी जयेंद्र पगारे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
कर्तव्यदक्षता आणि जनसेवेसाठी समर्पित अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. जयेंद्र पगारे यांच्या सन्मानामुळे जामनेर पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी सहकाऱ्यांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.