जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
प्रतिनिधी- सुपडू जाधव
जामनेर: जामनेर शहराच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, किशोर पाटील यांची जामनेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आगमनामुळे शहरातील नागरिकांमध्ये नवीन विश्वास निर्माण झाला असून, कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक बळकटी मिळणार आहे किशोर पाटील यांनी जामनेर शहराच्या
सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. पोलिस आणि नागरिक यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.संवादादरम्यान, उपनिरीक्षक पाटील यांनी जामनेरमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असे स्पष्ट केले. बेकायदेशीर कृत्यांवर त्वरित कारवाई केली जाईल, तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील.नवनियुक्त उपनिरीक्षक पाटील यांची नियुक्ती झाल्यापासून स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व स्तरांतून त्यांचे स्वागत होत असून, शहराच्या सुरक्षेसाठी त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.जामनेरच्या विकासात आणि सुरक्षिततेच्या दिशेने ही एक मोठी पावले उचलली गेली असून, उपनिरीक्षक किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जामनेर पोलिसांकडून प्रभावी कार्यवाही अपेक्षित आहे.