
जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे २१ वर्षीय सुलेमान खान या तरुणाचा जामनेर येथे कॅफेवर बसलेला असताना , बाहेर काढून १० ते १२ जणांनी अमानुषपणे मारहाण करत खून केला होता.
या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र मोठी खळबळ उडाली होती.याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर दिनांक ३० ऑगस्ट,शनिवार रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,जामनेरला येणार आहे. त्यानंतर ते पुढे बेटावद खुर्द येथे जाऊन मयत सुलेमान खान याच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील,युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार,महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे,जिल्हा महासचिव योगेश तायडे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल इंगळे,जिल्हा उपाध्यक्ष इम्रान तडवी, जिल्हा सचिव रफिक बेग, ॲड.राजू मोगरे पाटील,जिल्हा संघटक बबन कांबळे,यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे यांनी कळविले आहे.
