दिपनगर (भुसावळ) येथे महाराष्ट्र वीज कामगार महासंघ मार्फत आयोजित महिला दिन व पारिवारिक कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

दिपनगर (भुसावळ) येथे महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने महिला दिन व पारिवारिक मेळावा तसेच २०२५-२७ या कालावधीसाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

महिला सशक्तीकरण व कुटुंबसंस्था यांच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. तसेच वीज कामगार महासंघाच्या योगदानाचे कौतुक करत संघटनेच्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात महिला कामगारांच्या योगदानाबाबत विशेष सन्मान करण्यात आला.

या वेळी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित सदस्यांनी महासंघाच्या भविष्यातील योजनांवर चर्चा केली.

error: Don't Try To Copy !!