छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील दिव्या सदाशिवे या विद्यार्थिनीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुण रत्न प्रथम पुरस्कार*

छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील दिव्या सदाशिवे या विद्यार्थिनीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुण रत्न प्रथम पुरस्कार*


जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज जामनेर
सावळदबारा प्रतिनिधी -जबार एस तडवी

गुणवंत्त विध्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जातो त्यासाठी अभ्यास करणे ही काळाची गरज. प्रा नारायण कोलते पा.
सविस्तर वृत्त असे की जय कालंका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावळदबारा येथील वर्ग दहावीची सन फेब्रुवारी/मार्च 2024 मध्ये उत्तीर्ण झालेली अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धिमत्तेची विद्यार्थिनी आपल्या घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत अतिशय तन-मन-धनाने शिक्षण घेणारी व वर्ग दहावीला 93.80 गुण घेऊन उत्तीर्ण झालेली कुमारी दिव्या रावसाहेब सदाशिवे या विद्यार्थिनीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता गुणरत्न पुरस्कार सन 24-25 मध्ये विशेष जिल्हा सामाजिक विभाग समाज कल्याण विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत जाहीर करण्यात आला आज रोजी विद्यार्थिनीचे पालक या नात्याने महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण कोलते व सर्व सहकारी शिक्षक यांच्यामार्फत तिच्या पालकांना देण्यात आला हा पुरस्कार प्राप्त करणारी विद्यालयाची पहिली महिला विद्यार्थिनी मानकरी ठरली आहे तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे चेक द्वारे तिला 5000 रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं त्याबद्दल तिच्या पालकांनी व गावकऱ्यांनी संस्थेचे विद्यालयाचे विशेष आभार मानले. पुरस्कार देताना प्राचार्य कोलते यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की, तुम्ही सुद्धा या पुरस्काराचे मानकरी होऊ शकतात फक्त शिक्षण मन लावून आत्मसात करा आपली संपूर्ण विद्यार्थी दशेचे आयुष्य हे अभ्यासासाठी समर्पित करा आपोआपच यश तुमच्या पायथ्याशी लोळण घेईल त्यासाठी तुमच्या अंगामध्ये अभ्यास करण्याची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास हा ठासून भरायला पाहिजे तरस तुम्ही यश मिळू शकता याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे दिव्या सदाशिवे आपल्या शालेय जीवनात या विद्यार्थिनी कधी शाळेला दांडी मारली नाही दररोज शाळेत येऊन नियमित अभ्यास करणे शाळेतील सर्व शालेय उपक्रमामध्ये सहभाग नोंदविणे व उत्कृष्ट अशा निबंध स्पर्धेमध्ये सुद्धा या विद्यार्थिनीने पारितोषिक मिळवले आहे घरची परिस्थिती अतिशय हलाकीची वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलेले पण आपल्या आईनी मोलमजुरी करून या विद्यार्थिनीला शिक्षण दिले वतीने आपल्या आईच्या मेहनतीचे पारणे फेडले. आज छत्रपती संभाजी नगर सारख्या देवगिरी महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत आहे केवळ स्वतःचा आत्मविश्वास व जिद्द याच्या भरोशावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनतीने व जिद्दीने अभ्यास करीत आहे मित्रांनो आपल्या एवढ्या ग्रामीण भागात व खेड्यात सुद्धा गुणवत्ता व गुण रत्न विद्यार्थी घडू शकता असे प्राचार्य नारायण कोलते यांनी दैनिकाशी बोलताना मनोगत व्यक्त केले रोख रक्कम पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे पालक व भाऊ पालकांनी संस्थेचे अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते व संचालक मंडळ तसेच शाळेतील सर्व प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सुद्धा आभार मानले याप्रसंगी शाळेतील शिक्षक भास्कर ससाने विकास पाटील, विजय सिंग राजपूत, मुकुंदा व्यवहारे, भास्कर खमाट, भूषण देसले भास्कर ससाने, पोपटराव सोनवणे ज्ञानेश्वर राठोड विनोद जाधव संजय जोशी जीवन कोलते अजबराव चव्हाण श्याम जाधव बाबासाहेब कोलते व विद्यार्थी पालक पत्रकार बंधू उपस्थित होते.अशी माहिती प्रा जीवन कोलते यांनी दिली

error: Don't Try To Copy !!