हिवरखेडा वाडी येथे कन्या पुजण्याची परंपरा कायम
गोसावी समाज बांधव सरसावले
जे.बी.एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (एकनाथ कोळी)
हीवरखेडा तवा. तालुका जामनेर येथे गोसावी बंधवामार्फत कन्या पूजनाची प्रथा अकरा वर्षापासून सुरू आहे. शुक्रवारी कन्या पूजन करण्यात आले . या निमित्त वैष्णवी देवी भंडाराची प्रथा सुरू ठेवली आहे नऊ अविवाहित मुलींचे पाय पाण्याने व दुधाने धुतले जातात पूजन करून पायाचे पाणी प्रसाद म्हणून पिण्याची प्रथा आहे जन्माला आलेली प्रत्येक मुलगी ही लक्ष्मी आहे. त्यामुळे पूजन करून त्यामुळे पूजन करून कन्याची गावभर मिरवणूक काढल्या जाते. गावातील व बाहेर गाव वरून आलेले भाविक दर्शन घेतात, त्यानंतर महाप्रसाद दिला जातो. त्यासाठी पुजारी अनिल चव्हाण,
सुनील चव्हाण, मुकेश चव्हाण,धीरज चव्हाण,राज चव्हाण,रामेश्वर चव्हाण,आशिष चव्हाण इ. असतात.